आज (२६ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! ''गोजिरी'', ''ती रात्र'', ''शर्यत'' व ''खेळ मांडला'' या चित्रपटांचे दिग्दर्शक विजु माने वेगवेगळ्या विषयावर अतिशय देखणे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ''बॉयोस्कोप''मध्ये विजु माने यांनी किशोर कदम ''सौमित्र'' यांच्या कवितेवर आधारित ''एक होता काऊ'' या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षक त्यांच्या येणाऱ्या ''चूक भूल द्यावी घ्यावी'' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. ''चूक भूल द्यावी घ्यावी'' हा मराठीतील पहिला रोड मूवी प्रकरातील चित्रपट असणार आहे.
Showing posts with label happy birthday. Show all posts
Showing posts with label happy birthday. Show all posts
Tuesday, 26 July 2016
Saturday, 23 July 2016
मिलिंद गुणाजी
आज (२३ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "द्रोह काल", "सलमा पे दिल
गया है", "दो राहें", "ज़ोर", "विरासत", "हज़ार चौरासी
की माँ", "ज़ुल्म-ओ-सितम", "त्रिशक्ति", "गॉडमदर", "ज़ुल्मी", "ज़िन्दगी
ज़िन्दाबाद", "जिस देश में
गंगा रहता है", "मुलाकात", "अंश", "देवदास", "देव", "असंभव", "मिस्टर प्राइम
मिनिस्टर", "ताजमहल", आणि "एलान" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. सोबतच त्यांना पर्यटनाची पण विशेष आवड आहे. याच विषयावर त्यांनी पुस्तके पण लिहिली आहे. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.milindgunaji.in या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
Tuesday, 5 April 2016
प्रशांत दामले
आज (५ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रशांत दामले मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय अभिनेते आहेत . त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत नाटक, टीवी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमावर आपला ठसा उमटवाला आहे . त्यांनी २६ नाटकात अभिनय केला असून त्यामध्ये "चार दिवस प्रेमाचे", "जादू तेरी नजर", "गेला माधव कुणीकडे", "एका लग्नाची गोष्ट", "ओळख ना पाळख", "प्रियतमा", "मोरूची मावशी", "लग्नाची बेडी", "लेकुरे उदंड झाली", "शूss कुठं बोलायवं
नाही", "नकळत दिसले सारे" आणि "कार्टी काळजात घुसली" प्रमुख आहेत. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये “अक्का”, “आई
पाहिजे”, “आत्मविश्वास”, “आनंदाचे
झाड’, “आम्ही दोघे राजा
राणी”, “इना मिना डिका”,
“एक रात्र मंतरलेली”, “एकदा पहावं करुन”, “खुळ्यांचा बाजार”,
“घरंदाज”, “चल गंमत करु”, “चार दिवस सासूचे”,
“तू तिथं मी”, “पसंत आहे मुलगी”,
“पुढचं पाऊल”, “फटफजिती”, “बंडलबाज”,
“बाप रे बाप”, “मधुचंद्राची रात्र”, “माझा छकुला”, “रेशीमगाठी”, “वाजवा रे वाजवा”,
“विधिलिखित”, “सगळीकडे बोंबाबोंब”,
“सगळे सारखेच” आणि “सवत माझी लाडकी” प्रमुख आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती करीता तुम्ही त्यांच्या www.prashantdamle.com या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.
Tuesday, 29 March 2016
भार्गवी चिरमूले
आज (२९ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री भार्गवी चिरमूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट आणि टि वी मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी मधील "एका पेक्षा एक" या शो चे विजेतेपद त्यांनी पटकावले. "मराठी तारका" या कार्यक्रमाच्या भाग आहेत. Monday, 28 March 2016
Saturday, 6 February 2016
परेश मोकाशी
आज (६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! परेश मोकाशी हे आज मराठी चित्रपटसुष्टीतील महत्वाचे दिग्दर्शक आहेत. त्यांना त्यांच्या "हरिचंद्राची फैक्टरी" या पहिल्या चित्रपटासाठी बराच संघर्ष करावा लागला. हा चित्रपट दादासाहेब फालके यांच्या जीवनावर आधारीत होता. प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक झाले. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवला गेला. "एलिज़ाबेथ एकादशी" हा त्यांचा दूसरा मराठी चित्रपट होता. या चित्रपटाला रसिक आणि समीक्षक दोघांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्करांमध्ये सर्वोकृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला.
Tuesday, 26 January 2016
नंदू माधव
आज (२६ जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते नंदू माधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मोजके पण अतिशय अर्थपूर्ण चित्रपट व भूमिका करणार्या अभिनेत्यांमध्ये नंदू माधव यांची गणना होते. २०१० साली प्रदर्शित झालेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित "हरिचन्द्राची फैक्टरी" मध्ये त्यांनी दादासाहेब फालके यांची केंद्रीय भूमिका केली होती. हा चित्रपट व त्यांच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा झाली. अभिनयाबरोबर सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय आहेत. त्यांनी खालील चित्रपटात अभिनय केला आहे.
- दायरा (१९९६)
- शूल (१९९९)
- अशी ज्ञानेश्वरी (२००१)
- वळु (२००८)
- बारू (२०१०)
- मर्मबन्ध (२०१०)
- हरिचंद्राची फैक्टरी (२०१०)
- जन गण मन (२०१२)
- शाळा (२०१२)
- मुक्ती (२०१२)
- टपाल (२०१३)
- मैं और चार्ल्स (२०१५)
Friday, 8 January 2016
सागरिका घाटगे
आज (८ जानेवारी) हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सागरिका घाटगे यांनी चक दे इंडिया या हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनय यात्रेला सुरवात केली. हॉकी या खेळावर आधारित या चित्रपटात शाहरुख़ खान मुख्य भूमिकेत होते सोबतच हॉकी टीम ची गोष्ट असल्यामुळे अनेक अभिनेत्रींच्या भूमिका होत्या पण आपल्या पहिल्याच चित्रपटातून सागरिका प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरल्या. २०१३ साली प्रेमाची गोष्ट या सतीश राजवाडे दिग्दर्शित चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सुष्टित यशस्वी पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्या सोबत अतुल कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका होती. अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांचा दमदार अभिनय, फ्रेश स्टोरी, फ्रेश लुक आणि सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन या मुळे "प्रेमाची गोष्ट" ची भट्टी छान जमली. हा चित्रपटही टिकिट खिडकीवर बर्यापैकी यशस्वी झाला. माझ्या आवडत्या मराठी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. सागरिका घाटगे यांनी अभिनय केलेले चित्रपट
- चक दे इंडिया (२००७)
- फॉक्स (२००९)
- मिले ना मिले हम (२०११)
- रश (२०१२)
- प्रेमाची गोष्ट (२०१३)
- जी भर के जी ले (२०१५)
- दिलदारियाँ (२०१५)
Thursday, 17 December 2015
रीतेश देशमुख
आज (१७ डिसेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते रीतेश देशमुख यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! रीतेश विलासराव देशमुख या मराठी अभिनेत्याने हिंदी चित्रपट सुष्टित आपल्या अभिनयाने वेगळे स्थान निर्माण केले व नंतर "लय भारी" च्या निमित्ताने मराठीत पदार्पण करुन मराठी टिकिट खिडकीवर उत्पन्नाचे नवीन उच्चांक बनवले. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ''लय भारी" चा सीक्वल ''माऊली" सध्या निर्माण अवस्थेत आहे. रवी जाधव सध्या त्यांच्या "बैंजो" या पहिल्या हिंदी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत, या चित्रपटात रीतेश देशमुख यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात रीतेश देशमुख एका आगळया वेगळ्या लूकमध्ये बघायला मिळणार आहे. रीतेश देशमुख यांनी खालील हिंदी आणि मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. - तुझे मेरी कसम (२००३)
- आउट ऑफ कन्ट्रोल (२००३)
- नाच (२००४)
- मस्ती (२००४)
- क्या कूल हैं हम (२००५)
- ब्लफ़ मास्टर (२००५)
- होम डिलीवरी (२००५)
- अपना सपना मनी मनी (२००६)
- डरना जरूरी है (२००६)
- मालामाल वीकली (२००६)
- फाइट क्लब (२००६)
- धमाल (२००७)
- नमस्ते लंदन (२००७)
- हे बेबी (२००७)
- कैश (२००७)
- ओम शाँति ओम (२००७)
- दे ताली (२००८)
- चमकू (२००८)
- डू नॉट डिस्टर्ब (२००९)
- अलादीन (२००९)
- कल किसने देखा (२००९)
- रण (२०१०)
- जाने कहा से आयी है (२०१०)
- हाउसफुल (२०१०)
- झूठा ही सही (२०१०)
- फ़ालतू (२०११)
- डबल धमाल (२०११)
- कूची कूची होता है (२०११)
- लव ब्रेकउप ज़िन्दगी (२०११)
- तेरे नाल लव हो गया (२०१२)
- हाउसफुल २ (२०१२)
- क्या सुपर कूल है हम (२०१२)
- ग्रैंड मस्ती (२०१३)
- हिम्मतवाला (२०१३)
- हमशकल्स (२०१४)
- एक विलन (२०१४)
- लय भारी (२०१४)
- एंटरटेनमेंट (२०१४)
- बंगिस्तान (२०१५)
- क्या कूल है हम ३ (२०१६)
- मस्तीजादे (२०१६)
Friday, 20 November 2015
अविनाश अरुण
आज (२० नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अविनाश अरुण यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! युवा छायाचित्रकार अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेल्या ''किल्ला'' या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये ''सर्वोकृष्ट मराठी चित्रपट'' म्हणून गौरवण्यात आले. हा चित्रपट मागील वर्षी जून महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी कोकणात घडणारी कथा अतिशय सुंदरपणे साकारली होती. लहान मुलांच्या तरल भावविश्वाचे दर्शन करवणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात तीन कोटींची कमाई करून आशयघन चित्रपट चांगली कमाई करू शकत नाही हा समज खोटा ठरविला.Wednesday, 18 November 2015
अमित अभ्यंकर
आज (१८ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अमित अभ्यंकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अमित अभ्यंकर यांनी कार्यकारी निर्माता म्हणून "निरोप", "हापुस" आणि "इश्क़ वाला लव" या चित्रपटासाठी कार्य केले आहे. २०१२ साली त्यांनी "जन गण मन" हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात अस्मिता जोगळेकर, संतोष जुवेकर, नंदू माधव, संदीप मेहता, विजय मिश्रा, उदय सबनीस, चिन्मय संत आणि मधुरा वेलणकर यांच्या भूमिका होत्या.Tuesday, 17 November 2015
सुशांत शेलार
आज (१७ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुशांत शेलार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपट सृष्टीतील एक तडफदार आणि देखणा नायक म्हणजे सुशांत शेलार. सुशांत शेलार यांची दुनियादारी चित्रपटातील भूमिका आणि त्यांचा डायलॉग "हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते!!!" बराच गाजला. सोबतच त्यांनी "वंशवेल", "धूम २ धमाल", "क्लासमेट्स'', "मैटर", "तू ही रे", "ब्लाइंड गेम", "प्रतिबिम्ब" आणि "संघर्ष" या चित्रपटात ही भूमिका केल्या आहेत.Monday, 9 November 2015
किशोर कदम
आज (९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार, अभिनेते व कवी किशोर कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
ते सौमित्र या टोपण नावाने कविता लिहितात. त्यांचे "जावे कवितांच्या गावा" आणि "... आणि तरीही मी!" हे कवितासंग्रह प्रसिद्द झाले आहेत. त्यांना लिहिलेल्या गीतांचा अल्बम "गारवा" हा खुप गाजला. त्यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित "समर" या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. "नटरंग" या मराठी रवी जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपटातल्या पाण्डोबाच्या भूमिकेने त्यांना नविन ओळख मिळवून दिली. "मम्मो", "लिमिटेड माणुसकी", "संशोधन", "दिल पे मत ले यार", "ध्यासपर्व", "ब्लैक फ्राइडे", "शोभायात्रा", "कॉन्ट्रैक्ट", "फूँक", "एक कप च्या", "जोगवा", "मरेपर्यंत फाशी", "समान्तर", "प्रतिसाद", "बालगंधर्व", "तार्यांचे बेट", "बालक पालक", "हा भारत माझा", "अनुमती", "फँड्री", "रज्जो", "रेला रे", "स्पेशल २६", टूरिंग टॉकीज", "तुह्या धर्म कोणचा?", "अनवट", "मंजुनाथ", "पोस्टकार्ड", "सिद्धांत", "जाणिवा" आणि "हाईवे" या हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "चौर्य", "चिरंजीव", "दमलेल्या बाबाची कहानी", "घंटा", "गणवेश", "इश्क प्रेम लव" आणि "परतु" या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या प्रत्येक चित्रपटात ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहेत.
ते सौमित्र या टोपण नावाने कविता लिहितात. त्यांचे "जावे कवितांच्या गावा" आणि "... आणि तरीही मी!" हे कवितासंग्रह प्रसिद्द झाले आहेत. त्यांना लिहिलेल्या गीतांचा अल्बम "गारवा" हा खुप गाजला. त्यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित "समर" या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. "नटरंग" या मराठी रवी जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपटातल्या पाण्डोबाच्या भूमिकेने त्यांना नविन ओळख मिळवून दिली. "मम्मो", "लिमिटेड माणुसकी", "संशोधन", "दिल पे मत ले यार", "ध्यासपर्व", "ब्लैक फ्राइडे", "शोभायात्रा", "कॉन्ट्रैक्ट", "फूँक", "एक कप च्या", "जोगवा", "मरेपर्यंत फाशी", "समान्तर", "प्रतिसाद", "बालगंधर्व", "तार्यांचे बेट", "बालक पालक", "हा भारत माझा", "अनुमती", "फँड्री", "रज्जो", "रेला रे", "स्पेशल २६", टूरिंग टॉकीज", "तुह्या धर्म कोणचा?", "अनवट", "मंजुनाथ", "पोस्टकार्ड", "सिद्धांत", "जाणिवा" आणि "हाईवे" या हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "चौर्य", "चिरंजीव", "दमलेल्या बाबाची कहानी", "घंटा", "गणवेश", "इश्क प्रेम लव" आणि "परतु" या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या प्रत्येक चित्रपटात ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहेत.सुबोध भावे
आज (९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुबोध भावे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
सुबोध भावे यांनी चित्रपट, नाटक आणि टिवी मालिका या तिन्ही क्षेत्रात अभिनय केला आहे. सुबोध भावे यांनी "लोकमान्य - एक युगपुरुष" आणि "बालगंधर्व" या चित्रपटात लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व यांची भूमिका साकारली. या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. येत्या दिवाळीमध्ये १२ नवंबरला ''कट्यार काळजात घुसली" या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत.
सुबोध भावे यांनी चित्रपट, नाटक आणि टिवी मालिका या तिन्ही क्षेत्रात अभिनय केला आहे. सुबोध भावे यांनी "लोकमान्य - एक युगपुरुष" आणि "बालगंधर्व" या चित्रपटात लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व यांची भूमिका साकारली. या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. येत्या दिवाळीमध्ये १२ नवंबरला ''कट्यार काळजात घुसली" या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत.
सुबोध भावे यांनी अभिनय केलेले चित्रपट
- कट्यार काळजात घुसली (२०१५)
- लोकमान्य - एक युगपुरुष (२०१५ )
- स्वामी पब्लिक लिमिटेड (२०१४)
- अनुमती (२०१३)
- टूरिंग टॉकीज (२०१३)
- बालक-पालक (बी.पी.) (२०१३)
- झाले मोकळी आकाश (२०१३)
- अय्या (हिंदी) (२०१२)
- भारतीय (२०१२)
- चिंटू (२०१२)
- पाऊलवाट (२०११)
- बालगंधर्व (२०११)
- झाले मोकळे आकाश (२०१०)
- ती रात्र (२०१०)
- रानभूल (२०१०)
- लाडीगोडी (२०१०)
- हापूस (२०१०)
- पाश (२०१०)
- कथा तिच्या लग्नाची (२००९)
- त्या रात्री पाऊस होता (२००९)
- क्षणोक्षणी (२००९)
- उलाढाल (२००८)
- एक डाव धोबी पछाड (२००८)
- मन पाखरू पाखरू (२००८)
- सखी (२००८)
- सनई चौघडे (२००८)
- आव्हान (२००७)
- माझी आई (२००७)
- श्री सिद्धीविनायक महिमा (२००७)
- मिशन चॅम्पियन (२००७)
- आईशपथ (२००६)
- क्षण (२००६)
- मोहत्यांची रेणुका (२००६)
- लालबागचा राजा (२००६)
- आम्ही असू लाडके (२००५)
- कवडसे (२००५)
- मी तुझी तुजीच रे (२००५)
- सत्तेसाठी काहीही (२००३)
- ध्यासपर्व (२००१)
- वीर सावरकर (२००१)
- संत बसवेश्वर (१९९०)
Sunday, 8 November 2015
उपेन्द्र लिमये
आज (८ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उपेन्द्र लिमये यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
त्यांनी "मुक्ता" या मराठी चित्रपटातून आपली चित्रपट सृष्टितील कारकीर्द सुरु केली. त्यानंतर त्यांनी "बांगरवाडी", "कथा दोन गणपतरावांची", "सरकारनामा", "कैरी", "ध्यासपर्व", "चांदनी बार", "सावरखेड: एक गाव", "पेज थ्री", "जत्रा: ह्यालागाड रे त्यालागाड", "ब्लाइंड गेम", "शिवा", "शिवपतीकरम", "डार्लिंग", "ट्राफिक सिग्नल", "प्रणाली", "उरुस", "सरकार राज", "काँट्रॅक्ट", "मेड इन चायना", "जोगवा", "मी सिंधुताई सपकाळ", "धूसर", "महागुरू", "माय नेम इज ३४०", "धग", "येलो", "गुरु पोर्णिमा" आणि "प्यार वाली लव स्टोरी" या हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटात विविध भूमिका साकारल्या. त्यांच्या या अभिनय प्रवासात त्यांनी मधुर भंडारकर, रामगोपाल वर्मा, अमोल पालेकर, स्व. राजीव पाटिल, जब्बार पटेल, सतीश आळेकर, विनय आपटे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, अनंत महादेवन या प्रथितयश दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. त्यांना स्व. राजीव पाटिल दिग्दर्शित २००९ साली प्रदर्शित झालेल्या "जोगवा" मधील "तायप्पा"च्या भूमिकेसाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या सोबतच त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.upendralimaye.com या त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.Wednesday, 4 November 2015
सतीश पुळेकर
आज (५ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सतीश पुळेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
सतीश पुळेकर मुख्यतः त्यांच्या नाट्य क्षेत्रातील अभिनयासाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटांमध्ये "सांगाती", "काय राव तुम्ही" , "आभरण", "चार्ली", "येडा", "आम्ही चमकते तारे", "श्री पार्टनर", "गोळा बेरीज", "फक्त लढ म्हणा", "आरम्भ", "आटापिटा", "वैकेशन", "मी मन आणि ध्रुव", "बे दुने साढ़े चार", "विश्वास", "सार कस शांत शांत", "हळद रुसली कुंकु हसली", "अत्याचार" प्रमुख आहे. सतीश पुळेकर त्यांच्या अभिनयासाठी ते प्रसिद्द आहेतच सोबत ते अतिशय चांगले कार्टूनिस्ट आहेत.
Tuesday, 3 November 2015
सोनाली कुलकर्णी
आज (३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

सोनाली कुलकर्णी यांना आपण संवेदनशील अभिनेत्री सोबतच एक संवेदनशील लेखिका म्हणून ही ओळखतो. त्यांनी अनेक वर्षे लोकसत्ताच्या "विवा" या पुरवणीचे संपादन केले, त्यात त्यांनी लिहिलेल्या "सो कूल" या स्तंभावर आधारीत त्यांच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. व्यावसायिक आणि कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट करतांना त्यात योग्य संतुलन त्यांनी साधले आहे. त्यांनी चित्रपट सृष्टितील आपली कारकीर्द गिरीश कर्नाड दिग्दर्शित "चेलुवी" या चित्रपटातून सुरु केली. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. या चित्रपटांमध्ये "अग्निवर्षा", "कितने दूर कितने पास", "कैरी", "घराबाहेर", "जहा तुम ले चलो", "जुनून", "टॅक्सी नंबर ९२११", "डरना जरूरी है", "डॉ. प्रकाश बाबा आमटे", "डॉ. बाबासाहेब आंबेडकर", "दायरा", "दिल चाहता है", "दिल विल प्यार व्यार", "देवराई", "दोघी", "प्यार तूने क्या किया", "ब्राईड अँड प्रेज्युडिस", "मिशन कश्मिर", "मुक्ता", "सखी", "सिंघम" प्रमुख आहे. या वर्षी त्यांची प्रमुख भूमिका असणारा "अग बाई अरेच्या" हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांना "फूॅक सु डी मी" या इटालियन चित्रपटासाठी मिलान अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सावात सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी "खतरों के खिलाड़ी " व "झलक दिखला जा" या रियलिटी शो मध्ये भाग घेऊन आपल्या एक्शन आणि नृत्य कौशल्यासाठी कौतुक मिळवले. त्यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.sonalikulkarni.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Monday, 2 November 2015
किशोर प्रधान
आज (२ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते किशोर प्रधान यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरचा. नागपूरलाच त्यांनी एम ए चे शिक्षण पूर्ण केले. नंतर अभिनयाच्या ओढीमुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. किशोर प्रधान यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांनी मराठी , हिंदी आणि इंग्लिश या तीन ही भाषेत नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. आज वयाच्या ७९ व्या वर्षी ही तरुणांना लाजवेल अश्या उत्साहाने ते कार्यरत आहेत. त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांमध्ये "उचला रे उचला", "कशाला उद्याची बात", "खिचडी़", "गॉड ओन्ली नोज", "छोडो कल की बातें", "जब वी मेट", "डॉक्टर डॉक्टर", "त्याचा बाप तिचा बाप", "नवरा अवली बायको लव्हली", "नवरा माझा ब्रम्हचारी", "नाना मामा", "बाप तिचा बाप", "भिंगरी", "मस्ती एक्सप्रेस", "मास्तर एके मास्तर", "मीराबाई नॉट आउट", "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय", "रफ़्तार", "रानपाखरा", "रूल्स प्यार का सुपरहिट फ़ॉर्म्यूला", "लगे रहो मुन्नाभाई", "लाडीगोडी", "लालबाग परळ", "वन रूम किचन", "वरचा मजला रिकामा त्याचा", "शहाणपण देगा देवा", "शिक्षणाच्या आईचा घो", "शेजारी शेजारी" आणि "सिटी ऑफ गोल्ड" हे चित्रपट प्रमुख आहेत.
अरुण कदम
आज (२ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अरुण कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!अरुण कदम मागील २५ वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. त्यांनी अनेक हिंदी व मराठी भाषेतील चित्रपट, टिवी मालिका आणि नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. त्यांना "ETV मराठी" वरील "कॉमेडी एक्सप्रेस" या मालिकेने नविन ओळख मिळवून दिली. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्याच्या www.arunkadam.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Sunday, 1 November 2015
नवंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस
नवंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस
- २ नवंबर - अरुण कदम (अभिनेता)
- ३ नवंबर - सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री व लेखिका)
- ३ नवंबर - स्व लक्ष्मीकांत बर्डे (अभिनेता)
- ४ नवंबर - मिलिंद सोमण (अभिनेता)
- ७ नवंबर - जयेश चव्हाण (अभिनेता)
- ९ नवंबर - किशोर कदम (अभिनेता, कवी व गीतलेखक)
- ९ नवंबर - सुबोध भावे (अभिनेता)
- १३ नवंबर - अंशुमन विचारे (अभिनेता)
- १६ नवंबर - संदीप कुलकर्णी (अभिनेता)
- १६ नवंबर - श्रीराम लागू (अभिनेता)
- १७ नवंबर - रत्नाकर मतकरी (दिग्दर्शक)
- १७ नवंबर - सुशांत शेलार (अभिनेता)
- १८ नवंबर - अमित अभ्यंकर (दिग्दर्शक)
- १८ नवंबर - नितिनकुमार बोरा (दिग्दर्शक)
- १९ नवंबर - नितिन नायगावकर (लेखक)
- २० नवंबर - अविनाश अरुण(दिग्दर्शक)
- २३ नवंबर - अमृता खानविलकर (अभिनेत्री)
- २४ नवंबर - अमोल पालेकर (दिग्दर्शक व अभिनेता)
- २४ नवंबर - प्रणय तेलंग (दिग्दर्शक)
- २६ नवंबर - विजय शिंदे (दिग्दर्शक)
- २९ नवंबर - नेहा पेंडसे (अभिनेत्री)
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...






