Showing posts with label Chintoo 2. Show all posts
Showing posts with label Chintoo 2. Show all posts

Monday, 1 February 2016

विभावरी देशपांडे

आज (१ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री विभावरी देशपांडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! चित्रपट सुष्टित प्रवेश करण्याआधी त्या नाटकांमध्ये अभिनय आणि संवाद लेखन करायच्या. विभावरी देशपांडे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला असला तरी "हरिचन्द्राची फैक्टरी" या परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपटातील दादासाहेब फाळके यांची पत्नी सरस्वती फाळके यांच्या भूमिकेने त्यांना ओळख मिळवून दिली. या भूमिकेसाठी त्यांना मिफ्ताचा सर्वोकृष्ट  अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. 

विभावरी देशपांडे यांनी खालील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 
  • चकवा (२००४)
  • श्वास (२००४)
  • सातच्या आत घरात (२००४)
  • दम काटा (२००७)
  • मुंबई मेरी जान (२००८)
  • हरिश्‍चंद्राची फॅक्टरी (२००९)
  • नटरंग (२०१०)
  • बालगंधर्व (२०११)
  • देऊळ (२०११)
  • चिंटू (२०१२)
  • तुह्या धर्म कोनचा? (२०१२)   

Sunday, 15 March 2015

सीक्वलची सुनामी

हॉलीवुडमध्ये सीक्वलचा खुप जूना इतिहास आहे. बॉलीवुडमध्येही मागील दहा ते पंधरा वर्षात अनेक चित्रपटाचे सीक्वल निघाले, पण त्यात प्रेक्षकांना चांगला चित्रपट देण्याऐवजी मागील चित्रपटाची ब्राण्ड वैल्यू वापरण्यावर अधिक भर होता त्यामुळे बॉलीवुडमधील बऱ्याच सीक्वल चित्रपटांना तिकीट खिडकीवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता हे सीक्वलचे लोण मराठी चित्रपटांमध्येही पसरायला लागले आहे. येणाऱ्या काळात मराठी चित्रपटाच्या सीक्वलची लाट नव्हे सुनामी बघायला मिळणार आहे.

अलीकडे ''झपाटलेला २'', ''चिंटू २'' व ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' वगळता फारसे सीक्वल मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बघायला मिळाले नाहीत. या पैकी ''झपाटलेला २'' वगळता इतर चित्रपटाची चर्चाही फार झाली नाही. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललेले बघायला मिळणार आहे. ''टाइम पास २'', ''अग बाई अरेच्या २'', ''मुंबई पुणे मुंबई २'', ''पोस्टर बॉयज़ २'' व ''क्लासमेट्स २'' हे मराठी चित्रपटाचे सीक्वल निर्मितीच्या वेगवेगळया अवस्थेत आहेत. या पैकी ''टाइम पास २'' व ''अग बाई अरेच्या २'' या सीक्वलसचे ट्रेलर प्रसिद्ध झाले असून त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ''मुंबई पुणे मुंबई २''चे चित्रीकरण सुरु आहे. ''पोस्टर बॉयज़''चे निर्माते व प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तलपदे आता ''पोस्टर बॉयज़ २''च्या निमित्ताने दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसणार आहे. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ''क्लासमेट्स''च्या सक्सेस पार्टीत ''क्लासमेट्स २'' ची घोषणा करण्यात आली आली आहे. एका वेबसाइटवर आलेल्या बातमीनुसार पुष्कर जोग यांनी त्यांच्या जबरदस्त या चित्रपटाच्या सीक्वल असलेल्या ''जबरदस्त २'' या चित्रपटाची घोषणा केली आहे.

मराठी चित्रपटाचे सीक्वल हे मराठी चित्रपटांमध्ये वाढत असलेल्या व्यावसायिकतेचे उदाहरण आहे, यामुळे मराठी चित्रपट सृष्टि अधिकाधिक समृद्ध होण्यासच मदत होणार आहे. सोबतच या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद सीक्वलची लाट किती वेळ टिकेल हे ठरवणार आहे.

किरण नाटकी