आज (४ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मोहन
जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नाटक, चित्रपट आणि टिवी मालिका या तीन हि क्षेत्रात हुकूमत असणार अस हे व्यक्तिमत्व आहे.हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या खलनायकाच्या भूमिका विशेष गाजल्या. ते सध्या मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.
Showing posts with label Mohan Joshi. Show all posts
Showing posts with label Mohan Joshi. Show all posts
Friday, 4 September 2015
Saturday, 1 August 2015
''देऊळ बंद'',''जाणिवा'' आणि ''ओळख''
काल तीन चित्रपट प्रदर्शित झालेत ''देऊळ बंद'', ''जाणिवा'' आणि ''ओळख''.
''देऊळ बंद''च्या निमित्ताने प्रख्यात लेखक प्रवीण तरडे दिग्दर्शक म्हणुन पदार्पण करीत आहेत. ''देऊळ बंद''मध्ये देवांवर विश्वास न ठेवणार्या शास्त्रद्यांची गोष्ट सांगितली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे यात मोहन जोशी, श्री स्वामी समर्थच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील आठवड्यात ''कैर्री ऑन मराठा'' मधून मराठी चित्रपट सृष्टित पदार्पण केलेले गश्मीर महाजनी या चित्रपटात शात्रद्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये गिरीजा जोशी, मोहन आगाशे, निवेदिता सराफ, श्वेता शिंदे, सतीश आळेकर, शर्वरी जेमनीस, सुनील अभ्यंकर, प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी, देवेन्द्र गायकवाड, दिपक करंजीकर आणि आर्या घरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

राजेश रणशिंगे दिग्दर्शित ''जाणिवा'' प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे चिरंजीव सत्या मांजरेकर मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण करीत आहेत. ''जाणिवा''ची कथा आजचा युवक व त्यांच्या सामजिक जबाबदारीवर भाष्य करते, या चित्रपटाला एका वास्तव घटनेची पार्श्वभूमी देण्यात आलेली आहे. या चित्रपटात वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दाणी, संकेत अग्रवाल, किरण करमाकर, रेणुका शहाणे, अतुल परचुरे, इंदिरा कृष्णन, सलिल अंकोला, उषा नाडकर्णी आणि किशोर कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
जमिल खान दिग्दर्शित ''ओळख'' हा चित्रपट सुद्धा या शुक्रवारी प्रदर्शित झालाय. या चित्रपटात भूषण पाटिल, अलका आठल्ये, अरुण नलावडे, खुशबू तावडे, अंजली उजवणे, अनुज नाईक, नंदकुमार पाटिल आणि गणेश यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Tuesday, 26 May 2015
''पेइंग घोस्ट'', ''धुरंधर भाटवडेकर'', ''सिद्धांत'' आणि ''प्राइम टाइम''
''मे'' महिन्यात आता पर्यन्त फक्त ३ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी ह्या शुक्रवारी तब्बल ४ चित्रपट प्रदर्शित होत आहे, ''पेइंग घोस्ट'', ''धुरंधर भाटवडेकर'', ''सिद्धांत'' आणि ''प्राइम टाइम''.
तुम्ही पेइंग गेस्ट ऐकले असेल, पण आता दिग्दर्शक शुश्रुत भागवत प्रेक्षकांसाठी ''पेइंग घोस्ट'' हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे. व पु काळे यांच्या साहित्यावर आधारीत या चित्रपटात उमेश कामत व स्पृहा जोशी यांची जोडी बघायला मिळणार आहे. ''पेइंग घोस्ट'' चा ट्रेलर मागील काही दिवसांपासून यू-टुब खुप गाजतोय, या चित्रपटाचे प्रमोशन अतिशय जोरदार पदध्तीने झाले आहे.
क्षितीज झापरकर दिग्दर्शित ''धुरंधर भाटवडेकर'' मध्ये तुम्हाला मोहन आगशे व मोहन जोशी या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळणार आहे. सोबतच धुरंधर भाटवडेकर मध्ये किशोरी शहाणे, विजय कदम, शांतनु गंगाने, तन्वी हेगड़े, जयंत सावरकर, वृषाली हटलकर आणि दुष्यंत वाघ यांच्या भूमिका आहेत.
''फँड्री'' आणि ''शाळा'' ह्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मात्यांची निर्मिती असलेला विवेक वाघ दिग्दर्शित ''सिद्धांत '' हा चित्रपट ह्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. नातू व आजोबा यांच्या हळुवार नात्याला या चित्रपटात गणिताची पार्श्वभूमी आहे. या चित्रपटात विक्रम गोखले, स्वाती चिटनीस, गणेश यादव, माधवी सोमण, सारंग साठ्ये, अर्चित देवधर, नेहा महाजन, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत तपस्वी, सूरज सातव, बाबा आफळे, कांचन जाधव यांच्या भूमिका आहेत.
सध्या प्रेक्षकांच्या आवडी निवडी, त्यांच्या आवडीचे विषय घेऊन चित्रपट बनवण्याचा ट्रेन्ड झालाय, अशाच एक चित्रपट या शुक्रवारला प्रदर्शित होत आहे, तो न्हणजे प्राइम टाइम. टिवी वरील मालिका फक्त महिलाच नव्हे तर सर्व आबाळ वृद्धांच्या आवडीचा विषय आहे. याच विषयावर आधरित ''प्राइम टाइम'' या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रमोद कश्यप आहेत. या चित्रपटात किशोर प्रधान, मिलिंद शित्रे, सुलेखा तळवलकर, कृतिका देव, निशा परुलेकर, स्वयम जाधव, अनुराग वरळीकर, गायत्री देशमुख, जयंत गडेकर आणि सुनील बर्वे यांच्या भूमिका आहेत.

Friday, 17 April 2015
''कोर्ट'',''ते दोन दिवस'' आणि ''व्हाट अबाउट सावरकर''
आज ''कोर्ट'',''ते दोन दिवस'' आणि ''व्हाट अबाउट सावरकर'' हे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत. या पैकी दोन चित्रपटाचे नागपूर कनेक्शन आहे.
आज ''कोर्ट'' हा या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ सन्मान मिळालेला चित्रपट प्रदर्शित झाला. युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांच्या ''कोर्ट'' या पहिल्याच चित्रपटाने त्यांना अंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळून दिली आहे. या चित्रपटाची कथा भारतीय न्याय व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नारायण कांबळे या लोक शाहीराची गोष्ट सांगते. या चित्रपटात वीरा साथीदार ''नारायण कांबळे'' यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. वीरा साथीदार मूळचे नागपूरचे असून ते लेखक, कवी व पत्रकार सुद्धा आहेत. या चित्रपटात चित्रपटाचे निर्माते विवेक गोम्बर ही एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर समीक्षकांनी गौरवलेला आणि अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय मिळालेला पुरस्कार मिळालेला ''कोर्ट'' आता प्रेक्षकांच्या कोर्टात दाखल झालाय.
आज प्रदर्शित झालेला ''व्हाट अबाउट सावरकर'' हा वि दा सावरकर यांच्या विचाराने प्रेरीत एका युवकाची व त्याने केलेल्या संघर्षाची गोष्ट आहे. रुपेश कटरे व नितीन गावडे दिग्दर्शित या चित्रपटात शरद पोंक्षे, अविनाश नारकर, अतुल तोडंनकर, श्रीकांत भिडे व सारा श्रवण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून वि दा सावरकर यांच्या विचाराची तरुण पिढीला ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Friday, 13 March 2015
बुगडी माझी सांडली ग
आज ''बुगडी माझी सांडली ग'' हा चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाच्या माध्यमातून मिस इंडिया दिवा मानसी मोघे चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मानसिंग पवार यांनी केले असून या आधी त्यांनी ''आकांत'', ''नाइट स्कूल'' व ''पोलिसाची बायको'' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कश्यप परुलेकर व मानसी मोघे यांची प्रमुख भूमिका आहे, सोबतच मोहन जोशी व रमेश भटकर ही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट लावणी प्रधान असून प्रेमकथेवर बेतला आहे.
सोबतच आज ''पिकली'' व ''जरा जपून करा'' हे मराठी चित्रपट ही प्रदर्शित झाले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...