Showing posts with label drama. Show all posts
Showing posts with label drama. Show all posts

Friday, 1 January 2016

नाना पाटेकर

आज (१ जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आपल्या अभिनायाने आणि आपल्या भारदस्त व्यक्तीमत्वाने नाना पाटेकर यांनी चित्रपट रसिकांच्या मनात घर केलेले आहे. त्यांनी "प्रहार" या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन ही केले आहे. २०१३ साली भारत सरकारतर्फे त्यांना "पदमश्री" या सम्मानाने गौरवण्यात आले आहे. नानांना नेमबाजी या खेळाची आवड असून त्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. ते अभिनयासोबतच समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. अनेक सामाजिक कार्यांना व संस्थांना त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. याच भावनेतून त्यांनी २०१५ साली अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून ''नाम फाउंडेशन" या संस्थेची स्थापना केली आहे. हि संस्था शेतकरी आणि त्यांच्या कुटुम्बियांसाठी कार्यरत आहे. 

आज त्यांचा महेश मांजरेकर दिग्दर्शित "नटसम्राट" हा मराठी चित्रपट प्रदर्शित  आहे. हा चित्रपट नानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.   

नाना पाटेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • वेलकम बॅक (२०१५)
  • अब तक छप्पन २ (२०१५)
  • डॉ. प्रकाश बाबा आमटे (२०१४)
  • द ॲटॅक ऑफ २६/११ (२०१३)
  • देऊळ (२०११)
  • राजनीति (२०१०)
  • इट्स माय लाइफ (२००९)
  • वेलकम (२००७)
  • हॅटट्रिक (२००७)
  • टैक्सी  नम्बर ९२११ (२००६)
  • अपहरण (२००५)
  • अब तक छप्पन (२००५)
  • पक पक पकाक (२००५)
  • ब्लफ़ मास्टर (२००५)
  • आँच (२००३)
  • डरना मना है (२००३)
  • भूत (२००३)
  • वध (२००२)
  • शक्ति : द पावर (२००२)
  • गैंग (२०००)
  • तरकीब (२०००)
  • कोहराम : द एक्सप्लोजन (१९९९)
  • हुतूतू (१९९९)
  • युगपुरुष: अ मॅन हू कम्स जस्ट वन्स इन् अ वे (१९९८)
  • वजूद (१९९८)
  • गु़लाम-ए-मुस्तफ़ा (१९९७)
  • यशवंत (१९९७)
  • अग्निसाक्षी (१९९६)
  • खामोशी : द म्यूझिकल (१९९६)
  • हम दोनों (१९९५)
  • क्रांतिवीर (१९९४)
  • अभय (१९९४)
  • अंगार (१९९२)
  • तिरंगा (१९९२)
  • राजू बन गया जंटलमन (१९९२)
  • दीक्षा (१९९१)
  • प्रहार : द फायनल ॲटॅक (१९९१)
  • थोडसा रूमानी हो जाएँ (१९९०)
  • दिशा (१९९०)
  • परिंदा (१९८९)
  • त्रिशाग्नी (१९८८)
  • सलाम बॉम्बे (१९८८)
  • सागर संगम (१९८८)
  • अंधा युद्ध (१९८७)
  • अवाम (१९८७)
  • प्रतिघात (१९८७)
  • मोहरे (१९८७)
  • सूत्रधार (१९८७)
  • अंकुश (१९८६)
  • दहलीज़ (१९८६)
  • आज की आवाज (१९८४)
  • गिद्ध : द व्हल्चर (१९८४)
  • भालू (१९८०)
  • गमन (१९७८)

Saturday, 12 December 2015

भरत जाधव

आज (१२ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली. नंतर त्यांना "सही रे सही" नाटकातून ओळख मिळाली. त्यांच्या इतर नाटकांमध्ये "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल द बेस्ट", "आमच्या सारखे आम्हीच" आणि "ढॅण्ट ढॅण" या नाटकांचा समावेश आहे. नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. या जोडीनी अनेक यशस्वी नाटके व चित्रपट दिले आहेत. भरत जाधव हे त्यांच्या कॉमिक टाइमिंग साठी ओळखले जातात. "चिरंजीव" या त्यांच्या येणाऱ्या चित्रपटात ते अत्यंत वेगळया भूमिकेत दिसणार आहे.  

भरत जाधव यांनी अभिनय केलेले चित्रपट  
  • वास्तव  (१९९९)
  • खतरनाक (२०००)
  • प्राण जाये पर शान न जाये (२००३)
  • हाऊस फुल्ल (२००४)
  • नव-याची कमाल बायकोची धमाल (२००४)
  • खबरदार (२००५)
  • पछाडलेला (२००५)
  • सरीवर सर (२००५)
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
  • जत्रा (२००६)
  • चालू नवरा भोळी बायको (२००६)
  • गोलमाल (२००६)
  • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
  • गलगले निघाले (२००८)
  • साडे माडे तीन (२००८)
  • गोंद्या मारतंय तंगडं (२००८)
  • लग्नाची वरात लंडनच्या घरात (२००९)
  • क्षणभर विश्रांती (२०१०)
  • टाटा बिरला आणि मैना (२०१०)
  • शिक्षणाच्या आयच्या घो (२०१०)
  • जावई बापू जिंदाबाद (२०१०)
  • झक मारली बायको केली (२०१०)
  • बम बम बोले (२०१०)
  • डावपेच (२०११)
  • शहाणपण देगा देवा ! (२०११)
  • झिंग चिक झिंग (२०११)
  • फक्त लढ म्हणा (२०११)
  • बाबुरावला पकडा (२०१२)
  • नो एंट्री - पुढे धोका आहे (२०१२)
  • दम असेल तर (२०१२)
  • खो-खो (२०१२)
  • येड्यांची जत्रा (२०१२)
  • पुणे व्हाया बिहार (२०१३)
  • सत ना गत (२०१३)
  • श्रीमंत दामोदर पंत (२०१३)
  • अग बाई अरेच्या २ (२०१५)
  • पी से पी एम तक (२०१५)

Monday, 16 November 2015

श्रीराम लागू

आज (१६ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते श्रीराम लागू यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! श्रीराम लागू हे भारतीय रंगभूमीवरील उत्कृष्ट नटापैकी आहेत, सोबतच त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. अनेक वर्षांनंतर मागील वर्षी त्यांनी "नागरीक" या चित्रपटात अभिनय केला. ते सामाजिक कार्यासोबत जुळले असून ते पुरोगामी विचारसरणीचे समर्थक आहेत. त्यांनी "लमाण" नावाने आपले आत्मचरित्र लिहिले आहे.  

श्रीराम लागू यांनी अभिनय केलेले चित्रपट
  • पिंजरा (१९७२)
  • मेरे साथ चल (१९७४)
  • सामना (१९७४)
  • पोंगा पंडित (१९७५)
  • बुलेट (१९७६)आखरी मुजरा (१९८१)
  • चलते चलते (१९७६)
  • हेराफेरी (१९७६)
  • अगर... इफ (१९७७)
  • इनकार (१९७७)
  • ईमान धर्म (१९७७)
  • किताब (१९७७)
  • घरोंदा (१९७७)
  • शंकर हुसेन (१९७७)
  • कॉलेज गर्ल (१९७८)
  • दामाद (१९७८)
  • देस परदेस (१९७८)
  • देवता (१९७८)
  • नया दौर (१९७८)
  • फूल खिले हैं गुलशन गुलशन (१९७८)
  • मुकद्दर का सिकंदर (१९७८)
  • मेरा रक्षक (१९७८)
  • शालीमार (१९७८)
  • साजन बिना सुहागन (१९७८)
  • जुर्माना (१९७९)
  • तराना (१९७९)
  • दूरीयाँ (१९७९)
  • मगरूर (१९७९)
  • मंज़िल (१९७९)
  • मीरा (१९७९)
  • मुकाबला (१९७९)
  • सरगम (१९७९)
  • हम तेरे आशिक हैं (१९७९)
  • इंसाफ़ का तराजू (१९८०)
  • गहराई (१९८०)
  • ज्योति बने ज्वाला (१९८०)
  • ज्वालामुखी (१९८०)
  • झाकोळ (१९८०)
  • थोडीसी बेवफाई (१९८०)
  • दो और दो पाँच (१९८०)
  • 'नीयत (१९८०)
  • बिन माँ के बच्चे (१९८०)
  • लूटमार (१९८०)
  • सिंहासन (१९८०)
  • स्वयंवर (१९८०)
  • अग्निपरीक्षा (१९८१)
  • अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)
  • घुँघरूकी आवाज़ (१९८१)
  • चेहरे पे चेहरा (१९८१)
  • ज़माने को दिखाना है (१९८१)
  • प्रोफेसर प्यारेलाल (१९८१)
  • लावारिस (१९८१)
  • सनसनी: द सेन्सेशन (१९८१)
  • आपली माणसं (१९८२)
  • कामचोर (१९८२)
  • गजब (१९८२)
  • गाँधी (१९८२)
  • चोरनी (१९८२)
  • दिल ही दिल में (१९८२)
  • दीदार-ए-यार (१९८२)
  • दौलत (१९८२)
  • मैं इन्तकाम लूँगा (१९८२)
  • रास्ते प्यार के (१९८२)
  • श्रीमान श्रीमती (१९८२)
  • सम्राट (१९८२)
  • कलाकार (१९८३)
  • गुपचुप गुपचुप (१९८३)
  • चटपटी (१९८३)
  • पुकार (१९८३)
  • मवाली (१९८३)
  • मुझे इंसाफ़ चाहिए (१९८३)
  • सदमा (१९८३)
  • सौंतन (१९८३)
  • हम से है ज़माना (१९८३)
  • तरंग (१९८४)
  • बद और बदनाम (१९८४)
  • मकसद (१९८४)
  • मेरी अदालत (१९८४)
  • लव मैरिज (१९८४)
  • होली (१९८४)
  • अनकही (१९८५)
  • किशन कन्हैया (१९९० )
  • घरद्वार (१९८५)
  • सरफ़रोश (१९८५)
  • सितमगर (१९८५)
  • हम नौजवान (१९८५)
  • एक पल (१९८६)
  • काला धंदा गोरे लोग (१९८६)
  • घर संसार (१९८६)
  • जीवा (१९८६)
  • दिलवाला (१९८६)
  • लॉकेट (१९८६)
  • समय की धारा (१९८६)
  • सवेरे वाली गाड़ी (१९८६)
  • आवाम (१९८७)
  • मर्द की ज़बान (१९८७)
  • मेरा कर्म मेरा धर्म (१९८७)
  • शेर शिवाजी (१९८७)
  • तमाचा (१९८८)
  • नामुमकीन (१९८८)
  • इक दिन अचानक (१९८९)
  • काला बाज़ार (१९८९)
  • गलियों का बादशाह (१९८९)
  • तौहेँ (१९८९)
  • दाना पानी (१९८९)
  • किनारा (१९७७)
  • दुश्मन देवता (१९९१)
  • फूलवती (१९९१)
  • औरत तेरी यही कहानी (१९९२)
  • करंट (१९९२)
  • नसीबवाला (१९९२)
  • माया (१९९२)
  • सरफिरा (१९९२)
  • प्यार का तराना (१९९३)
  • बडी बहन (१९९३)
  • खुद्दार (१९९४)
  • गोपाल (१९९४)
  • मुक्ता (१९९४)
  • आज का ये घर (१९७६)
  • आतंक (१९९६)
  • हाहाकार (१९९६)
  • ध्यासपर्व (२००१)
  • नागरीक (२०१५)

Wednesday, 4 November 2015

सतीश पुळेकर

आज (५ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सतीश पुळेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

सतीश पुळेकर मुख्यतः त्यांच्या नाट्य क्षेत्रातील अभिनयासाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटांमध्ये "सांगाती", "काय राव तुम्ही" , "आभरण", "चार्ली", "येडा", "आम्ही चमकते तारे", "श्री पार्टनर", "गोळा बेरीज", "फक्त लढ म्हणा", "आरम्भ", "आटापिटा", "वैकेशन", "मी मन आणि ध्रुव", "बे दुने साढ़े चार", "विश्वास", "सार कस शांत शांत", "हळद रुसली कुंकु हसली", "अत्याचार" प्रमुख आहे. सतीश पुळेकर त्यांच्या अभिनयासाठी ते प्रसिद्द आहेतच सोबत ते अतिशय चांगले कार्टूनिस्ट आहेत.

Tuesday, 3 November 2015

लक्ष्मीकांत बर्डे

आज (३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांची जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्या स्मृतिस हार्दिक अभिवादन !!!!!

लक्ष्मीकांत बर्डे यांना सम्पूर्ण महाराष्ट्र "लक्ष्या" या टोपण नावाने ओळखायचा. आपल्या निरागस अभिनयाने लक्ष्मीकांत बर्डे यांनी सर्व महाराष्ट्राला आपलेसे केले होते. त्यांनी एका मागून एक अनेक सुपरहिट चित्रपट मराठी चित्रपट सृष्टिला दिले. हे सर्व चित्रपट पाहतांना आजच तितकीच मजा येते. वर्षा उसगांवकर आणि प्रिया बर्डे यांच्या सोबत त्यांची जोडी अनेक चित्रपटात बघायला मिळाली. त्यांची जोडी महेश कोठारे, अशोक सराफ आणि सचिन बरोबर विशेष गाजली. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात लक्ष्मीकांत बर्डे आणि अशोक सराफ हि सर्वात जास्त गाजलेल्या जोडीपैकी एक असेल यात शंका नाही. मराठीबरोबरच हिंदित ही लक्ष्मीकांत बर्डे यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात भूमिका केल्या. १६ दिसंबर २००४ ला त्यांचा अकाली मृत्यु झाला तेव्हा अवघा महाराष्ट्र हळहळला. 

लक्ष्मीकांत बर्डे यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • धूमधडाका (१९८५)
  • लेक चालली सासरला (१९८५)
  • गडबड घोटाळा (१९८६)
  • चल रे लक्ष्या मुंबईला (१९८७)
  • दे दणादण (१९८७)
  • प्रेम करू या खुल्लम खुल्ल्ला (१९८७)
  • अशी ही बनवाबनवी (१९८८)
  • किस बाई किस (१९८८)
  • रंगात संगत (१९८८)
  • थरथराट (१९८९)
  • बाळाचे बाप ब्रह्मचारी (१९८९)
  • भुताचा भाऊ (१९८९)
  • मैंने प्यार किया (१९८९)
  • धडाकेबाज (१९९०)
  • धमाल बाबल्या गणप्याची (१९९०)
  • लपवा छपवी (१९९०)
  • शुभ बोल नार्‍या (१९९०)
  • अफलातून (१९९१)
  • शेम टू शेम (१९९१)
  • आयत्या घरात घरोबा (१९९१)
  • डान्सर (१९९१)
  • १०० डेज (१९९१)
  • त्रिनेत्र (१९९१)
  • प्रतिकार (१९९१)
  • मुंबई ते मॉरिशस (१९९१)
  • येडा की खुळा (१९९१)
  • साजन (१९९१)
  • अनाम (१९९२)
  • आय लव्ह यू (१९९२)
  • एक होता विदूषक (१९९२)
  • गीत (१९९२)
  • जिवलागा (१९९२)
  • दिल का क्या कसूर (१९९२)
  • दीदार (१९९२)
  • बेटा (१९९२)
  • अनाडी (१९९३)
  • आदमी खिलौना है (१९९३)
  • कृष्ण अवतार (१९९३)
  • गुमराह (१९९३)
  • झपाटलेला (१९९३)
  • तहकिकात (१९९३)
  • दिल की बाजी (१९९३)
  • संग्राम (१९९३)
  • संतान (१९९३)
  • सैनिक (१९९३)
  • हस्ती (१९९३)
  • क्रांति क्षेत्र (१९९४)
  • चिकट नवरा (१९९४)
  • द जंटलमॅन (१९९४)
  • दिलबर (१९९४)
  • बजरंगाची कमाल (१९९४)
  • ब्रह्म (१९९४)
  • हम आपके हैं कौन...! (१९९४)
  • क्रिमिनल (१९९५)
  • जमलं हो जमलं (१९९५)
  • तकदीरवाला (१९९५)
  • साजन की बाहों में (१९९५)
  • हथकडी  (१९९५)
  • अजय (१९९६)
  • चाहत (१९९६)
  • मासूम (१९९६)
  • जमीर: द अवेकनिंग ऑफ अ सोल (१९९७)
  • जोर (१९९७)
  • ढाल: द बॅटल ऑफ लॉ अगेन्स्ट लॉ (१९९७)
  • मेरे सपनो की रानी (१९९७)
  • हमेशा (१९९७)
  • दीवाना हूँ पागल नही (१९९८)
  • सर उठा के जियो (१९९८)
  • हफ्ता वसूली (१९९८)
  • आग ही आग (१९९९)
  • आरजू (१९९९)
  • जानम समझा करो (१९९९)
  • दिल क्या करे (१९९९)
  • राजाजी (१९९९)
  • लो मैं आ गया (१९९९)
  • पापा द ग्रेट (२०००)
  • बेटी नंबर १ (२०००)
  • शिकार (२०००)
  • उलझन  (२००१)
  • छुपा रुस्तम: अ म्यूझिकल थ्रिलर (२००१)
  • हॅलो गर्ल्स (२००१)
  • प्यार दीवाना होता है (२००२)
  • भारत भाग्य विधाता (२००२)
  • हम तुम्हारे हैं सनम (२००२)
  • खंजर: द नाइफ (२००३)
  • तू बाल ब्रह्मचारी मैं हूँ कन्या कुंवारी (२००३)
  • बाप का बाप (२००३)
  • खतरनाक (२००४)
  • घर गृहस्थी (२००४)
  • तौबा तौबा (२००४)
  • पतली कमर लंबे बाल (२००४)
  • मेरी बीवी का जवाब नहीं (२००४)
  • हत्या: द मर्डर (२००४)
  • इन्सान (२००५)


Monday, 2 November 2015

किशोर प्रधान

आज (२ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते किशोर प्रधान यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरचा. नागपूरलाच त्यांनी एम ए चे शिक्षण पूर्ण केले. नंतर अभिनयाच्या ओढीमुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. किशोर प्रधान यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांनी  मराठी , हिंदी आणि इंग्लिश या तीन ही भाषेत नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. आज वयाच्या ७९ व्या वर्षी ही तरुणांना लाजवेल अश्या उत्साहाने ते कार्यरत आहेत. त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांमध्ये "उचला रे उचला", "कशाला उद्याची बात", "खिचडी़", "गॉड ओन्ली नोज", "छोडो कल की बातें", "जब वी मेट", "डॉक्टर डॉक्टर", "त्याचा बाप तिचा बाप", "नवरा अवली बायको लव्हली", "नवरा माझा ब्रम्हचारी", "नाना मामा", "बाप तिचा बाप", "भिंगरी", "मस्ती एक्सप्रेस", "मास्तर एके मास्तर", "मीराबाई नॉट आउट", "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय", "रफ़्तार", "रानपाखरा", "रूल्स प्यार का सुपरहिट फ़ॉर्म्यूला", "लगे रहो मुन्नाभाई", "लाडीगोडी", "लालबाग परळ", "वन रूम किचन", "वरचा मजला रिकामा त्याचा", "शहाणपण देगा देवा", "शिक्षणाच्या आईचा घो", "शेजारी शेजारी" आणि "सिटी ऑफ गोल्ड" हे चित्रपट प्रमुख आहेत.

अरुण कदम

आज (२ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अरुण कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

अरुण कदम मागील २५ वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. त्यांनी अनेक हिंदी व मराठी भाषेतील चित्रपट, टिवी मालिका आणि नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. त्यांना "ETV मराठी" वरील "कॉमेडी एक्सप्रेस" या मालिकेने नविन ओळख मिळवून दिली. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्याच्या www.arunkadam.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Friday, 16 October 2015

अदिती सारंगधर

आज (१६ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अदिती सारंगधर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

अदिती सारंगधर यांना त्यांच्या करीयरच्या सुरवातीला कांचन अधिकारी यांनी त्यांच्या "दामिनी" या मालिकेत संधी दिली . "दामिनी" नंतर "वादळवाट" या मालिकेतून त्यांना ओळख व लोकप्रियता मिळाली. स्टार प्रवाह वरील "लक्ष्य" या मालिकेतील सलोनी देशमुख भूमिकेनी त्यांना खुप प्रसिद्धि मिळवून दिली. राजन ताम्हने दिग्दर्शित "प्रपोजल" हे नाटक त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरत आहे. अदितीला या नाटकासाठी मटा सन्मान अवार्ड, जी गौरव अवार्ड आणि महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा या तिन्ही ठिकाणी सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या नाटकाने सर्वच नाट्य पुरस्कारांमध्ये बाजी मारली.

टिवी मालिका व नाटकासोबतच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.    

Tuesday, 13 October 2015

शरद पोंक्षे

आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! टि वी, नाटक आणि चित्रपट हि अभिनयाची सर्व माध्यम आपल्या समर्थ अभिनयाने गाजवणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. "दामिनी", "अग्निहोत्र" आणि "वादळवाट" या मालिकांनी त्यांना घराघरात पोहचवले. त्यांनी अनेक नाटकात महत्वाच्या भुमिका केल्या असल्या तरी "मी नथूराम गोडसे बोलतोय" हे नाटक त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय महत्वाचे आहे. त्यांनी "हे राम", "८८ अंटोप हिल", "आखरी ख्वाहिश", "ब्लैक फ्राइडे", "ओटी कृष्णामाईची", "एक पल प्यार का", "गाढवाच लग्न", "तूच खरी घरची लक्ष्मी", "गोळाबेरीज", "तुकाराम", "देख तमाशा देख", "ब्लैक होम", "व्हाट अबाउट सावरकर" आणि "संदूक" या हिंदी व मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

Thursday, 8 October 2015

मधुरा वेलणकर

आज (८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मधुरा वेलणकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

मधुरा वेलणकर ह्या मराठीतील सर्वांच्या आवडत्या अभिनेत्रीपैकी एक आहेत, आपल्या ग्रेसफुल लूकने आणि अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना मोहित केले आहे. सध्या त्यांचे मराठी रंगभूमीवरील नाटक "मिस्टर एण्ड मिस" खुप गाजतय. त्यांनी "जजतरंम ममंतरम", "नॉट ओनली मि. राऊत", "सरीवर सरी", "मी अमृता बोलतीये", "आई नं.१", "मातीच्या चुली", "गोजीरी", "गलती", "उलाढाल", "मेड इन चायना", "खबरदार", "कैनवास", "रंगीबेरंगी", "हापुस", "क्षणोक्षणी", "पाऊलवाट", "जन गण मन" आणि "अशाच एका बेटावर" या हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. या पैकी "हापुस" या चित्रपटात त्यांनी जुळ्या मुलींची दुहेरी भूमिका केली होती. त्या शिवाजी साटम यांचे चिरंजीव व प्रसिद्द दिग्दर्शक अभिजीत साटम यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत.   

Saturday, 3 October 2015

सुनील बर्वे

आज (३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुनील बर्वे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

नाटक, टीवी मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे सुनील बर्वे मागील २५ पेक्षा अधिक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. सुनील बर्वे यांनी आपल्या अभिनय यात्रेची सुरवात "अफलातून" या नाटकातून केली, त्यानंतर त्यांनी "मोरूची मावशी", "कशी मी राहू तशीच", "वन रूम किचन", "चार चौघी", "म्हणून मी तुला कुठे नेत नाही", "ह्यांना जमतं तरी कसं", "असेच आम्ही सारे", "हेलो इन्स्पेक्टर", "श्री तशी सौ", "बायकोच्या नकळतच", "हिच तर प्रेमाची गंमत आहे", "मासिबा" आणि "ऑल द बेस्ट" अशा मराठी, गुजराती आणि इंग्लिश नाटकांमधून भूमिका केल्या. "सुबक" या संस्थेची स्थापना करून द्वारे ते नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. "हर्बेरियम" हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरु केला त्यात त्यांनी गाजलेल्या जुन्या ५ नाटकांना नवीन स्वरुपात प्रेक्षकांच्या समोर आणले. यातील सर्वच नाटकांचे मोजके २५ प्रयोग करण्यात आले. यापैकी "झोपी गेलेला जागा झाला" हे नाटक नागपूरला बघण्याची संधी मला मिळाली. "हर्बेरियम" या उपक्रमातील अनुभवावर आधारित याच नावाने पुस्तकही त्यांनी लिहिले असून तारांगण प्रकाशन ने ते प्रकाशित केले आहे.           

सचिन पिळगावकर दिग्दर्शित ''आत्मविश्वास" हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर त्यांनी "सुगंध", "तू तिथे मी", "पाश", "आहुती", "लपंडाव", "जमल हो जमल", "आई", "तन्नू कि टिना", "निदान", "अस्तित्व", "दिवसेंदिवस", "आनंदाचे झाड", "सुर राहु दे", "गोजिरी", "तूच खरी घरची लक्ष्मी", "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" या चित्रपटात अभिनय केला आहे. या वर्षी त्यांचे "प्राइम टाइम" आणि "हायवे" हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.   

नाटक आणि चित्रपटांसोबतच अनेक मराठी, हिंदी आणि गुजराती मलिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे, या मलिकांमध्ये ''कुंकू", "कळत नकळत", "असंभव", "अभी तो मै जवान हु", "अधांतरी", "अवंती", "अवंतिका", "आवाज", "बोलाची कढी", "चाळ नावाची वाचाळ वस्ती", "छैल छबीला", "चतुराई", "गोष्ट एका आनंदची", "हे सारे संचीताचे", "इमारत", "जावई शोध", "झोका", "झुट्न जरीवाला", "ज्योति", "कर्तव्य", "कौन अपना कौन पराया", "कोई सुरत नजर नही आती", "कोरा कागज", "नायक", "प्रपंच", "प्रो. प्यारेलाल", "रिमझीम", "सप्तर्शी", "श्रीयुत गंगाधर टिपरे", "स्वयंम", "थरार", "त्रेधा तिरपिट" आणि "वाळवाचा पाऊस" या मालिकांचा समावेश आहे. 

त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.sunilbarve.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Sunday, 13 September 2015

उषा नाडकर्णी

आज (१३ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नकारात्मक भूमिकेसाठी त्या प्रसिद्द आहेत. त्यांची ''माहेरची साडी'' या चित्रपटातील सासूची भूमिका आज ही लोकांच्या लक्षात आहे. बहुधा हिच त्यांची ओळख झाली, इतकी हि भूमिका गाजली. टिवी मालिका ''पवित्र रिश्ता'' मधील त्यांची सविता देशमुख हि भूमिकाही खुप गाजली. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. सोबतच ''सिंहासन'', ''गुंडाराज'', "वास्तव'', ये तेरा घर ये मेरा घर", ''कृष्णा कॉटेज", "वन टू थ्री", ''अगडबंब" आणि "येलो" या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. “गुरू”, “महासागर”, “पुरुष”, “आम्ही बिघडलो”, “पाहुणा” आणि “आमच्या या घरात” या नाटकातून त्यांनी अभिनय केला आहे.

Friday, 4 September 2015

मोहन जोशी

आज (४ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मोहन जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नाटक, चित्रपट आणि टिवी मालिका या तीन हि क्षेत्रात हुकूमत असणार अस हे व्यक्तिमत्व आहे.हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या खलनायकाच्या भूमिका विशेष गाजल्या. ते सध्या मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.

Thursday, 3 September 2015

मनोज जोशी

आज (३ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मनोज जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी व हिंदी व्यतिरिक्त गुजराती व भोजपुरी चित्रपटांतही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांची भूमिका असलेल्या ''ऋण'' या मराठी चित्रपटाची या वर्षी बरीच चर्चा झाली. या चित्रपटात त्यांनी अतिशय वेगळी अशी भूमिका साकारली होती.

किरण नाटकी