Showing posts with label time please. Show all posts
Showing posts with label time please. Show all posts

Saturday, 12 December 2015

उमेश कामत

आज (१२ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उमेश कामत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. "कायद्याच बोला" या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत. त्यांनी खालील मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती करीता तुम्ही त्यांच्या www.umeshkamat.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.  
  • कायद्याच बोला (२००६)
  • समर - एक संघर्ष (२००६)
  • पटल तर घ्या (२००८)
  • अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
  • मणि मंगलसूत्र (२०१०)
  • थोडी खट्टी थोडी हट्टी (२०१२)
  • धागे दोरे (२०१२)
  • परीस (२०१३)
  • टाइम प्लीज (२०१३)
  • माय डिअर यश (२०१३)
  • लग्न पाहावे करून (२०१३)
  • पुणे वीअ  बिहार (२०१४) 
  • बाळकडू (२०१५)
  • अ पेइंग घोस्ट (२०१५)
  • मुंबई टाइम (२०१६)

Thursday, 25 June 2015

सई ताम्हणकर

मराठी चित्रपट सृष्टितील बोल्ड एंड ब्यूटिफुल अभिनेत्री न्हणजे सई ताम्हणकर, अतिशय कमी वेळात  अभिनयाच्या बळावर त्यांनी मराठी चित्रपट सृष्टित आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपट सृष्टि सोबतच या वर्षी त्यांनी ''हंटर'' या हिंदी चित्रपटांमधून महत्त्वाची भूमिका साकारून हिंदी चित्रपट सृष्टित ही यशस्वी पदार्पण केले आहे, या आधी अगदी कारीयरच्या सुरवातीला त्यांनी ''ब्लैक एंड व्हाइट'' आणि ''गजनी'' या दोन मोठ्या हिंदी  चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. स्वप्निल जोशी यांच्याबरोबर सईची जोडी विशेष गाजली, ''दुनियादारी'', ''मंगलाष्टक वन्स मोर'', ''प्यार वाली लव स्टोरी'' या चित्रपटांमधून हि जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे. ''तू हि रे'' हा या जोडीचा आगामी चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होतोय. संजय जाधव, स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर हे त्रिकुट आज मराठी चित्रपट सृष्टित यशाचे सूत्र मानले जाते. आज सई ताम्हणकर यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.

सई ताम्हणकर यांनी अभिनय केलेले  चित्रपट

  • ब्लैक एण्ड व्हाइट (२००८)
  • सनई चौघडे (२००८) 
  • पिकनिक (२००८) 
  • गजनी (२००८) 
  • हाय काय .... नाय काय ….  (२००९)  
  • बे दुने साढे चार (२००९)
  • सुम्भरान (२००९)  
  • अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
  • मिशन पॉसिबल (२०१०) 
  • रीटा (२०१०) 
  • लालबाग परळ (२०१०)  
  • झकास (२०११)
  • राडा रॉक्स (२०११) 
  • दोन घडीचा डाव (२०११) 
  • पुणे ५२ (२०१२)  
  • अशाच एका बेटावर (२०१२)
  • गाजराची पुंगी (२०१२)
  • विला (२०१२)
  • नो एन्ट्री पुढे धोका आहे (२०१२) 
  • अघोर (२०१२)
  • बाबुरावला पकडा (२०१२) 
  • धागेदोरे (२०१२)
  • बालक पालक (२०१३)
  • झपाटलेला २ (२०१३)
  • दुनियादारी (२०१३)
  • टाइम प्लीज (२०१३)
  • अनुमति (२०१३)
  • मंगलाष्टक वन्स मोर (२०१३) 
  • तेंदुलकर आउट (२०१३)
  • गुरु पौर्णिमा (२०१४)
  • पोर बाजार (२०१४)
  • प्यार वाली लव स्टोरी (२०१४) 
  • पोस्ट कार्ड (२०१४)
  • सौ शशि देवधर (२०१४)
  • क्लासमेट्स (२०१५)
  • हंटर (२०१५)
  • तू हि रे (२०१५)

सई ताम्हणकर यांनी अभिनय केलेल्या टिवी मालिका

  • फु बाई फु 
  • या गोजिरवाण्या घरात 
  • अग्नी शिखा 
  • साथी रे 
  • कस्तूरी 

Tuesday, 31 March 2015

''कॉफी आणि बरेच काही''च्या निमित्ताने

सध्या मराठी युवक मोठ्या प्रमाणावर मराठी चित्रपटांकडे वळत आहेत, त्यामुळे युवकांच्या आवड व निवड लक्षात घेऊन चित्रपट बनवले जात आहेत. मराठी चित्रपटांमध्ये युवकांशी संबधित विषयांना प्राधान्य देण्यात येत आहे. असाच एक चित्रपट ''कॉफी आणि बरेच काही'' या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. रवी जाधव प्रस्तुत ''कॉफी आणि बरेच काही'' आजच्या युवकांची, त्यांच्या प्रेम व लग्नविषयक संकल्पनाची गोष्ट आहे. करियरमुळे लग्नाचे वय वाढत आहे, त्याचबरोबर युवकांमध्ये लग्नविषयक अनेक प्रश्न व दुविधा असतात. नेमक्या ह्याच प्रश्नांना घेऊन अलिकडल्या काळात अनेक मराठी चित्रपटांची निर्मिति झाली आहे. हा प्रश्न मराठी चित्रपट वेगवेगळ्या प्रकारे मांडताना दिसून येत अाहे. 

अलीकडच्या काळात ''मिस मैच'', ''तप्तपदी'', ''मंगलाष्टक वन्स मोर'', ''लग्न पहाव करून'', ''टाईम प्लीज'', ''असा मी तशी ती'', ''काकस्पर्श'', ''मुंबई पुणे मुंबई'', ''सनई चौघडे'', ''फॉरेनची पाटलीण'', ''मणि मंगलसूत्र'', ''यंदा कर्त्तव्य आहे'', ''दोघी'' हे चित्रपट लग्न संस्थेविषयी चर्चा करतांना दिसून येतात. ''सनई चौघडे''मध्ये कुमारी मातेचा प्रश्न तर ''काकस्पर्श''मध्ये बाल विधवेचा प्रश्न अतिशय संवदेनशीलपणे हाताळण्यात आला होता. लग्नावरच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''मुंबई पुणे मुंबई २'' या चित्रपटाची टैग लाईन ''लग्नाला यायच'' अशी आहे.   

काही चित्रपट लग्नानंतरच्या विविध भावनिक समस्या मांडतांना दिसून येतात त्यामध्ये ''अ रेनी डे'', ''पुणे ५२'', ''प्रेम न्हणजे प्रेम असत'', ''प्रेमाची गोष्ट'', ''गुलमोहर'' व ''शेवरी'' अशा चित्रपटाचा समावेश आहे. अशा विषयावरचा सतीश राजवाडे यांचा ''प्रेमाची गोष्ट'' हा अतिशय सुन्दर चित्रपट आहे.

Monday, 16 March 2015

मराठी सिनेमा बोल्ड होतोय

द्वीअर्थी संवाद व गाणी मराठी चित्रपटाला काही नवी नाहीत पण सध्या मराठी चित्रपट दिवसेंदिवस अधिकाधिक बोल्ड होताना दिसून येत आहे. मागील महिन्यात प्रदर्शित झालेला ''चित्रफित'' असो वा मराठी चित्रपटांमधील वाढत असलेले किसिंग सीन्स व बिकनी सीन्स याच गोष्टींकडे लक्ष्य वेधतात.

गजेन्द्र अहिरे यांनी ''नॉट ओनली मिसेस राउत '', ''त्या रात्रि पाऊस होता'', ''सुम्भरान'' व ''पारध'' सारख्या चित्रपटांमधून बोल्ड विषय अतिशय संवदेनशीलपणे हाताळले आहे. मागील काही वर्षात ''नटरंग'', ''लालबाग परळ'', ''काकस्पर्श'', ''रेला रे'', ''पुणे ५२'', ''बालक पालक'' व ''तप्तपदी'' असे अनेक बोल्ड विषय व बोल्ड सीन्स असलेले मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. गिरीश कुलकर्णी व सई ताम्हणकर यांच्या मधील बोल्ड सीन्स मुळे ''पुणे ५२''ची बरीच चर्चा झाली. ''नो एंट्री पुढे धोका आहे'' व ''अशाच एका बेटावर'' मधील सई ताम्हणकर यांच्या बिकनी सीन्सची ही बरीच चर्चा झाली. 

अलीकडच्या काळात मराठी मध्ये बरेच किसिंग सीन्स बघायला मिळाले आहे. त्यामध्ये उपेन्द्र लिमये व मुक्ता बर्वे यांचा ''जोगवा'', पुष्कर जोग व मानसी नाइक ''जबरदस्त'', आदिनाथ कोठारे व उर्मिला कानेटकर यांचा ''अनवट'' व ''दुभंग'', उमेश कामत व प्रिया बापट यांच्या ''टाइम प्लीज'', अमृता सुभाष यांच्या ''सैटरडे संडे'', स्वप्निल जोशी व सोनाली कुलकर्णी यांच्या ''मितवा'' मधील किसिंग सीनचा उल्लेख करता येईल.

किरण नाटकी