आज (१६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गजेन्द्र अहिरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गजेन्द्र अहिरे मागील तीन दशकांपासून नाटक, टीवी व चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी ''विठ्ठल विठ्ठल'', ''नॉट ओनली मिसेस राउत'', ''सरीवर सरी'', ''सैल'', ''सावर रे'', ''त्या रात्री पाऊस होता'',''नातिगोती'', ''दिवसानं दिवस'', ''बयो'', ''शेवरी'', ''एक क्रांतिवीर - वासुदेव बलवंत फड़के'', ''गुलमोहर'', सुम्भराण'', ''पारध'', ''समुद्र'', ''एका शब्दात सांगतो'', ''हैल्लो जयहिन्द'', ''पिपानी'', ''टूरिंग टॉकीज'', ''अनुमति'', ''पोस्टकार्ड'', ''अनवट'', ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' सारखे वेगवेगळ्या सामाजिक विषयावर आशयपूर्ण व सुन्दर चित्रपट बनवले आहे. अतिशय कमी वेळात चित्रपट बनवण्यासाठी ते प्रसिद्ध असेल तरी त्यांचा प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव असतो. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''नीलकंठ मास्टर'' व ''टाच'' या चित्रपटाचा समावेश आहे.
Showing posts with label national film award. Show all posts
Showing posts with label national film award. Show all posts
Tuesday, 16 February 2016
गजेन्द्र अहिरे
आज (१६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गजेन्द्र अहिरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गजेन्द्र अहिरे मागील तीन दशकांपासून नाटक, टीवी व चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी ''विठ्ठल विठ्ठल'', ''नॉट ओनली मिसेस राउत'', ''सरीवर सरी'', ''सैल'', ''सावर रे'', ''त्या रात्री पाऊस होता'',''नातिगोती'', ''दिवसानं दिवस'', ''बयो'', ''शेवरी'', ''एक क्रांतिवीर - वासुदेव बलवंत फड़के'', ''गुलमोहर'', सुम्भराण'', ''पारध'', ''समुद्र'', ''एका शब्दात सांगतो'', ''हैल्लो जयहिन्द'', ''पिपानी'', ''टूरिंग टॉकीज'', ''अनुमति'', ''पोस्टकार्ड'', ''अनवट'', ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' सारखे वेगवेगळ्या सामाजिक विषयावर आशयपूर्ण व सुन्दर चित्रपट बनवले आहे. अतिशय कमी वेळात चित्रपट बनवण्यासाठी ते प्रसिद्ध असेल तरी त्यांचा प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव असतो. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''नीलकंठ मास्टर'' व ''टाच'' या चित्रपटाचा समावेश आहे. Saturday, 6 February 2016
परेश मोकाशी
आज (६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! परेश मोकाशी हे आज मराठी चित्रपटसुष्टीतील महत्वाचे दिग्दर्शक आहेत. त्यांना त्यांच्या "हरिचंद्राची फैक्टरी" या पहिल्या चित्रपटासाठी बराच संघर्ष करावा लागला. हा चित्रपट दादासाहेब फालके यांच्या जीवनावर आधारीत होता. प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक झाले. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवला गेला. "एलिज़ाबेथ एकादशी" हा त्यांचा दूसरा मराठी चित्रपट होता. या चित्रपटाला रसिक आणि समीक्षक दोघांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्करांमध्ये सर्वोकृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला.
Wednesday, 30 September 2015
सतीश मनवर
आज (३० सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सतीश मनवर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
मराठी चित्रपट सृष्टीतील संवेदनशील दिग्दर्शक सतीश मनवर यांनी त्यांची सामाजिक विषयाची जाण त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. २००९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट "गाभ्रीचा पाऊस" प्रदर्शित झाला. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यावर आधारित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि ज्योती सुभाष असे कलावंत होते. या चित्रपटाला अंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले. आज सामाजिक विषयावर आधारित चांगल्या मराठी चित्रपटांमध्ये "गाभ्रीचा पाऊस"चे नाव आवर्जून घेतल्या जाते.
त्यांचा दूसरा चित्रपट उपेन्द्र लिमये व विभावरी देशपांडे अभिनीत ''तुह्या धर्म कोंणचा" हा होता. हा चित्रपट आदिवासी समाजात असलेल्या धर्मांतराच्या समस्येवर आधारित होता. या चित्रपटाला २०१४ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "सामाजिक विषयावरचा सर्वोकृष्ट चित्रपटा"चा पुरस्कार मिळाला आहे.
Thursday, 10 September 2015
अतुल कुलकर्णी
आज (१० सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अतुल
कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नेशनल स्कूल ऑफ़ ड्रामा मधून त्यांनी आपले शिक्षण केले आहे.
त्यांनी "कैरी", "ध्यासपर्व", "१०वी
फ", "वास्तुपुरुष", "देवराई", "चकवा", "मातीमाय",
"वळू", "नटरंग", "प्रेमाची गोष्ट" आणि "हॅपी
जर्नी" अशा चित्रपटात अभिनय करून आपली संवेदनशील अभिनेता अशी ओळख पक्की केली आहे.
त्यांनी हिंदीमध्ये "हे
राम", "चांदनी
बार", "दम", "सत्ता", "खाकी", "पेज ३", "रंग दे बसंती" अश्या मोजक्या
पण आशयघन चित्रपटात काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली
आहे. त्यापैकी "हे राम" आणि "चांदनी बार" चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार
प्राप्त झाला आहे. संवेदनशील अभिनयासोबतच संवेदनशील माणूस म्हणून ही त्यांनी आपली ओळख बनवली आहे. वेळोवेळी ते वर्तमानपत्रात अभ्यासपूर्ण लेख लिहून सामाजिक व राजकीय विषयावर आपली मते मांडत असतात. ''क्वेस्ट'' नावाच्या सामाजिक संस्थेद्वारे ते शिक्षणाच्या क्षेत्रात काम करीत आहेत. या संस्थेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही www.quest.org.in वेबसाईटला भेट देऊ शकता. अतुल कुलकर्णी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.atulkulkarni.com ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...

