आज (२३ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "द्रोह काल", "सलमा पे दिल
गया है", "दो राहें", "ज़ोर", "विरासत", "हज़ार चौरासी
की माँ", "ज़ुल्म-ओ-सितम", "त्रिशक्ति", "गॉडमदर", "ज़ुल्मी", "ज़िन्दगी
ज़िन्दाबाद", "जिस देश में
गंगा रहता है", "मुलाकात", "अंश", "देवदास", "देव", "असंभव", "मिस्टर प्राइम
मिनिस्टर", "ताजमहल", आणि "एलान" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. सोबतच त्यांना पर्यटनाची पण विशेष आवड आहे. याच विषयावर त्यांनी पुस्तके पण लिहिली आहे. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.milindgunaji.in या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
Showing posts with label hindi. Show all posts
Showing posts with label hindi. Show all posts
Saturday, 23 July 2016
Monday, 4 April 2016
पल्लवी जोशी
आज (४ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी कला आणि व्यावसायिक चित्रपटात अभिनय केला आहे. त्यापैकी “अंधा युद्ध”, “आदमी सडक का”,
“तहलका”, “तृषाग्नी”, “दादा”, “पनाह”,
“बदला”, “मुजरीम”, “मेकिंग ऑफ
द महात्मा”, “रिटा”, “रिहाई”, “रुक्मावती की हवेली”,
“वंचित”, “वो छोकरी”, “सुरज
का सातवा घोडा” आणि “सौदागर” प्रमुख आहे. त्यापैकी त्या सूत्रसंचालक म्हणून पण प्रसिद्द आहेत. त्यांनी काही मालिकांची निर्मिती पण केली आहे.
Monday, 28 March 2016
Friday, 19 February 2016
अवधूत गुप्ते
आज (१९ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठीतील प्रसिद्द संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी आपली ओळख आता दिग्दर्शक म्हणून पक्की केली आहे. "झेंडा", "मोरय्या", "जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा" आणि "एक तारा" या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. संगीत दिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शना सोबतच टीवीवर "सा रे गा मा" या शोचा परीक्षक आणि "खुपते तिथे गुप्ते" चे सूत्र संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती साठी तुम्ही त्यांच्या www.avadhootgupte.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Labels:
album,
avadhoot gupte,
director,
ek tara,
hindi,
host,
jay maharastra dhaba bhatinda,
khupte tithe gupte,
marathi,
morayya,
music,
performer,
rocking,
sa re ga ma p,
singer,
songs,
stage show,
tv,
zenda
Friday, 8 January 2016
सागरिका घाटगे
आज (८ जानेवारी) हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सागरिका घाटगे यांनी चक दे इंडिया या हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनय यात्रेला सुरवात केली. हॉकी या खेळावर आधारित या चित्रपटात शाहरुख़ खान मुख्य भूमिकेत होते सोबतच हॉकी टीम ची गोष्ट असल्यामुळे अनेक अभिनेत्रींच्या भूमिका होत्या पण आपल्या पहिल्याच चित्रपटातून सागरिका प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरल्या. २०१३ साली प्रेमाची गोष्ट या सतीश राजवाडे दिग्दर्शित चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सुष्टित यशस्वी पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्या सोबत अतुल कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका होती. अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांचा दमदार अभिनय, फ्रेश स्टोरी, फ्रेश लुक आणि सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन या मुळे "प्रेमाची गोष्ट" ची भट्टी छान जमली. हा चित्रपटही टिकिट खिडकीवर बर्यापैकी यशस्वी झाला. माझ्या आवडत्या मराठी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. सागरिका घाटगे यांनी अभिनय केलेले चित्रपट
- चक दे इंडिया (२००७)
- फॉक्स (२००९)
- मिले ना मिले हम (२०११)
- रश (२०१२)
- प्रेमाची गोष्ट (२०१३)
- जी भर के जी ले (२०१५)
- दिलदारियाँ (२०१५)
Saturday, 12 December 2015
भरत जाधव
आज (१२ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली. नंतर त्यांना "सही रे सही" नाटकातून ओळख मिळाली. त्यांच्या इतर नाटकांमध्ये "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल द बेस्ट", "आमच्या सारखे आम्हीच" आणि "ढॅण्ट ढॅण" या नाटकांचा समावेश आहे. नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. या जोडीनी अनेक यशस्वी नाटके व चित्रपट दिले आहेत. भरत जाधव हे त्यांच्या कॉमिक टाइमिंग साठी ओळखले जातात. "चिरंजीव" या त्यांच्या येणाऱ्या चित्रपटात ते अत्यंत वेगळया भूमिकेत दिसणार आहे. भरत जाधव यांनी अभिनय केलेले चित्रपट
- वास्तव (१९९९)
- खतरनाक (२०००)
- प्राण जाये पर शान न जाये (२००३)
- हाऊस फुल्ल (२००४)
- नव-याची कमाल बायकोची धमाल (२००४)
- खबरदार (२००५)
- पछाडलेला (२००५)
- सरीवर सर (२००५)
- माझा नवरा तुझी बायको (२००६)
- नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
- जत्रा (२००६)
- चालू नवरा भोळी बायको (२००६)
- गोलमाल (२००६)
- मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
- बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
- गलगले निघाले (२००८)
- साडे माडे तीन (२००८)
- गोंद्या मारतंय तंगडं (२००८)
- लग्नाची वरात लंडनच्या घरात (२००९)
- क्षणभर विश्रांती (२०१०)
- टाटा बिरला आणि मैना (२०१०)
- शिक्षणाच्या आयच्या घो (२०१०)
- जावई बापू जिंदाबाद (२०१०)
- झक मारली बायको केली (२०१०)
- बम बम बोले (२०१०)
- डावपेच (२०११)
- शहाणपण देगा देवा ! (२०११)
- झिंग चिक झिंग (२०११)
- फक्त लढ म्हणा (२०११)
- बाबुरावला पकडा (२०१२)
- नो एंट्री - पुढे धोका आहे (२०१२)
- दम असेल तर (२०१२)
- खो-खो (२०१२)
- येड्यांची जत्रा (२०१२)
- पुणे व्हाया बिहार (२०१३)
- सत ना गत (२०१३)
- श्रीमंत दामोदर पंत (२०१३)
- अग बाई अरेच्या २ (२०१५)
- पी से पी एम तक (२०१५)
Monday, 16 November 2015
संदीप कुलकर्णी
आज (१६ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. मराठी चित्रपट सुष्टिला वेगळे वळण देणाऱ्या "श्वास" आणि "डोम्बिवली फास्ट" या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठी चित्रपटाला अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ते उत्तम चित्रकार ही आहेत. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "डोम्बिवली रिटर्न" या चित्रपटाचा समावेश आहे.
संदीप कुलकर्णी यांनी अभिनय केलेले चित्रपट
- मामू (१९९४)
- हजार चौरसी की माँ (१९९८)
- शूल (१९९९)
- श्वास (२००४)
- डोंबिवली फास्ट (२००५)
- अधांतरी (२००५)
- माय बाप (२००६)
- राजकारण (२००७)
- एक डाव संसाराचा (२००८)
- बेधुंद (२००८)
- गैर (२००९)
- मेड इन चायना (२००९)
- वेटिंग रूम (२००९)
- प्रतिसाद (२०१०)
- आनंदाचे अंकगणित (२०१०)
- निर्वाना १३ (२०११)
- डी डे (२०१३)
- प्रेमसूत्र (२०१३)
- अजिंक्य (२०१३)
श्रीराम लागू
आज (१६ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते श्रीराम लागू यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! श्रीराम लागू हे भारतीय रंगभूमीवरील उत्कृष्ट नटापैकी आहेत, सोबतच त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. अनेक वर्षांनंतर मागील वर्षी त्यांनी "नागरीक" या चित्रपटात अभिनय केला. ते सामाजिक कार्यासोबत जुळले असून ते पुरोगामी विचारसरणीचे समर्थक आहेत. त्यांनी "लमाण" नावाने आपले आत्मचरित्र लिहिले आहे.
श्रीराम लागू यांनी अभिनय केलेले चित्रपट
- पिंजरा (१९७२)
- मेरे साथ चल (१९७४)
- सामना (१९७४)
- पोंगा पंडित (१९७५)
- बुलेट (१९७६)आखरी मुजरा (१९८१)
- चलते चलते (१९७६)
- हेराफेरी (१९७६)
- अगर... इफ (१९७७)
- इनकार (१९७७)
- ईमान धर्म (१९७७)
- किताब (१९७७)
- घरोंदा (१९७७)
- शंकर हुसेन (१९७७)
- कॉलेज गर्ल (१९७८)
- दामाद (१९७८)
- देस परदेस (१९७८)
- देवता (१९७८)
- नया दौर (१९७८)
- फूल खिले हैं गुलशन गुलशन (१९७८)
- मुकद्दर का सिकंदर (१९७८)
- मेरा रक्षक (१९७८)
- शालीमार (१९७८)
- साजन बिना सुहागन (१९७८)
- जुर्माना (१९७९)
- तराना (१९७९)
- दूरीयाँ (१९७९)
- मगरूर (१९७९)
- मंज़िल (१९७९)
- मीरा (१९७९)
- मुकाबला (१९७९)
- सरगम (१९७९)
- हम तेरे आशिक हैं (१९७९)
- इंसाफ़ का तराजू (१९८०)
- गहराई (१९८०)
- ज्योति बने ज्वाला (१९८०)
- ज्वालामुखी (१९८०)
- झाकोळ (१९८०)
- थोडीसी बेवफाई (१९८०)
- दो और दो पाँच (१९८०)
- 'नीयत (१९८०)
- बिन माँ के बच्चे (१९८०)
- लूटमार (१९८०)
- सिंहासन (१९८०)
- स्वयंवर (१९८०)
- अग्निपरीक्षा (१९८१)
- अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)
- घुँघरूकी आवाज़ (१९८१)
- चेहरे पे चेहरा (१९८१)
- ज़माने को दिखाना है (१९८१)
- प्रोफेसर प्यारेलाल (१९८१)
- लावारिस (१९८१)
- सनसनी: द सेन्सेशन (१९८१)
- आपली माणसं (१९८२)
- कामचोर (१९८२)
- गजब (१९८२)
- गाँधी (१९८२)
- चोरनी (१९८२)
- दिल ही दिल में (१९८२)
- दीदार-ए-यार (१९८२)
- दौलत (१९८२)
- मैं इन्तकाम लूँगा (१९८२)
- रास्ते प्यार के (१९८२)
- श्रीमान श्रीमती (१९८२)
- सम्राट (१९८२)
- कलाकार (१९८३)
- गुपचुप गुपचुप (१९८३)
- चटपटी (१९८३)
- पुकार (१९८३)
- मवाली (१९८३)
- मुझे इंसाफ़ चाहिए (१९८३)
- सदमा (१९८३)
- सौंतन (१९८३)
- हम से है ज़माना (१९८३)
- तरंग (१९८४)
- बद और बदनाम (१९८४)
- मकसद (१९८४)
- मेरी अदालत (१९८४)
- लव मैरिज (१९८४)
- होली (१९८४)
- अनकही (१९८५)
- किशन कन्हैया (१९९० )
- घरद्वार (१९८५)
- सरफ़रोश (१९८५)
- सितमगर (१९८५)
- हम नौजवान (१९८५)
- एक पल (१९८६)
- काला धंदा गोरे लोग (१९८६)
- घर संसार (१९८६)
- जीवा (१९८६)
- दिलवाला (१९८६)
- लॉकेट (१९८६)
- समय की धारा (१९८६)
- सवेरे वाली गाड़ी (१९८६)
- आवाम (१९८७)
- मर्द की ज़बान (१९८७)
- मेरा कर्म मेरा धर्म (१९८७)
- शेर शिवाजी (१९८७)
- तमाचा (१९८८)
- नामुमकीन (१९८८)
- इक दिन अचानक (१९८९)
- काला बाज़ार (१९८९)
- गलियों का बादशाह (१९८९)
- तौहेँ (१९८९)
- दाना पानी (१९८९)
- किनारा (१९७७)
- दुश्मन देवता (१९९१)
- फूलवती (१९९१)
- औरत तेरी यही कहानी (१९९२)
- करंट (१९९२)
- नसीबवाला (१९९२)
- माया (१९९२)
- सरफिरा (१९९२)
- प्यार का तराना (१९९३)
- बडी बहन (१९९३)
- खुद्दार (१९९४)
- गोपाल (१९९४)
- मुक्ता (१९९४)
- आज का ये घर (१९७६)
- आतंक (१९९६)
- हाहाकार (१९९६)
- ध्यासपर्व (२००१)
- नागरीक (२०१५)
Friday, 13 November 2015
अंशुमन विचारे
आज (१३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अंशुमन विचारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंशुमन विचारे यांनी खुप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे. दूरदर्शन वरील "चालता बोलता" आणि जी मराठी वरील "फु बाई फु" या कार्यक्रमातून ते घरा घरात पोहचले. "फु बाई फु" च्या एका पर्वाचे ते विजेते ठरले. त्यांनी "हंगामा", "स्वराज्य - मराठी पाऊल पडते पुढे", "संघर्ष", "पोस्टर बॉयज" आणि "परतु" या चित्रपटातून अभिनय केला आहे.
Monday, 2 November 2015
किशोर प्रधान
आज (२ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते किशोर प्रधान यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरचा. नागपूरलाच त्यांनी एम ए चे शिक्षण पूर्ण केले. नंतर अभिनयाच्या ओढीमुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. किशोर प्रधान यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांनी मराठी , हिंदी आणि इंग्लिश या तीन ही भाषेत नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. आज वयाच्या ७९ व्या वर्षी ही तरुणांना लाजवेल अश्या उत्साहाने ते कार्यरत आहेत. त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांमध्ये "उचला रे उचला", "कशाला उद्याची बात", "खिचडी़", "गॉड ओन्ली नोज", "छोडो कल की बातें", "जब वी मेट", "डॉक्टर डॉक्टर", "त्याचा बाप तिचा बाप", "नवरा अवली बायको लव्हली", "नवरा माझा ब्रम्हचारी", "नाना मामा", "बाप तिचा बाप", "भिंगरी", "मस्ती एक्सप्रेस", "मास्तर एके मास्तर", "मीराबाई नॉट आउट", "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय", "रफ़्तार", "रानपाखरा", "रूल्स प्यार का सुपरहिट फ़ॉर्म्यूला", "लगे रहो मुन्नाभाई", "लाडीगोडी", "लालबाग परळ", "वन रूम किचन", "वरचा मजला रिकामा त्याचा", "शहाणपण देगा देवा", "शिक्षणाच्या आईचा घो", "शेजारी शेजारी" आणि "सिटी ऑफ गोल्ड" हे चित्रपट प्रमुख आहेत.
Thursday, 29 October 2015
राजेश श्रृंगारपुरे
आज (२९ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते राजेश श्रृंगारपुरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! राजेश श्रृंगारपुरे आपल्या भारदस्त आवाजासाठी आणि पिळदार शरीरयष्टी ओळखले जातात. त्यांनी रामगोपाल वर्मा यांच्या ''सरकार राज" मध्ये महत्वाची भूमिका साकरली होती. त्यानंतर अवधूत गुप्ते यांच्या "झेंडा" या मराठी चित्रपटात राज ठाकरे यांच्याशी साम्य असणारी भूमिका केल्याने ते प्रकाश झोतात आले होते. ते सातत्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये व्यस्त असतात, त्याचाच जोडीला "सील टीम सिक्स" हि हॉलीवुड टीवी मालिका पण त्यांनी केलिय. या वर्षी त्यांचे "युद्ध" आणि "शार्ट कट" हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. Tuesday, 13 October 2015
कादंबरी कदम
आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री कादंबरी कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! कादंबरी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी मालिकांमध्ये ही व्यस्त असतात. "कभी सौतन कभी
सहेली" हि त्यांची पहिली हिंदी टिवी मालिका होती यानंतर त्यांनी "कहता दिल", "तीन बहुरानियाँ" आणि "संस्कार धरोहर अपनों की" या हिंदी मालिकांमधून भूमिका केल्या व लोकप्रियता मिळवली. "अजिंक्य", "आघात", "तुला शिकवीन चांगलाच
धडा", "पटलं तर घ्या", "मंगलाष्टक वन्स मोअर", "ही पोरगी कुणाची", "क्षणभर विश्रांती" हे त्यांचे प्रमुख मराठी चित्रपट आहेत.Sunday, 11 October 2015
निशिगंधा वाड
आज प्रसिद्द अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!! निशिगंधा वाड यांनी या मराठी कौटुम्बिक चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्द आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून काम केले आहे. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये "वाजवा रे वाजवा", "शेजारी शेजारी", "एकापेक्षा एक", "प्रतिकार", "बंधन", "कर्मयोद्धा", "बाळा जो जो रे", "जन्मदाता", "सलीम लंगडे पे मत रो", "सासर माहेर", "दादागिरी", "अशी ही ज्ञानेश्वरी", "आप मुझे अच्छे लगने लगे", "तुमको ना भूल पायेंगे", "दिवानगी", "शापित", "रोक", "लाइफ में कभी कभी" आणि "अलीबाबा और चालीस चोर" प्रमुख आहेत. अभिनया सोबतच त्यांना संशोधनाचीही आवड आहे. त्यांच्या प्रबंधासाठी त्यांना मुंबई विद्यापीठातून पीएचडी प्राप्त झाली आहे. त्या "चार चौघी" या मराठी मासिकाशी जुळल्या होत्या.
Wednesday, 7 October 2015
रवीन्द्र महाजनी
आज (७ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते रवीन्द्र महाजनी यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
सत्तरच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तीमत्वामुळे रविन्द्र महाजनी मराठी चित्रपट सृष्टितील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जायचे. त्यांनी मराठी सोबतच काही हिंदी आणि गुजराती चित्रपटात पण अभिनय केला आहे. मराठीमध्ये त्यांनी ''जुलुम" या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. "आराम हराम आहे", "मरी हेल उतारो राज", "दुनिया करी सलाम", "तीन चेहरे", "चोरावर मोर", "गोंधळात गोंधळ", "लक्ष्मीचे पाऊले", "बेआबरू", "मुंबईचा फौजदार", "बढ़कर", "गंगा किनारे", "नैन मिले चैन कहाँ", "कानून कानून है", "वहम" आणि "गूंज" हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत. या वर्षी त्यांनी ''काय राव तुम्ही" या चित्रपटातून मराठी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. त्यांचे चिरंजीव गश्मीर महाजनी यांनी या वर्षी चित्रपट सृष्टित पदार्पण केले असून ते सुद्धा वडिलाच्या पाऊलवाटेवर यशस्वीपणे पुढे जात आहेत.
सत्तरच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तीमत्वामुळे रविन्द्र महाजनी मराठी चित्रपट सृष्टितील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जायचे. त्यांनी मराठी सोबतच काही हिंदी आणि गुजराती चित्रपटात पण अभिनय केला आहे. मराठीमध्ये त्यांनी ''जुलुम" या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. "आराम हराम आहे", "मरी हेल उतारो राज", "दुनिया करी सलाम", "तीन चेहरे", "चोरावर मोर", "गोंधळात गोंधळ", "लक्ष्मीचे पाऊले", "बेआबरू", "मुंबईचा फौजदार", "बढ़कर", "गंगा किनारे", "नैन मिले चैन कहाँ", "कानून कानून है", "वहम" आणि "गूंज" हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत. या वर्षी त्यांनी ''काय राव तुम्ही" या चित्रपटातून मराठी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. त्यांचे चिरंजीव गश्मीर महाजनी यांनी या वर्षी चित्रपट सृष्टित पदार्पण केले असून ते सुद्धा वडिलाच्या पाऊलवाटेवर यशस्वीपणे पुढे जात आहेत.
Saturday, 3 October 2015
सुनील बर्वे
आज (३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुनील बर्वे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
नाटक, टीवी मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे सुनील बर्वे मागील २५ पेक्षा अधिक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. सुनील बर्वे यांनी आपल्या अभिनय यात्रेची सुरवात "अफलातून" या नाटकातून केली, त्यानंतर त्यांनी "मोरूची मावशी", "कशी मी राहू तशीच", "वन रूम किचन", "चार चौघी", "म्हणून मी तुला कुठे नेत नाही", "ह्यांना जमतं तरी कसं", "असेच आम्ही सारे", "हेलो इन्स्पेक्टर", "श्री तशी सौ", "बायकोच्या नकळतच", "हिच तर प्रेमाची गंमत आहे", "मासिबा" आणि "ऑल द बेस्ट" अशा मराठी, गुजराती आणि इंग्लिश नाटकांमधून भूमिका केल्या. "सुबक" या संस्थेची स्थापना करून द्वारे ते नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. "हर्बेरियम" हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरु केला त्यात त्यांनी गाजलेल्या जुन्या ५ नाटकांना नवीन स्वरुपात प्रेक्षकांच्या समोर आणले. यातील सर्वच नाटकांचे मोजके २५ प्रयोग करण्यात आले. यापैकी "झोपी गेलेला जागा झाला" हे नाटक नागपूरला बघण्याची संधी मला मिळाली. "हर्बेरियम" या उपक्रमातील अनुभवावर आधारित याच नावाने पुस्तकही त्यांनी लिहिले असून तारांगण प्रकाशन ने ते प्रकाशित केले आहे.
नाटक, टीवी मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे सुनील बर्वे मागील २५ पेक्षा अधिक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. सुनील बर्वे यांनी आपल्या अभिनय यात्रेची सुरवात "अफलातून" या नाटकातून केली, त्यानंतर त्यांनी "मोरूची मावशी", "कशी मी राहू तशीच", "वन रूम किचन", "चार चौघी", "म्हणून मी तुला कुठे नेत नाही", "ह्यांना जमतं तरी कसं", "असेच आम्ही सारे", "हेलो इन्स्पेक्टर", "श्री तशी सौ", "बायकोच्या नकळतच", "हिच तर प्रेमाची गंमत आहे", "मासिबा" आणि "ऑल द बेस्ट" अशा मराठी, गुजराती आणि इंग्लिश नाटकांमधून भूमिका केल्या. "सुबक" या संस्थेची स्थापना करून द्वारे ते नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. "हर्बेरियम" हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरु केला त्यात त्यांनी गाजलेल्या जुन्या ५ नाटकांना नवीन स्वरुपात प्रेक्षकांच्या समोर आणले. यातील सर्वच नाटकांचे मोजके २५ प्रयोग करण्यात आले. यापैकी "झोपी गेलेला जागा झाला" हे नाटक नागपूरला बघण्याची संधी मला मिळाली. "हर्बेरियम" या उपक्रमातील अनुभवावर आधारित याच नावाने पुस्तकही त्यांनी लिहिले असून तारांगण प्रकाशन ने ते प्रकाशित केले आहे.
सचिन पिळगावकर दिग्दर्शित ''आत्मविश्वास" हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर त्यांनी "सुगंध", "तू तिथे मी", "पाश", "आहुती", "लपंडाव", "जमल हो जमल", "आई", "तन्नू कि टिना", "निदान", "अस्तित्व", "दिवसेंदिवस", "आनंदाचे झाड", "सुर राहु दे", "गोजिरी", "तूच खरी घरची लक्ष्मी", "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" या चित्रपटात अभिनय केला आहे. या वर्षी त्यांचे "प्राइम टाइम" आणि "हायवे" हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
नाटक आणि चित्रपटांसोबतच अनेक मराठी, हिंदी आणि गुजराती मलिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे, या मलिकांमध्ये ''कुंकू", "कळत नकळत", "असंभव", "अभी तो मै जवान हु", "अधांतरी", "अवंती", "अवंतिका", "आवाज", "बोलाची कढी", "चाळ नावाची वाचाळ वस्ती", "छैल छबीला", "चतुराई", "गोष्ट एका आनंदची", "हे सारे संचीताचे", "इमारत", "जावई शोध", "झोका", "झुट्न जरीवाला", "ज्योति", "कर्तव्य", "कौन अपना कौन पराया", "कोई सुरत नजर नही आती", "कोरा कागज", "नायक", "प्रपंच", "प्रो. प्यारेलाल", "रिमझीम", "सप्तर्शी", "श्रीयुत गंगाधर टिपरे", "स्वयंम", "थरार", "त्रेधा तिरपिट" आणि "वाळवाचा पाऊस" या मालिकांचा समावेश आहे.
त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.sunilbarve.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Monday, 28 September 2015
लता मंगेशकर
आज (२८ सप्टेम्बर) भारतरत्न लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
मागील सात दशकांपासून लताजी भारतीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या सुमधुर आवाजाने अधिराज्य गाजवत आहेत. त्यांना २००१ साली त्यांच्या भारतीय संगीत सृष्टीतील योगदानासाठी "भारतरत्न" या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यांना ''लता दीदी" या नावाने ओळखले जाते. लता दीदीने आपल्या बालपणी संगीत नाटकात बाल कलाकार म्हणून कामाला सुरवात केली. मास्टर विनायक यांनी त्यांना आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली व त्यातील गाणी खुप गाजली. त्यानंतर हिंदी चित्रपटांमध्ये त्या काळच्या सर्वच दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले.
महेश कोठारे
आज (२८ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
महेश कोठारे यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील वाटचालीची सुरवात बालकलाकार म्हणून केली. "धूम धडाका" हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता, या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्यानंतर त्यांनी "दे दणा दण", "थरथराट", "धडाकेबाज", "जीवलगा", "झपाटलेला", "माझा छकुला", "धांगडधिंगा", "खतरनाक", "चिमणी पाखरं", "पछाडलेला", "खबरदार", "शुभमंगल सावधान", "जबरदस्त", "वेड लावी जीवा", "दुभंग" आणि "झपाटलेला २" हे चित्रपट दिग्दर्शित केले आहे. या मध्ये त्यांनी लक्ष्मीकांत बर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी छान जमली. त्यांच्या "छकुला" या चित्रपटावरच आधारित "मासूम" या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन ही त्यांनी केले. दिग्दर्शनबरोबरच त्यांनी चित्रपटात अनेक भूमिका पण केल्या, त्यात विशेष म्हणजे त्यांना इंस्पेक्टर भूमिकांसाठी ओळखले जाते.
महेश कोठारे यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील वाटचालीची सुरवात बालकलाकार म्हणून केली. "धूम धडाका" हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता, या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्यानंतर त्यांनी "दे दणा दण", "थरथराट", "धडाकेबाज", "जीवलगा", "झपाटलेला", "माझा छकुला", "धांगडधिंगा", "खतरनाक", "चिमणी पाखरं", "पछाडलेला", "खबरदार", "शुभमंगल सावधान", "जबरदस्त", "वेड लावी जीवा", "दुभंग" आणि "झपाटलेला २" हे चित्रपट दिग्दर्शित केले आहे. या मध्ये त्यांनी लक्ष्मीकांत बर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी छान जमली. त्यांच्या "छकुला" या चित्रपटावरच आधारित "मासूम" या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन ही त्यांनी केले. दिग्दर्शनबरोबरच त्यांनी चित्रपटात अनेक भूमिका पण केल्या, त्यात विशेष म्हणजे त्यांना इंस्पेक्टर भूमिकांसाठी ओळखले जाते. Thursday, 10 September 2015
अतुल कुलकर्णी
आज (१० सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अतुल
कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नेशनल स्कूल ऑफ़ ड्रामा मधून त्यांनी आपले शिक्षण केले आहे.
त्यांनी "कैरी", "ध्यासपर्व", "१०वी
फ", "वास्तुपुरुष", "देवराई", "चकवा", "मातीमाय",
"वळू", "नटरंग", "प्रेमाची गोष्ट" आणि "हॅपी
जर्नी" अशा चित्रपटात अभिनय करून आपली संवेदनशील अभिनेता अशी ओळख पक्की केली आहे.
त्यांनी हिंदीमध्ये "हे
राम", "चांदनी
बार", "दम", "सत्ता", "खाकी", "पेज ३", "रंग दे बसंती" अश्या मोजक्या
पण आशयघन चित्रपटात काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली
आहे. त्यापैकी "हे राम" आणि "चांदनी बार" चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार
प्राप्त झाला आहे. संवेदनशील अभिनयासोबतच संवेदनशील माणूस म्हणून ही त्यांनी आपली ओळख बनवली आहे. वेळोवेळी ते वर्तमानपत्रात अभ्यासपूर्ण लेख लिहून सामाजिक व राजकीय विषयावर आपली मते मांडत असतात. ''क्वेस्ट'' नावाच्या सामाजिक संस्थेद्वारे ते शिक्षणाच्या क्षेत्रात काम करीत आहेत. या संस्थेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही www.quest.org.in वेबसाईटला भेट देऊ शकता. अतुल कुलकर्णी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.atulkulkarni.com ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता.
Monday, 7 September 2015
राधिका आपटे
आज (७ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री
राधिका आपटे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
अतिशय कमी त्यांनी आपल्या प्रगल्भ अभिनयाने सर्व चित्रपट रसिकांची मने
जिंकून घेतली आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी बरोबर बंगाली, तेलगू, तामिल,
मलयालम आणि इंग्लिश भाषेतील चित्रपटात काम करून खुप कमी वेळात अखिल भारतीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ''वाह !!! लाइफ हो तो ऐसी'' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
निशिकांत कामत दिग्दर्शित ''लई भारी'' या चित्रपटातून त्यांनी मराठी
चित्रपट सृष्टीत आपली नवीन ओळख निर्माण केली. या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ''बदलापूर'', ''हंटर'' आणि ''मांझी'' या चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या आणि सशक्त भूमिका साकारल्या व हे सर्व चित्रपट टिकिट खिडकीवर यशस्वी झाले हे सुद्धा विशेष.
Friday, 4 September 2015
मोहन जोशी
आज (४ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मोहन
जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नाटक, चित्रपट आणि टिवी मालिका या तीन हि क्षेत्रात हुकूमत असणार अस हे व्यक्तिमत्व आहे.हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या खलनायकाच्या भूमिका विशेष गाजल्या. ते सध्या मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...







