Showing posts with label nagpur. Show all posts
Showing posts with label nagpur. Show all posts

Monday, 29 August 2016

मानसी मोघे

आज (२९ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मानसी मोघे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मुळची इंदौरची असलेली मानसी मोघे यांनी नागपूर येथून इंजीनिरिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यानंतर त्यांनी अनेक सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. "बुगडी माझी सांडली ग" हा मानसी मोघे यांचा पहिला मराठी चित्रपट होता.  

Friday, 1 July 2016

मुकुंद वसूले

आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मुकुंद वसूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मुकुंद वसूले विदर्भातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी "शेगावीचा योगी गजानन" या चित्रपटात गजानन महाराजांची भूमिका साकारली आहे. सोबतच "गार्भीचा पाऊस" या चित्रपटातील त्यांच्या शेतकऱ्याच्या भूमिकेचे ही खुप कौतुक झाले. "बाबू बैंड बाजा" या चित्रपटात ही त्यांची महत्वाची भूमिका होती. २०१४ साली स्मिता स्मृति पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Monday, 22 February 2016

केतकी माटेगावकर

आज (२२ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! "सा रे गा मा" या गाण्याच्या रियलिटी शो मधून पहिल्यांदा केतकीची ओळख सर्वांना झाली. गायनानंतर केतकीनी "शाळा" या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयात पाहिले पाऊल टाकले. "शाळा" या पहिल्याच चित्रपटात केतकीनी रसिकांची मने जिंकून घेतली. "शाळा" नंतर ती "काकस्पर्श", "तानी", "टाईम पास", "टाईम पास २" या चित्रपटांमधून दिसली. आता तिचा "फुंटरू" हा मराठी चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटातील तिच्या वेगळया लूकची जोरदार चर्चा आहे. "शाळा" नंतर दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या सोबत तिचा दूसरा चित्रपट असणार आहे.

Thursday, 8 October 2015

राजेश चिटणीस

आज (८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते राजेश चिटणीस यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! राजेश चिटणीस हे जेष्ठ अभिनेते व नकलाकार राजाभाऊ चिटणीस यांचे चिरंजीव आहेत. राजेश चिटणीस यांनी "झपाटलेला २" आणि "निशानी डावा अंगठा" या चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. नागपूरच्या व्यावसायिक रंगभूमीवरील ''असे नवरे अश्या बायका" या नाटकात त्यांची प्रमुख भूमिका होती, सोबतच दरवर्षी ते झाडीपट्टी रंगभूमीमध्ये नवनवीन नाटकांच्या माध्यमातून सक्रीय असतात. 

किरण नाटकी