आज (१७ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अतिशय कमी वेळात मिलिंद शिंदे एक समर्थ अभिनेता आणि खलनायक म्हणून नावारूपाला आले आहेत. "नटरंग" चित्रपटातील त्यांची भूमिका खुप गाजली. या भूमिकेने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. त्यामुळे त्यांची गणना आज मराठीतील सध्याच्या घडीतील आघाडीच्या खलनायकामध्ये होते. त्यांनी "नाच तुझच लग्न हाय" या चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले आहे. सध्या ते "अबीर गुलाल" या नाटकात अभिनय करीत आहेत.
Showing posts with label paradh. Show all posts
Showing posts with label paradh. Show all posts
Thursday, 17 March 2016
Saturday, 8 November 2014
स्वामी पब्लिक लिमिटेडच्या निमित्ताने
गजेन्द्र अहिरे यांचा नवीन चित्रपट ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' येत्या २८ नवंबरला प्रदर्शित होतोय. मागील एका दशकापासून सातत्याने वेगवेगळ्या विषयावर दर्जेदार चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांना देणाऱ्या गजेन्द्र अहिरे यांचा हा नवीन चित्रपट ''श्रद्धेचा बाजार'' या विषयवार आधारित आहे. ''स्वामी पब्लिक लिमिटेड''च्या माध्यमातून विक्रम गोखले, विनय आपटे, सुबोध भावे व चिन्मय मंडलेकर या जुन्या व नव्या कसदार अभिनेत्यांचा अभिनय बघायला मिळणार आहे.
गजेन्द्र अहिरे यांनी त्यांच्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले आहेत, सोबतच समाजातील विविध समस्यांचा विचार करून त्यांना मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर आणले आहे. उदाहरणार्थ त्यांनी ''त्या रात्री पाऊस होता'' व ''पारध''च्या माध्यमातून राजकारणावर भाष्य केले आहे. ''पिपानी'' च्या माध्यमातून त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या उपरोधक पद्धतीने मांडल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी कुठल्यातरी सामाजिक समस्येचा उहापोह केलेला दिसतो.
या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी ''नितिन देसाई'' व ''चंद्रकांत कुलकर्णी'' यांच्यासारख्या दिग्दर्शकांना सुद्धा दिग्दर्शित केले आहे. अलीकडे त्यांनी मकरंद अनासपुरे यांना पारध, सुंभराण, पिपाणी आणि अनवटच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे आणले आहे. गजेन्द्र अहिरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
