आज (३० ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! विक्रम गोखले त्यांच्या कुटुंबात असलेला अभिनयाचा वारसा घेऊनच अभिनयाच्या क्षेत्रात दाखल झाले. आपल्या समर्थ अभिनयाने विक्रमजी त्यांची प्रत्येक भूमिका लक्ष्यवेधी करतात. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ५८ वर्षे पूर्ण झाले आहेत. दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्रीच्या कितीतरी पिढ्यांसोबत त्यांनी काम केले आहे. २०१२ साली त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील भष्टाचारावर भाष्य करणारा "आघात" हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. "अनुमति" या चित्रपटसाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनयाचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभिनयासोबतच समाजकार्याची आवड सुद्धा त्यांनी जोपासली आहे. त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरीता आपण www.vikramgokhle.com या त्यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
Showing posts with label vikram gokhale. Show all posts
Showing posts with label vikram gokhale. Show all posts
Friday, 30 October 2015
विक्रम गोखले
आज (३० ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! विक्रम गोखले त्यांच्या कुटुंबात असलेला अभिनयाचा वारसा घेऊनच अभिनयाच्या क्षेत्रात दाखल झाले. आपल्या समर्थ अभिनयाने विक्रमजी त्यांची प्रत्येक भूमिका लक्ष्यवेधी करतात. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ५८ वर्षे पूर्ण झाले आहेत. दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्रीच्या कितीतरी पिढ्यांसोबत त्यांनी काम केले आहे. २०१२ साली त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील भष्टाचारावर भाष्य करणारा "आघात" हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. "अनुमति" या चित्रपटसाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनयाचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभिनयासोबतच समाजकार्याची आवड सुद्धा त्यांनी जोपासली आहे. त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरीता आपण www.vikramgokhle.com या त्यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊ शकता. Wednesday, 30 September 2015
ऑक्टोबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस
ऑक्टोबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस
- १ ऑक्टोबर - विवेक कजारीया (निर्माता)
- २ ऑक्टोबर - कौशल ईमानदार (संगीत दिग्दर्शक)
- २ ऑक्टोबर - गणेश गारगोटे (पि आर)
- २ ऑक्टोबर - देविका दफ्तरदार (अभिनेत्री)
- ३ ऑक्टोबर - सुनील बर्वे (अभिनेता)
- ३ ऑक्टोबर - अजित भैरवकर (दिग्दर्शक)
- ५ ऑक्टोबर - संजीव अभ्यंकर (गायक)
- ६ ऑक्टोबर - प्रकाश पांचाल (दिग्दर्शक)
- ६ ऑक्टोबर - सलिल कुलकर्णी (संगीत दिग्दर्शक)
- ८ ऑक्टोबर - मधुरा वेलणकर (अभिनेत्री)
- ८ ऑक्टोबर - राजेश चिटणीस (अभिनेता)
- १० ऑक्टोबर - अमोल भुते (अभिनेता)
- १० ऑक्टोबर - कमलाकर सातपुते (अभिनेता)
- ११ ऑक्टोबर - समित कक्कड (दिग्दर्शक)
- १३ ऑक्टोबर - स्पृहा जोशी (अभिनेत्री)
- १३ ऑक्टोबर - कादंबरी कदम (अभिनेत्री)
- १३ ऑक्टोबर - शरद पोंक्षे (अभिनेता)
- १३ ऑक्टोबर - विवेक गोरे (दिग्दर्शक)
- १५ ऑक्टोबर - मनोहर सरवणकर (दिग्दर्शक)
- १६ ऑक्टोबर - अदिती सारंगधर (अभिनेत्री)
- १९ ऑक्टोबर - अजित केतकर (गायक)
- २० ऑक्टोबर - अतुल तोडणकर (अभिनेता)
- २१ ऑक्टोबर - क्षितिज वाघ (संगीत दिग्दर्शक)
- २१ ऑक्टोबर - दिपक नायडू (दिग्दर्शक)
- २२ ऑक्टोबर - अजित देवळे (दिग्दर्शक)
- २२ ऑक्टोबर - दिनेश भोसले (दिग्दर्शक)
- २३ ऑक्टोबर - सिद्धार्थ जाधव (अभिनेता)
- २९ ऑक्टोबर - राजेश श्रृंगारपुरे (अभिनेता)
- २९ ऑक्टोबर - सतीश मोटलिंग (दिग्दर्शक)
- ३० ऑक्टोबर - विक्रम गोखले (अभिनेता)
Tuesday, 26 May 2015
''पेइंग घोस्ट'', ''धुरंधर भाटवडेकर'', ''सिद्धांत'' आणि ''प्राइम टाइम''
''मे'' महिन्यात आता पर्यन्त फक्त ३ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी ह्या शुक्रवारी तब्बल ४ चित्रपट प्रदर्शित होत आहे, ''पेइंग घोस्ट'', ''धुरंधर भाटवडेकर'', ''सिद्धांत'' आणि ''प्राइम टाइम''.
तुम्ही पेइंग गेस्ट ऐकले असेल, पण आता दिग्दर्शक शुश्रुत भागवत प्रेक्षकांसाठी ''पेइंग घोस्ट'' हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे. व पु काळे यांच्या साहित्यावर आधारीत या चित्रपटात उमेश कामत व स्पृहा जोशी यांची जोडी बघायला मिळणार आहे. ''पेइंग घोस्ट'' चा ट्रेलर मागील काही दिवसांपासून यू-टुब खुप गाजतोय, या चित्रपटाचे प्रमोशन अतिशय जोरदार पदध्तीने झाले आहे.
क्षितीज झापरकर दिग्दर्शित ''धुरंधर भाटवडेकर'' मध्ये तुम्हाला मोहन आगशे व मोहन जोशी या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळणार आहे. सोबतच धुरंधर भाटवडेकर मध्ये किशोरी शहाणे, विजय कदम, शांतनु गंगाने, तन्वी हेगड़े, जयंत सावरकर, वृषाली हटलकर आणि दुष्यंत वाघ यांच्या भूमिका आहेत.
''फँड्री'' आणि ''शाळा'' ह्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मात्यांची निर्मिती असलेला विवेक वाघ दिग्दर्शित ''सिद्धांत '' हा चित्रपट ह्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. नातू व आजोबा यांच्या हळुवार नात्याला या चित्रपटात गणिताची पार्श्वभूमी आहे. या चित्रपटात विक्रम गोखले, स्वाती चिटनीस, गणेश यादव, माधवी सोमण, सारंग साठ्ये, अर्चित देवधर, नेहा महाजन, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत तपस्वी, सूरज सातव, बाबा आफळे, कांचन जाधव यांच्या भूमिका आहेत.
सध्या प्रेक्षकांच्या आवडी निवडी, त्यांच्या आवडीचे विषय घेऊन चित्रपट बनवण्याचा ट्रेन्ड झालाय, अशाच एक चित्रपट या शुक्रवारला प्रदर्शित होत आहे, तो न्हणजे प्राइम टाइम. टिवी वरील मालिका फक्त महिलाच नव्हे तर सर्व आबाळ वृद्धांच्या आवडीचा विषय आहे. याच विषयावर आधरित ''प्राइम टाइम'' या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रमोद कश्यप आहेत. या चित्रपटात किशोर प्रधान, मिलिंद शित्रे, सुलेखा तळवलकर, कृतिका देव, निशा परुलेकर, स्वयम जाधव, अनुराग वरळीकर, गायत्री देशमुख, जयंत गडेकर आणि सुनील बर्वे यांच्या भूमिका आहेत.

Sunday, 22 March 2015
''हंटर''च्या निमित्ताने
सध्या ''हंटर'' या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर व राधिका आपटे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचे नाव चर्चेत आहे. सई ताम्हणकर यांनी आपल्या करियरच्या सुरवातीपासूनच या आधी ''गजनी'' व ''ब्लैक एंड व्हाईट'' या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तर राधिका आपटे यांनी मराठी सोबतच हिंदी, बंगाली, तेलगू, तामील आणि मल्यालम अशा विविध भाषिक चित्रपटांमधून अभिनय केला आहे. मराठी मुलाची गोष्ट असल्यामुळे साहजिकच ''हंटर''मध्ये सई ताम्हणकर व राधिका आपटे यांच्यासोबतच हंटर मध्ये रविन्द्र मंकणी, नीना कुलकर्णी, ज्योति सुभाष आणि विवेक तत्ववादी अशी मराठी कलाकारांचा अभिनय बघायला मिळणार आहे. अलीकडे प्रदर्शित झालेल्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका होत्या, अनुराग कश्यप दिग्दर्शित ''अग्ली'' मध्ये गिरीश कुलकर्णी यांच्या भूमिकेची सकारात्मक दखल सर्वच समीक्षकांनी घेतली होती. ''अब तक छप्पन २'' मध्ये तर नाना पाटेकर यांच्या सोबतच विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर व ऋषिकेश जोशी अशी दमदार मराठी कलाकारांची फौजच होती. सध्या बॉलीवुड मध्ये मराठी कलाकारांची चलती आहे असेच न्हणावे लागेल.
पूर्वी लक्ष्मण बर्डे सारखे मराठी सुपरस्टार हिंदी मध्ये चरित्र कलाकाराच्या भूमिका करायचे तर त्यांच्यावर टिका व्हायची. अशोक सराफ मात्र मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही नियमितपणे सक्रिय राहिले. मराठी व हिंदी दोन्ही ठिकाणी नियमितपणे सक्रिय असलेल्या मराठी कलाकारांमध्ये सचिन पिळगावकर, सदाशिव अमरापुरकर, रमेश देव, विक्रम गोखले, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे, मोहन जोशी, शिवाजी साटम, विजय पाटकर, सचिन खेडेकर, अजिंक्य देव, संदीप कुलकर्णी, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, राजेश श्रृंगारपुरे, नागेश भोसले, अनंत जोग, यतिन कार्येकर, उदय टिकेकर, प्रसाद ओक यांची नावे ठळकपणे घेता येईल, हि यादी बरीच लांब आहे. मराठी व हिन्दी सोबतच अतुल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, महेश मांजरेकर व सयाजी शिंदे यांनी दाक्षिणात्य चित्रपटांतही बरेच नाव कमावले आहे. मराठी अभिनेत्यांप्रमाणे, मराठी अभिनेत्रीही हिंदी व इतर भाषिक चित्रपटात तितक्याच सामर्थ्यपणे कार्यरत आहेत, ''हंटर''च्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
महेश मांजरेकर निर्मित व दिग्दर्शित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक मराठी कलाकारांना संधी दिली आहे, त्यांच्या वास्तव, प्राण जाये पण शान ना जाये, जिस देश में गंगा रहता है, सिटी ऑफ़ गोल्ड सारख्या चित्रपटांमधून अनेक मराठी कलाकारांची फौज दिसते. सचिन कुंडलकर यांच्या ''अय्या'' मधून सुबोध भावे यांनी हिंदित डेब्यू केला होता. रोहित शेट्टी यांनी पण ''गोलमाल'' सीरीज व ''सिंघम'' सीरीज मध्ये श्रेयस तलपडे, सचिन खेडेकर, अश्विनी कळसेकर, सोनाली कुलकर्णी, जीतेन्द्र जोशी यांनी भूमिका केल्या आहेत.
Friday, 28 November 2014
''स्वामी पब्लिक लिमिटेड'' आणि ''हैप्पी जर्नी''
आज मराठीतील दोन दिग्गज दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शित झालेत, गजेन्द्र अहिरे यांचा ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' व सचिन कुंडलकर यांचा ''हैप्पी जर्नी''.
आज प्रदर्शित झालेला गजेन्द्र अहिरे यांचा ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' श्रद्धेचा बाजार या विषयावर आधारित आहे. ''स्वामी पब्लिक लिमिटेड''च्या माध्यमातून विक्रम गोखले, विनय आपटे, सुबोध भावे व चिन्मय मंडलेकर या जुन्या व नव्या कसदार अभिनेत्यांचा अभिनय बघायला मिळणार आहे.
''अय्या'' मधून हिंदित पदार्पण केल्यानंतर सचिन कुंडलकर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे त्यांचा नविन सिनेमा ''हैप्पी जर्नी'' घेऊन. या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Saturday, 8 November 2014
स्वामी पब्लिक लिमिटेडच्या निमित्ताने
गजेन्द्र अहिरे यांचा नवीन चित्रपट ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' येत्या २८ नवंबरला प्रदर्शित होतोय. मागील एका दशकापासून सातत्याने वेगवेगळ्या विषयावर दर्जेदार चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांना देणाऱ्या गजेन्द्र अहिरे यांचा हा नवीन चित्रपट ''श्रद्धेचा बाजार'' या विषयवार आधारित आहे. ''स्वामी पब्लिक लिमिटेड''च्या माध्यमातून विक्रम गोखले, विनय आपटे, सुबोध भावे व चिन्मय मंडलेकर या जुन्या व नव्या कसदार अभिनेत्यांचा अभिनय बघायला मिळणार आहे.
गजेन्द्र अहिरे यांनी त्यांच्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले आहेत, सोबतच समाजातील विविध समस्यांचा विचार करून त्यांना मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर आणले आहे. उदाहरणार्थ त्यांनी ''त्या रात्री पाऊस होता'' व ''पारध''च्या माध्यमातून राजकारणावर भाष्य केले आहे. ''पिपानी'' च्या माध्यमातून त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या उपरोधक पद्धतीने मांडल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी कुठल्यातरी सामाजिक समस्येचा उहापोह केलेला दिसतो.
या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी ''नितिन देसाई'' व ''चंद्रकांत कुलकर्णी'' यांच्यासारख्या दिग्दर्शकांना सुद्धा दिग्दर्शित केले आहे. अलीकडे त्यांनी मकरंद अनासपुरे यांना पारध, सुंभराण, पिपाणी आणि अनवटच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे आणले आहे. गजेन्द्र अहिरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...