Showing posts with label emotional. Show all posts
Showing posts with label emotional. Show all posts

Friday, 23 September 2016

अलका कुबल आठल्ये

आज (२३ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अलका कुबल आठल्ये यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! कौटुम्बिक मराठी चित्रपटांतील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या अलका कुबल आठल्ये यांच्या "माहेरची साडी" या चित्रपटाने त्या काळात लोकप्रियतेचा कळस गाठला होता. त्यांनी "धनवारवाड़ा" या चित्रपटाची निर्मिती पण केली आहे.  

Saturday, 6 February 2016

परेश मोकाशी

आज (६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! परेश मोकाशी हे आज मराठी चित्रपटसुष्टीतील महत्वाचे दिग्दर्शक आहेत.  त्यांना त्यांच्या "हरिचंद्राची फैक्टरी" या पहिल्या चित्रपटासाठी बराच संघर्ष करावा लागला. हा चित्रपट दादासाहेब फालके यांच्या जीवनावर आधारीत होता. प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक झाले. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवला गेला. "एलिज़ाबेथ एकादशी" हा त्यांचा दूसरा मराठी चित्रपट होता. या चित्रपटाला रसिक आणि समीक्षक दोघांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्करांमध्ये सर्वोकृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला.     

Monday, 9 November 2015

किशोर कदम

आज (९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार, अभिनेते व कवी किशोर कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

ते सौमित्र या टोपण नावाने कविता लिहितात. त्यांचे "जावे कवितांच्या गावा" आणि "... आणि तरीही मी!" हे कवितासंग्रह प्रसिद्द झाले आहेत. त्यांना लिहिलेल्या गीतांचा अल्बम "गारवा" हा खुप गाजला. त्यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित "समर" या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. "नटरंग" या मराठी रवी जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपटातल्या पाण्डोबाच्या भूमिकेने त्यांना नविन ओळख मिळवून दिली. "मम्मो", "लिमिटेड माणुसकी", "संशोधन", "दिल पे मत ले यार", "ध्यासपर्व", "ब्लैक फ्राइडे", "शोभायात्रा", "कॉन्ट्रैक्ट", "फूँक", "एक कप च्या", "जोगवा", "मरेपर्यंत फाशी", "समान्तर", "प्रतिसाद", "बालगंधर्व", "तार्यांचे बेट", "बालक पालक", "हा भारत माझा", "अनुमती", "फँड्री", "रज्जो", "रेला रे", "स्पेशल २६", टूरिंग टॉकीज", "तुह्या धर्म कोणचा?", "अनवट", "मंजुनाथ", "पोस्टकार्ड", "सिद्धांत", "जाणिवा" आणि "हाईवे" या हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "चौर्य", "चिरंजीव", "दमलेल्या बाबाची कहानी", "घंटा", "गणवेश", "इश्क प्रेम लव" आणि  "परतु" या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या प्रत्येक चित्रपटात ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहेत.

Thursday, 10 September 2015

अतुल कुलकर्णी

आज (१० सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नेशनल स्कूल ऑफ़ ड्रामा मधून त्यांनी आपले शिक्षण केले आहे. त्यांनी "कैरी", "ध्यासपर्व", "१०वी फ", "वास्तुपुरुष", "देवराई", "चकवा", "मातीमाय", "वळू", "नटरंग", "प्रेमाची गोष्ट" आणि "हॅपी जर्नी" अशा चित्रपटात अभिनय करून आपली संवेदनशील अभिनेता अशी ओळख पक्की केली आहे. त्यांनी हिंदीमध्ये "हे राम", "चांदनी बार", "दम", "सत्ता", "खाकी", "पेज ३", "रंग दे बसंती" अश्या मोजक्या पण आशयघन चित्रपटात काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी "हे राम" आणि "चांदनी बार" चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

संवेदनशील अभिनयासोबतच संवेदनशील माणूस म्हणून ही त्यांनी आपली ओळख बनवली आहे. वेळोवेळी ते वर्तमानपत्रात अभ्यासपूर्ण लेख लिहून सामाजिक व राजकीय विषयावर आपली मते मांडत असतात. ''क्वेस्ट'' नावाच्या सामाजिक संस्थेद्वारे ते शिक्षणाच्या क्षेत्रात काम करीत आहेत. या संस्थेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही www.quest.org.in वेबसाईटला भेट देऊ शकता. अतुल कुलकर्णी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.atulkulkarni.com ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता.

किरण नाटकी