आज (१८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! डॉ अमोल कोल्हे यांना स्टार प्रवाह वरील मालिका "राजा शिव छत्रपती" मध्ये छत्रपती महाराजांच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. सोबतच ते उत्तम निवेदक आणि वक्ते आहेत. ते शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत.
Showing posts with label tv serial. Show all posts
Showing posts with label tv serial. Show all posts
Tuesday, 18 October 2016
डॉ अमोल कोल्हे
आज (१८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! डॉ अमोल कोल्हे यांना स्टार प्रवाह वरील मालिका "राजा शिव छत्रपती" मध्ये छत्रपती महाराजांच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. सोबतच ते उत्तम निवेदक आणि वक्ते आहेत. ते शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत. Saturday, 12 December 2015
भरत जाधव
आज (१२ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली. नंतर त्यांना "सही रे सही" नाटकातून ओळख मिळाली. त्यांच्या इतर नाटकांमध्ये "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल द बेस्ट", "आमच्या सारखे आम्हीच" आणि "ढॅण्ट ढॅण" या नाटकांचा समावेश आहे. नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. या जोडीनी अनेक यशस्वी नाटके व चित्रपट दिले आहेत. भरत जाधव हे त्यांच्या कॉमिक टाइमिंग साठी ओळखले जातात. "चिरंजीव" या त्यांच्या येणाऱ्या चित्रपटात ते अत्यंत वेगळया भूमिकेत दिसणार आहे. भरत जाधव यांनी अभिनय केलेले चित्रपट
- वास्तव (१९९९)
- खतरनाक (२०००)
- प्राण जाये पर शान न जाये (२००३)
- हाऊस फुल्ल (२००४)
- नव-याची कमाल बायकोची धमाल (२००४)
- खबरदार (२००५)
- पछाडलेला (२००५)
- सरीवर सर (२००५)
- माझा नवरा तुझी बायको (२००६)
- नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
- जत्रा (२००६)
- चालू नवरा भोळी बायको (२००६)
- गोलमाल (२००६)
- मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
- बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
- गलगले निघाले (२००८)
- साडे माडे तीन (२००८)
- गोंद्या मारतंय तंगडं (२००८)
- लग्नाची वरात लंडनच्या घरात (२००९)
- क्षणभर विश्रांती (२०१०)
- टाटा बिरला आणि मैना (२०१०)
- शिक्षणाच्या आयच्या घो (२०१०)
- जावई बापू जिंदाबाद (२०१०)
- झक मारली बायको केली (२०१०)
- बम बम बोले (२०१०)
- डावपेच (२०११)
- शहाणपण देगा देवा ! (२०११)
- झिंग चिक झिंग (२०११)
- फक्त लढ म्हणा (२०११)
- बाबुरावला पकडा (२०१२)
- नो एंट्री - पुढे धोका आहे (२०१२)
- दम असेल तर (२०१२)
- खो-खो (२०१२)
- येड्यांची जत्रा (२०१२)
- पुणे व्हाया बिहार (२०१३)
- सत ना गत (२०१३)
- श्रीमंत दामोदर पंत (२०१३)
- अग बाई अरेच्या २ (२०१५)
- पी से पी एम तक (२०१५)
Monday, 2 November 2015
अरुण कदम
आज (२ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अरुण कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!अरुण कदम मागील २५ वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. त्यांनी अनेक हिंदी व मराठी भाषेतील चित्रपट, टिवी मालिका आणि नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. त्यांना "ETV मराठी" वरील "कॉमेडी एक्सप्रेस" या मालिकेने नविन ओळख मिळवून दिली. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्याच्या www.arunkadam.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Sunday, 18 October 2015
स्वप्निल जोशी
आज (१८ ऑक्टोम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते स्वप्निल जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

मराठी चित्रपट सृष्टीतील आजचे सुपरस्टार ''स्वप्निल जोशी" यांचे नाव घेतले की आपल्याला त्यांचा रामानंद सागर निर्देशित ''कृष्णा" या मालिकेतील त्यांची केंद्रीय भूमिका आठवते. त्यांची ''कृष्णा" ची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक टीवी हिंदी व मराठी टीवी मालिकेमधून भूमिका केल्या किंबहुना ते छोट्या पद्यावरच जास्त रमले असे म्हटल्यास वावग ठरणार नाही. ''गुलाम ए मुस्तफा" आणि "दिल विल प्यार व्यार" या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. २०१० साली प्रदर्शित झालेल्या कांचन अधिकारी दिग्दर्शित "मानिनी" या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आगमन केले. हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला व स्वप्निल जोशी यांचा अभिनय पण. मध्यंतरी त्यांनी "चेकमेट", "टारगेट" आणि "आम्ही सातपुते" असे चित्रपट केले. सतीश राजवाडे यांच्या "मुंबई पुणे मुंबई" या चित्रपटात त्यांची मुक्ता बर्वेसोबत केमिस्ट्री खुप गाजली आणि हा चित्रपट सुद्धा खुप चालला. या चित्रपटाचा पुढचा भाग "मुंबई पुणे मुंबई २" येत्या काही दिवसात प्रदर्शित होत आहे.
संजय जाधव दिग्दर्शित ''दुनियादारी" हा चित्रपट त्यांच्या करियरला वेगळे वळण देणारा ठरला. संजय जाधवचे दिग्दर्शन व स्वप्निल जाधव - सई ताम्हणकर यांची जोडी हा मराठी चित्रपटाच्या यशाचा नविन फार्मूला चित्रपटातून गवसला. "प्यारवाली लवस्टोरी" आणि "तू ही रे" चित्रपटात हेच सिद्ध झाले आहे. सोबतच त्यांनी ''मंगलाष्टक वन्स मोर", "पोर बाजार" आणि "वेलकम ज़िंदगी" हे चित्रपट पण केले. याच वर्षी प्रदर्शित झालेला ''मितवा" या चित्रपटात त्यांची प्रार्थना बेहरे व सोनाली कुलकर्णी यांची जोडी ही पसंत केल्या गेली.
Tuesday, 13 October 2015
कादंबरी कदम
आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री कादंबरी कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! कादंबरी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी मालिकांमध्ये ही व्यस्त असतात. "कभी सौतन कभी
सहेली" हि त्यांची पहिली हिंदी टिवी मालिका होती यानंतर त्यांनी "कहता दिल", "तीन बहुरानियाँ" आणि "संस्कार धरोहर अपनों की" या हिंदी मालिकांमधून भूमिका केल्या व लोकप्रियता मिळवली. "अजिंक्य", "आघात", "तुला शिकवीन चांगलाच
धडा", "पटलं तर घ्या", "मंगलाष्टक वन्स मोअर", "ही पोरगी कुणाची", "क्षणभर विश्रांती" हे त्यांचे प्रमुख मराठी चित्रपट आहेत.Saturday, 3 October 2015
सुनील बर्वे
आज (३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुनील बर्वे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
नाटक, टीवी मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे सुनील बर्वे मागील २५ पेक्षा अधिक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. सुनील बर्वे यांनी आपल्या अभिनय यात्रेची सुरवात "अफलातून" या नाटकातून केली, त्यानंतर त्यांनी "मोरूची मावशी", "कशी मी राहू तशीच", "वन रूम किचन", "चार चौघी", "म्हणून मी तुला कुठे नेत नाही", "ह्यांना जमतं तरी कसं", "असेच आम्ही सारे", "हेलो इन्स्पेक्टर", "श्री तशी सौ", "बायकोच्या नकळतच", "हिच तर प्रेमाची गंमत आहे", "मासिबा" आणि "ऑल द बेस्ट" अशा मराठी, गुजराती आणि इंग्लिश नाटकांमधून भूमिका केल्या. "सुबक" या संस्थेची स्थापना करून द्वारे ते नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. "हर्बेरियम" हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरु केला त्यात त्यांनी गाजलेल्या जुन्या ५ नाटकांना नवीन स्वरुपात प्रेक्षकांच्या समोर आणले. यातील सर्वच नाटकांचे मोजके २५ प्रयोग करण्यात आले. यापैकी "झोपी गेलेला जागा झाला" हे नाटक नागपूरला बघण्याची संधी मला मिळाली. "हर्बेरियम" या उपक्रमातील अनुभवावर आधारित याच नावाने पुस्तकही त्यांनी लिहिले असून तारांगण प्रकाशन ने ते प्रकाशित केले आहे.
नाटक, टीवी मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे सुनील बर्वे मागील २५ पेक्षा अधिक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. सुनील बर्वे यांनी आपल्या अभिनय यात्रेची सुरवात "अफलातून" या नाटकातून केली, त्यानंतर त्यांनी "मोरूची मावशी", "कशी मी राहू तशीच", "वन रूम किचन", "चार चौघी", "म्हणून मी तुला कुठे नेत नाही", "ह्यांना जमतं तरी कसं", "असेच आम्ही सारे", "हेलो इन्स्पेक्टर", "श्री तशी सौ", "बायकोच्या नकळतच", "हिच तर प्रेमाची गंमत आहे", "मासिबा" आणि "ऑल द बेस्ट" अशा मराठी, गुजराती आणि इंग्लिश नाटकांमधून भूमिका केल्या. "सुबक" या संस्थेची स्थापना करून द्वारे ते नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. "हर्बेरियम" हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरु केला त्यात त्यांनी गाजलेल्या जुन्या ५ नाटकांना नवीन स्वरुपात प्रेक्षकांच्या समोर आणले. यातील सर्वच नाटकांचे मोजके २५ प्रयोग करण्यात आले. यापैकी "झोपी गेलेला जागा झाला" हे नाटक नागपूरला बघण्याची संधी मला मिळाली. "हर्बेरियम" या उपक्रमातील अनुभवावर आधारित याच नावाने पुस्तकही त्यांनी लिहिले असून तारांगण प्रकाशन ने ते प्रकाशित केले आहे.
सचिन पिळगावकर दिग्दर्शित ''आत्मविश्वास" हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर त्यांनी "सुगंध", "तू तिथे मी", "पाश", "आहुती", "लपंडाव", "जमल हो जमल", "आई", "तन्नू कि टिना", "निदान", "अस्तित्व", "दिवसेंदिवस", "आनंदाचे झाड", "सुर राहु दे", "गोजिरी", "तूच खरी घरची लक्ष्मी", "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" या चित्रपटात अभिनय केला आहे. या वर्षी त्यांचे "प्राइम टाइम" आणि "हायवे" हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
नाटक आणि चित्रपटांसोबतच अनेक मराठी, हिंदी आणि गुजराती मलिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे, या मलिकांमध्ये ''कुंकू", "कळत नकळत", "असंभव", "अभी तो मै जवान हु", "अधांतरी", "अवंती", "अवंतिका", "आवाज", "बोलाची कढी", "चाळ नावाची वाचाळ वस्ती", "छैल छबीला", "चतुराई", "गोष्ट एका आनंदची", "हे सारे संचीताचे", "इमारत", "जावई शोध", "झोका", "झुट्न जरीवाला", "ज्योति", "कर्तव्य", "कौन अपना कौन पराया", "कोई सुरत नजर नही आती", "कोरा कागज", "नायक", "प्रपंच", "प्रो. प्यारेलाल", "रिमझीम", "सप्तर्शी", "श्रीयुत गंगाधर टिपरे", "स्वयंम", "थरार", "त्रेधा तिरपिट" आणि "वाळवाचा पाऊस" या मालिकांचा समावेश आहे.
त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.sunilbarve.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Saturday, 26 September 2015
समीर धर्माधिकारी
आज (२६ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील डैशिंग
अभिनेते समीर धर्माधिकारी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक
शुभेच्छा !!!!! त्यांच्या डैशिंग व्यक्तिमत्वामुळे त्यांनी जाहिरात व अभिनय
क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अभिनय केलेल्या सचिन
कुंडलकर दिग्दर्शित "निरोप" या चित्रपटाला २००७ सालच्या सर्वोकृष्ट मराठी
चित्रपटाचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी अनेक मराठी व हिंदी
चित्रपटांमधून महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. जाहिरात व चित्रपटांसोबतच
अनेक ऐतिहासिक काळावर आधारीत टिवी मलिकांमधून त्यांनी महत्वाच्या भूमिका
साकारल्या आहेत. या मध्ये "एक वीर स्त्री की कहानी …. झांसी की रानी",
"महाभारत" आणि "बुद्धा: राजो का राजा" याचा समावेश आहे. सध्या त्यांची
''चक्रवर्ती अशोक सम्राट'' हि मालिका कलर्स या वाहिनीवर प्रदर्शित होत आहे.Friday, 4 September 2015
मोहन जोशी
आज (४ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मोहन
जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नाटक, चित्रपट आणि टिवी मालिका या तीन हि क्षेत्रात हुकूमत असणार अस हे व्यक्तिमत्व आहे.हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या खलनायकाच्या भूमिका विशेष गाजल्या. ते सध्या मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.
Thursday, 3 September 2015
मनोज जोशी
आज (३ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मनोज जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी व हिंदी व्यतिरिक्त गुजराती व भोजपुरी चित्रपटांतही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांची भूमिका असलेल्या ''ऋण'' या मराठी चित्रपटाची या वर्षी बरीच चर्चा झाली. या चित्रपटात त्यांनी अतिशय वेगळी अशी भूमिका साकारली होती.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...
