Showing posts with label natrang. Show all posts
Showing posts with label natrang. Show all posts

Thursday, 17 March 2016

मिलिंद शिंदे

आज (१७ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अतिशय कमी वेळात मिलिंद शिंदे एक समर्थ अभिनेता आणि खलनायक म्हणून नावारूपाला आले आहेत. "नटरंग" चित्रपटातील त्यांची भूमिका खुप गाजली. या भूमिकेने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. त्यामुळे त्यांची गणना आज मराठीतील सध्याच्या घडीतील आघाडीच्या खलनायकामध्ये होते. त्यांनी "नाच तुझच लग्न हाय" या चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले आहे. सध्या ते "अबीर गुलाल" या नाटकात अभिनय करीत आहेत.    

Monday, 23 November 2015

अमृता खानविलकर

आज (२३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अमृता खानविलकर यांनी आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने मराठी रसिकांची मने जिंकून घेतली आहे. "नटरंग" या चित्रपटातील "वाजले की बारा" या लावणीने त्या प्रकाश झोतात आल्या. २०१५ साली त्यांनी "नच बलिये" या कार्यक्रमाच्या सातव्या पर्वाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. अभिनय आणि नृत्य यांच्यासोबतच सूत्र संचालनासाठी त्या प्रसिद्द आहेत, "कॉमेडी एक्सप्रेस" या कार्यक्रमाचे सूत्र त्यांनी केले होते. त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.amrutakhanvilkar.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.  

अमृता खानविलकर यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • गोलमाल (२००६)
  • मुंबई सालसा (२००७)
  • साडे माडे तिन (२००७)
  • हॅट्रीक (२००७)
  • कॉन्ट्रॅक्ट (२००८)
  • फुंक (२००८)
  • दोघात तिसरा आता सगळे विसरा (२००८)
  • गैर (२००९)
  • नटरंग (२०१०)
  • फुंक - २ (२०१०)
  • फिल्लम सिटी (२०१०)
  • अर्जुन (२०११)
  • फक्त लढ म्हणा..! (२०११)
  • झकास (२०११)
  • शाळा (२०११)
  • सतरंगी रे (२०११)
  • आयना का बायना (२०१३)
  • बाजी (२०१५)
  • वेलकम ज़िन्दगी (२०१५)
  • कट्यार काळजात घुसली (२०१५)

Monday, 9 November 2015

किशोर कदम

आज (९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार, अभिनेते व कवी किशोर कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

ते सौमित्र या टोपण नावाने कविता लिहितात. त्यांचे "जावे कवितांच्या गावा" आणि "... आणि तरीही मी!" हे कवितासंग्रह प्रसिद्द झाले आहेत. त्यांना लिहिलेल्या गीतांचा अल्बम "गारवा" हा खुप गाजला. त्यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित "समर" या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. "नटरंग" या मराठी रवी जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपटातल्या पाण्डोबाच्या भूमिकेने त्यांना नविन ओळख मिळवून दिली. "मम्मो", "लिमिटेड माणुसकी", "संशोधन", "दिल पे मत ले यार", "ध्यासपर्व", "ब्लैक फ्राइडे", "शोभायात्रा", "कॉन्ट्रैक्ट", "फूँक", "एक कप च्या", "जोगवा", "मरेपर्यंत फाशी", "समान्तर", "प्रतिसाद", "बालगंधर्व", "तार्यांचे बेट", "बालक पालक", "हा भारत माझा", "अनुमती", "फँड्री", "रज्जो", "रेला रे", "स्पेशल २६", टूरिंग टॉकीज", "तुह्या धर्म कोणचा?", "अनवट", "मंजुनाथ", "पोस्टकार्ड", "सिद्धांत", "जाणिवा" आणि "हाईवे" या हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "चौर्य", "चिरंजीव", "दमलेल्या बाबाची कहानी", "घंटा", "गणवेश", "इश्क प्रेम लव" आणि  "परतु" या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या प्रत्येक चित्रपटात ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहेत.

Tuesday, 22 September 2015

रवी जाधव

आज (२२ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी २०१० साली ''नटरंग'' चित्रपट दिग्दर्शित करून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिळाला, त्यांना सर्वोकृष्ट दिग्दर्शासाठी जी गौरव पुरस्कार देण्यात आला.  यासोबतच अनेक चित्रपट सोहळ्यांमध्ये "नटरंग''ला अनेक पुरस्कार मिळाले. ''नटरंग''ने टिकिट खिडकीवर सुद्धा तूफान गर्दी खेचली. दिग्दर्शन, अभिनय, संगीत, नृत्य अशा सगळ्यालाच अंगासाठी ''नटरंग''चा गौरव करण्यात आला. त्यामुळे पदर्पणातच त्यांनी स्टार दिग्दर्शक अशी ओळख निर्माण केली व ती "बालगंधर्व", "बालक पालक", "टाईमपास", "टाईमपास २" आणि "बायस्कोप (मित्रा)" अशी वाढत गेली.

आता रवी जाधव हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते सध्या ''बैंजो'' या त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटावर काम करत आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.ravijadhav.com या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता.

Friday, 11 September 2015

अतुल गोगावले

आज (११ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक अतुल गोगावले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!  हिंदी आणि मराठीमधील आघाडीचे संगीत दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जातात. ''अजय अतुल'' या संगीतकार जोडीतील अतुल गोगावले हे थोरले  बंधू. २००९ साली आलेल्या ''जोगवा'' चित्रपटासाठी सर्वोकृष्ट संगीत दिग्दर्शकांचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर २०१० आलेल्या ''नटरंग'' या चित्रपटाने त्यांची गाणी अवघ्या मराठी जनाच्या ओठावर रुळली. रवी जाधव दिग्दर्शित ''नटरंग'' चित्रपटाच्या यशामागे ''अजय-अतुल'' या जोडीच्या संगीताचा महत्वाचा वाटा होता. या चित्रपटातील सर्वच गाणी खुप गाजली. मागील वर्षी आलेल्या ''लय भारी'' या चित्रपटातील ''माऊली माऊली'' या गाण्याने लोकप्रियतेचा नवीन विक्रम निर्माण केला. 

“अगं बाई अरेच्च्या!”, “गोड गुपित”, “जत्रा”, “सावरखेड एक गाव”, “जबरदस्त”, “बंध प्रेमाचे”, “साडे माडे तीन”, “चेकमेट”, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं”, “मुंबई आमचीच”, “उलाढाल”, “एक डाव धोबीपछाड”, “बेधुंद”, “ऑक्सिजन”, “रिंगा रिंगा”, “भारतीय” आणि “टपाल” या मराठी चित्रपटांना ही त्यांनी संगीत दिले आहे. हरिहरन, कृणाल गांजावाला, सोनू निगम आणि श्रेया घोषाल अशा हिंदीतील दिग्गजांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली आहे. ''सिंघम'' आणि ''अग्निपथ'' या त्यांच्या हिंदी चित्रपटातील गाणी हि खुप लोकप्रिय झाली. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.ajayatul.com या त्यांच्या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटचे अनावरण माननीय अभिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले होते.

Tuesday, 28 July 2015

''नच बलिये''च्या निमित्ताने

मराठी चित्रपट सृष्टितील सर्वांची आवडती नायिका अमृता खानविलकर तिच्या जोडीदार हिमांशु मल्होत्रा सह ''नच बलिये''च्या सातव्या पर्वाची विजेती ठरली आहे, त्या करीता तिचे हार्दिक अभिनंदन. या पूर्वी ही सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या मराठमोळ्या जोडीने ''नच बलिये''च्या अगदी पहिल्याच पर्वामध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे मराठी पाऊल पडते पुढे असेच न्हणावे लागेल.

अमृता खानविलकर हिने ''नच बलिये''च्या सातव्या पर्वात भाग घेतला तेव्हाच सर्व प्रेक्षकांना तिच्या विजयाबद्दल खात्री होती कारण मराठी चित्रपट सृष्टित ती तिच्या नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते. अमृताने ''नटरंग'' या चित्रपटामधील ''जाऊ दया ना घरी आता वाजले की बारा'' या लावणीने नवीन ओळख निर्माण केली. २०१२ साली आलेल्या ''आयना का बायना'' या चित्रपटात तिने नृत्य शिक्षकेची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे साकारली होती. ''महाराष्ट्राचे डांसिंग सुपर स्टार - छोटे मास्टर्स'' या शो टीवी शो मध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. अमृताने तिच्या वेबसाइट वर तिचे खास डांस परफार्मंस पण दिले आहेत ते तुम्ही http://www.amrutakhanvilkar.in/my_hits_lavani.php या लिंकवर बघु शकता.

अमृताला तिच्या पुढील कारकिर्दी साठी हार्दिक शुभेच्छा.   

किरण नाटकी