Showing posts with label kaksparsh. Show all posts
Showing posts with label kaksparsh. Show all posts

Monday, 22 February 2016

केतकी माटेगावकर

आज (२२ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! "सा रे गा मा" या गाण्याच्या रियलिटी शो मधून पहिल्यांदा केतकीची ओळख सर्वांना झाली. गायनानंतर केतकीनी "शाळा" या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयात पाहिले पाऊल टाकले. "शाळा" या पहिल्याच चित्रपटात केतकीनी रसिकांची मने जिंकून घेतली. "शाळा" नंतर ती "काकस्पर्श", "तानी", "टाईम पास", "टाईम पास २" या चित्रपटांमधून दिसली. आता तिचा "फुंटरू" हा मराठी चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटातील तिच्या वेगळया लूकची जोरदार चर्चा आहे. "शाळा" नंतर दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या सोबत तिचा दूसरा चित्रपट असणार आहे.

Friday, 18 September 2015

प्रिया बापट

आज (१८ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री प्रिया बापट यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २००० साली प्रदर्शित झालेल्या ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' या चित्रपटातुन त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ''मुन्नाभाई MBBS'' आणि ''लगे रहो मुन्नाभाई'' या हिंदी चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या पण त्या छोट्या भूमिकेतही त्यांनी आपली चमक दाखवली. ''मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'' या प्रचंड गाजलेल्या चित्रपटात त्यांनी सचिन खेडेकर यांच्या मुलीची भूमिका केली होती. २०१३ साली आलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित ''काकस्पर्श'' हा चित्रपट त्यांच्या करियरला कलाटणी देणारा ठरला. त्यात प्रिया बापट यांनी बालविधवेची भूमिका केली होती. त्यानंतर ''टाईम प्लीज'', "आंधळी कोथिम्बीर'', "हैप्पी जर्नी ", "लोकमान्य एक युग पुरुष" आणि " टाईम पास २" असे यशस्वी चित्रपट त्यांनी दिले आहे. या सर्वच चित्रपटात त्यांच्या अभिनयाचे व लूकचे कौतुक झाले. 

आज घडीला १९ लाखापेक्षा जास्त लोक त्यांच्या फेसबुक पेजला लाइक करतात, यावरून त्यांचे किती फैंस आहेत याचा सहज अंदाज येऊ शकतो. ''नवा गडी नव राज्य" हे त्यांच अत्यंत गाजलेल नाटक, या नाटकावर ''टाईम प्लीज'' या चित्रपटाची निर्मिती झाली त्यातही त्यांची प्रमुख भूमिका होती. याच नाटकातील त्यांचे सह कलाकार व चित्रपट अभिनेता उमेश कामत यांच्या सोबत त्या विवाहबद्ध झाल्या आहेत. उमेश कामत व प्रिया बापट हि मराठी चित्रपट सृष्टि मधील सर्वात क्यूट जोडी आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.priyabapat.in या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता. 

Sunday, 16 August 2015

महेश मांजरेकर

मराठी चित्रपट सुष्टिला नवसंजीवनी देण्यात ज्या निर्मात्यांचा व दिग्दर्शकांचा वाटा आहे त्यात महेश मांजरेकर हे नाव नेहमीच अग्रणी राहिले आहे. हिंदित ''वास्तव'' सारखे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर त्यांनी मराठीमध्ये ''मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'' या चित्रपटात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली. या चित्रपटाने टिकिटखिडकीवर जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर त्यांनी ''शिक्षणाच्या आईचा घो'', ''लालबाग परळ'', ''फक्त लढ म्हणा'', ''काकस्पर्श'' आणि ''कोकणस्थ'' या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली. आज (१६ ऑगस्ट) त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट  
  • कोकणस्थ (२०१३)
  • काकस्पर्श (२०१२)
  • आमी सुभाष बोलची (२०११)
  • फक्त लढ म्हणा (२०११)
  • लालबाग परळ (२०१०)
  • सिटी ऑफ गोल्ड - मुंबई १९८२: एक अनकही कहानी (२०१०)
  • शिक्षणाच्या आईचा घो (२०१०)
  • देह (२००७) 
  • स्ट्रगलर (२००६)
  • इट वाज रेनिंग ड्यात नाईट (२००५)
  • वाह लाइफ हो तो ऐसी (२००५) 
  • विरुद्ध … फॅमिली कम फर्स्ट (२००५) 
  • पद्मश्री लालू प्रसाद यादव (२००५)
  • रक्त (२००४)
  • प्यार किया नही जाता (२००३)
  • हत्यार (२००२)
  • पिता (२००२)
  • एहसास (२००१)
  • तेरा मेरा साथ रहे (२००१)
  • कुरुक्षेत्र (२०००)
  • जिस देश में गंगा रहता है (२०००)
  • अस्तिव (२०००)
  • निदान (२०००)
  • वास्तव (१९९९) 
  • आई (१९९५)


महेश मांजरेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट  

  • जय हो (२०१४)
  • रेगे (२०१४)
  • सिंघम रिटर्न्स (२०१४)
  • अर्धांगिनी (२०१४)
  • हिम्मतवाला (२०१३)
  • शूटआऊट ॲट वडाळा (२०१३)
  • आरंबम (२०१३)
  • रज्जो (२०१३)
  • आजचा दिवस माझा (२०१३)
  • तुक्का फिट (२०१२)
  • ओ.एम.जी. – ओ माय गॉड! (२०१२)
  • जय जय महाराष्ट्र माझा (२०१२)
  • रेडी (२०११)
  • फक्त लढ म्हणा (२०११)
  • बॉडीगार्ड (२०११)
  • अधुर्स (२०१०)
  • दबंग (२०१०)
  • डॉन सीनू (२०१०)
  • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२००९)
  • वॉन्टेड (२००९)
  • ९९ (२००९)
  • फ्रुट ॲंड नट (२००९)
  • तीन पत्ती (२००९)
  • मीराबाई नॉट आऊट (२००८) 
  • स्लमडॉग मिलियोनेर (२००८)
  • होमम (२००८)
  • दस कहानियां (२००७)
  • ओक्काडुन्नाडू (२००७)
  • पद्मश्री लालू प्रसाद यादव (२००७)
  • जिंदा (२००६)
  • जवानी दिवानी (२००६)
  • इट वॉज रेनिंग दॅट नाईट (२००५)
  • प्लॅन (२००४)
  • रन (२००४)
  • मुसाफिर (२००४)
  • कांटे (२००३)
  • प्राण जाये पर शान ना जाये (२००३)
  • एहसास (२००१)
  • वास्तव (१९९९)

Tuesday, 31 March 2015

''कॉफी आणि बरेच काही''च्या निमित्ताने

सध्या मराठी युवक मोठ्या प्रमाणावर मराठी चित्रपटांकडे वळत आहेत, त्यामुळे युवकांच्या आवड व निवड लक्षात घेऊन चित्रपट बनवले जात आहेत. मराठी चित्रपटांमध्ये युवकांशी संबधित विषयांना प्राधान्य देण्यात येत आहे. असाच एक चित्रपट ''कॉफी आणि बरेच काही'' या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. रवी जाधव प्रस्तुत ''कॉफी आणि बरेच काही'' आजच्या युवकांची, त्यांच्या प्रेम व लग्नविषयक संकल्पनाची गोष्ट आहे. करियरमुळे लग्नाचे वय वाढत आहे, त्याचबरोबर युवकांमध्ये लग्नविषयक अनेक प्रश्न व दुविधा असतात. नेमक्या ह्याच प्रश्नांना घेऊन अलिकडल्या काळात अनेक मराठी चित्रपटांची निर्मिति झाली आहे. हा प्रश्न मराठी चित्रपट वेगवेगळ्या प्रकारे मांडताना दिसून येत अाहे. 

अलीकडच्या काळात ''मिस मैच'', ''तप्तपदी'', ''मंगलाष्टक वन्स मोर'', ''लग्न पहाव करून'', ''टाईम प्लीज'', ''असा मी तशी ती'', ''काकस्पर्श'', ''मुंबई पुणे मुंबई'', ''सनई चौघडे'', ''फॉरेनची पाटलीण'', ''मणि मंगलसूत्र'', ''यंदा कर्त्तव्य आहे'', ''दोघी'' हे चित्रपट लग्न संस्थेविषयी चर्चा करतांना दिसून येतात. ''सनई चौघडे''मध्ये कुमारी मातेचा प्रश्न तर ''काकस्पर्श''मध्ये बाल विधवेचा प्रश्न अतिशय संवदेनशीलपणे हाताळण्यात आला होता. लग्नावरच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''मुंबई पुणे मुंबई २'' या चित्रपटाची टैग लाईन ''लग्नाला यायच'' अशी आहे.   

काही चित्रपट लग्नानंतरच्या विविध भावनिक समस्या मांडतांना दिसून येतात त्यामध्ये ''अ रेनी डे'', ''पुणे ५२'', ''प्रेम न्हणजे प्रेम असत'', ''प्रेमाची गोष्ट'', ''गुलमोहर'' व ''शेवरी'' अशा चित्रपटाचा समावेश आहे. अशा विषयावरचा सतीश राजवाडे यांचा ''प्रेमाची गोष्ट'' हा अतिशय सुन्दर चित्रपट आहे.

किरण नाटकी