आज (२२ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! "सा रे गा मा" या गाण्याच्या रियलिटी शो मधून पहिल्यांदा केतकीची ओळख सर्वांना झाली. गायनानंतर केतकीनी "शाळा" या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयात पाहिले पाऊल टाकले. "शाळा" या पहिल्याच चित्रपटात केतकीनी रसिकांची मने जिंकून घेतली. "शाळा" नंतर ती "काकस्पर्श", "तानी", "टाईम पास", "टाईम पास २" या चित्रपटांमधून दिसली. आता तिचा "फुंटरू" हा मराठी चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटातील तिच्या वेगळया लूकची जोरदार चर्चा आहे. "शाळा" नंतर दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या सोबत तिचा दूसरा चित्रपट असणार आहे.
Showing posts with label time pass 2. Show all posts
Showing posts with label time pass 2. Show all posts
Monday, 22 February 2016
केतकी माटेगावकर
आज (२२ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! "सा रे गा मा" या गाण्याच्या रियलिटी शो मधून पहिल्यांदा केतकीची ओळख सर्वांना झाली. गायनानंतर केतकीनी "शाळा" या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयात पाहिले पाऊल टाकले. "शाळा" या पहिल्याच चित्रपटात केतकीनी रसिकांची मने जिंकून घेतली. "शाळा" नंतर ती "काकस्पर्श", "तानी", "टाईम पास", "टाईम पास २" या चित्रपटांमधून दिसली. आता तिचा "फुंटरू" हा मराठी चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटातील तिच्या वेगळया लूकची जोरदार चर्चा आहे. "शाळा" नंतर दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या सोबत तिचा दूसरा चित्रपट असणार आहे.Tuesday, 22 September 2015
रवी जाधव
आज (२२ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव
यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! जाहिरात
क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी २०१० साली ''नटरंग'' चित्रपट दिग्दर्शित
करून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या या पहिल्याच
चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा
बहुमान मिळाला, त्यांना सर्वोकृष्ट दिग्दर्शासाठी जी गौरव पुरस्कार
देण्यात आला. यासोबतच अनेक चित्रपट सोहळ्यांमध्ये "नटरंग''ला अनेक
पुरस्कार मिळाले. ''नटरंग''ने टिकिट खिडकीवर सुद्धा तूफान गर्दी खेचली.
दिग्दर्शन, अभिनय, संगीत, नृत्य अशा सगळ्यालाच अंगासाठी ''नटरंग''चा गौरव
करण्यात आला. त्यामुळे पदर्पणातच त्यांनी स्टार दिग्दर्शक अशी ओळख
निर्माण केली व ती "बालगंधर्व", "बालक पालक", "टाईमपास", "टाईमपास २" आणि
"बायस्कोप (मित्रा)" अशी वाढत गेली. आता रवी जाधव हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते सध्या ''बैंजो'' या त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटावर काम करत आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.ravijadhav.com या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता.
Friday, 18 September 2015
प्रिया बापट
आज (१८ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री प्रिया
बापट यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २०००
साली प्रदर्शित झालेल्या ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' या चित्रपटातुन
त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ''मुन्नाभाई MBBS'' आणि ''लगे
रहो मुन्नाभाई'' या हिंदी चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या पण त्या
छोट्या भूमिकेतही त्यांनी आपली चमक दाखवली. ''मी शिवाजीराजे भोसले बोलतोय''
या प्रचंड गाजलेल्या चित्रपटात त्यांनी सचिन खेडेकर यांच्या मुलीची भूमिका
केली होती. २०१३ साली आलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित ''काकस्पर्श'' हा
चित्रपट त्यांच्या करियरला कलाटणी देणारा ठरला. त्यात प्रिया बापट यांनी
बालविधवेची भूमिका केली होती. त्यानंतर ''टाईम प्लीज'', "आंधळी
कोथिम्बीर'', "हैप्पी जर्नी ", "लोकमान्य एक युग पुरुष" आणि " टाईम पास २"
असे यशस्वी चित्रपट त्यांनी दिले आहे. या सर्वच चित्रपटात त्यांच्या
अभिनयाचे व लूकचे कौतुक झाले.
आज घडीला १९ लाखापेक्षा जास्त लोक त्यांच्या
फेसबुक पेजला लाइक करतात, यावरून त्यांचे किती फैंस आहेत याचा सहज अंदाज
येऊ शकतो. ''नवा गडी नव राज्य" हे त्यांच अत्यंत गाजलेल नाटक, या नाटकावर
''टाईम प्लीज'' या चित्रपटाची निर्मिती झाली त्यातही त्यांची प्रमुख भूमिका
होती. याच नाटकातील त्यांचे सह कलाकार व चित्रपट अभिनेता उमेश कामत यांच्या सोबत त्या विवाहबद्ध झाल्या आहेत. उमेश कामत व प्रिया बापट हि मराठी चित्रपट सृष्टि मधील सर्वात क्यूट जोडी आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.priyabapat.in या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता.
Sunday, 15 March 2015
सीक्वलची सुनामी
हॉलीवुडमध्ये सीक्वलचा खुप जूना इतिहास आहे. बॉलीवुडमध्येही मागील दहा ते पंधरा वर्षात अनेक चित्रपटाचे सीक्वल निघाले, पण त्यात प्रेक्षकांना चांगला चित्रपट देण्याऐवजी मागील चित्रपटाची ब्राण्ड वैल्यू वापरण्यावर अधिक भर होता त्यामुळे बॉलीवुडमधील बऱ्याच सीक्वल चित्रपटांना तिकीट खिडकीवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता हे सीक्वलचे लोण मराठी चित्रपटांमध्येही पसरायला लागले आहे. येणाऱ्या काळात मराठी चित्रपटाच्या सीक्वलची लाट नव्हे सुनामी बघायला मिळणार आहे.
अलीकडे ''झपाटलेला २'', ''चिंटू २'' व ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' वगळता फारसे सीक्वल मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बघायला मिळाले नाहीत. या पैकी ''झपाटलेला २'' वगळता इतर चित्रपटाची चर्चाही फार झाली नाही. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललेले बघायला मिळणार आहे. ''टाइम पास २'', ''अग बाई अरेच्या २'', ''मुंबई पुणे मुंबई २'', ''पोस्टर बॉयज़ २'' व ''क्लासमेट्स २'' हे मराठी चित्रपटाचे सीक्वल निर्मितीच्या वेगवेगळया अवस्थेत आहेत. या पैकी ''टाइम पास २'' व ''अग बाई अरेच्या २'' या सीक्वलसचे ट्रेलर प्रसिद्ध झाले असून त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ''मुंबई पुणे मुंबई २''चे चित्रीकरण सुरु आहे. ''पोस्टर बॉयज़''चे निर्माते व प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तलपदे आता ''पोस्टर बॉयज़ २''च्या निमित्ताने दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसणार आहे. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ''क्लासमेट्स''च्या सक्सेस पार्टीत ''क्लासमेट्स २'' ची घोषणा करण्यात आली आली आहे. एका वेबसाइटवर आलेल्या बातमीनुसार पुष्कर जोग यांनी त्यांच्या जबरदस्त या चित्रपटाच्या सीक्वल असलेल्या ''जबरदस्त २'' या चित्रपटाची घोषणा केली आहे.
मराठी चित्रपटाचे सीक्वल हे मराठी चित्रपटांमध्ये वाढत असलेल्या व्यावसायिकतेचे उदाहरण आहे, यामुळे मराठी चित्रपट सृष्टि अधिकाधिक समृद्ध होण्यासच मदत होणार आहे. सोबतच या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद सीक्वलची लाट किती वेळ टिकेल हे ठरवणार आहे.
अलीकडे ''झपाटलेला २'', ''चिंटू २'' व ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' वगळता फारसे सीक्वल मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बघायला मिळाले नाहीत. या पैकी ''झपाटलेला २'' वगळता इतर चित्रपटाची चर्चाही फार झाली नाही. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललेले बघायला मिळणार आहे. ''टाइम पास २'', ''अग बाई अरेच्या २'', ''मुंबई पुणे मुंबई २'', ''पोस्टर बॉयज़ २'' व ''क्लासमेट्स २'' हे मराठी चित्रपटाचे सीक्वल निर्मितीच्या वेगवेगळया अवस्थेत आहेत. या पैकी ''टाइम पास २'' व ''अग बाई अरेच्या २'' या सीक्वलसचे ट्रेलर प्रसिद्ध झाले असून त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ''मुंबई पुणे मुंबई २''चे चित्रीकरण सुरु आहे. ''पोस्टर बॉयज़''चे निर्माते व प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तलपदे आता ''पोस्टर बॉयज़ २''च्या निमित्ताने दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसणार आहे. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ''क्लासमेट्स''च्या सक्सेस पार्टीत ''क्लासमेट्स २'' ची घोषणा करण्यात आली आली आहे. एका वेबसाइटवर आलेल्या बातमीनुसार पुष्कर जोग यांनी त्यांच्या जबरदस्त या चित्रपटाच्या सीक्वल असलेल्या ''जबरदस्त २'' या चित्रपटाची घोषणा केली आहे.मराठी चित्रपटाचे सीक्वल हे मराठी चित्रपटांमध्ये वाढत असलेल्या व्यावसायिकतेचे उदाहरण आहे, यामुळे मराठी चित्रपट सृष्टि अधिकाधिक समृद्ध होण्यासच मदत होणार आहे. सोबतच या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद सीक्वलची लाट किती वेळ टिकेल हे ठरवणार आहे.
Sunday, 15 February 2015
टाईम पास २
काही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट झालेले असतात, ''टाईम पास २'' हा त्यापैकीच एक आहे. ''टाईम पास'' प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांना ''टाईम पास २''चे वेध लागले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव फेसबुकच्या माध्यमातून ''टाईम पास २'' बद्दलचे अपडेट सातत्याने पोस्ट करीत अाहेत. त्यांनीच फेसबुकच्या माध्यमातून १ मे ला ''टाईम पास २'' प्रदर्शित होईल असे जाहीर केले आहे.दरम्यान या चित्रपटांमध्ये दगडू व प्राजक्ता भूमिकेत कोण आहे? याची उत्कंठा अगदी शिगेला पोहचली आहे. हिंदी मध्ये बरेचदा चित्रपटांमध्ये कलाकारांचा लुक व गोष्ट या विषयी गुप्तता ठेवून त्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली जाते, पण चित्रपटाच्या नायक व नायिका या विषयी अशा प्रयोग मराठी चित्रपटामध्ये पहिल्यांदा होत असावा.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...