Showing posts with label jogwa. Show all posts
Showing posts with label jogwa. Show all posts

Sunday, 8 November 2015

उपेन्द्र लिमये

आज (८ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उपेन्द्र लिमये यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

त्यांनी "मुक्ता" या मराठी चित्रपटातून आपली चित्रपट सृष्टितील कारकीर्द सुरु केली. त्यानंतर त्यांनी "बांगरवाडी", "कथा दोन गणपतरावांची", "सरकारनामा", "कैरी", "ध्यासपर्व", "चांदनी बार", "सावरखेडएक गाव", "पेज थ्री", "जत्राह्यालागाड रे त्यालागाड", "ब्लाइंड गेम", "शिवा", "शिवपतीकरम", "डार्लिंग", "ट्राफिक सिग्नल", "प्रणाली", "उरुस", "सरकार राज", "काँट्रॅक्ट", "मेड इन चायना", "जोगवा", "मी सिंधुताई सपकाळ", "धूसर", "महागुरू", "माय नेम इज ३४०", "धग", "येलो", "गुरु पोर्णिमा" आणि "प्यार वाली लव स्टोरी" या हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटात विविध भूमिका साकारल्या. त्यांच्या या अभिनय प्रवासात त्यांनी मधुर भंडारकर, रामगोपाल वर्मा, अमोल पालेकर, स्व. राजीव पाटिल, जब्बार पटेल, सतीश आळेकर, विनय आपटे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, अनंत महादेवन या प्रथितयश दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. त्यांना स्व. राजीव पाटिल दिग्दर्शित २००९ साली प्रदर्शित झालेल्या "जोगवा" मधील "तायप्पा"च्या भूमिकेसाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या सोबतच त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.upendralimaye.com या त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

Saturday, 12 September 2015

स्मिता ताम्बे

आज (१२ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री स्मिता ताम्बे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मोजके पण चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीमध्ये स्मिता ताम्बे यांचे नाव घेतल्या जाते. अभिनयासोबतच त्या नुत्यामध्ये निपुण आहेत. ''मराठी तारका'' या नुत्याच्या कार्यक्रमाच्या त्या भाग आहेत. त्यांनी ''नाती गोती '', ''तुकाराम'', ''जोगवा '' आणि ''७२ मैल एक प्रवास'' या चित्रपटात अभिनय केला आहे. ''देऊळ'' या मराठी चित्रपटात एक विशेष नुत्य त्यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

Friday, 11 September 2015

अतुल गोगावले

आज (११ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक अतुल गोगावले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!  हिंदी आणि मराठीमधील आघाडीचे संगीत दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जातात. ''अजय अतुल'' या संगीतकार जोडीतील अतुल गोगावले हे थोरले  बंधू. २००९ साली आलेल्या ''जोगवा'' चित्रपटासाठी सर्वोकृष्ट संगीत दिग्दर्शकांचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर २०१० आलेल्या ''नटरंग'' या चित्रपटाने त्यांची गाणी अवघ्या मराठी जनाच्या ओठावर रुळली. रवी जाधव दिग्दर्शित ''नटरंग'' चित्रपटाच्या यशामागे ''अजय-अतुल'' या जोडीच्या संगीताचा महत्वाचा वाटा होता. या चित्रपटातील सर्वच गाणी खुप गाजली. मागील वर्षी आलेल्या ''लय भारी'' या चित्रपटातील ''माऊली माऊली'' या गाण्याने लोकप्रियतेचा नवीन विक्रम निर्माण केला. 

“अगं बाई अरेच्च्या!”, “गोड गुपित”, “जत्रा”, “सावरखेड एक गाव”, “जबरदस्त”, “बंध प्रेमाचे”, “साडे माडे तीन”, “चेकमेट”, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं”, “मुंबई आमचीच”, “उलाढाल”, “एक डाव धोबीपछाड”, “बेधुंद”, “ऑक्सिजन”, “रिंगा रिंगा”, “भारतीय” आणि “टपाल” या मराठी चित्रपटांना ही त्यांनी संगीत दिले आहे. हरिहरन, कृणाल गांजावाला, सोनू निगम आणि श्रेया घोषाल अशा हिंदीतील दिग्गजांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली आहे. ''सिंघम'' आणि ''अग्निपथ'' या त्यांच्या हिंदी चित्रपटातील गाणी हि खुप लोकप्रिय झाली. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.ajayatul.com या त्यांच्या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटचे अनावरण माननीय अभिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले होते.

Monday, 16 March 2015

मराठी सिनेमा बोल्ड होतोय

द्वीअर्थी संवाद व गाणी मराठी चित्रपटाला काही नवी नाहीत पण सध्या मराठी चित्रपट दिवसेंदिवस अधिकाधिक बोल्ड होताना दिसून येत आहे. मागील महिन्यात प्रदर्शित झालेला ''चित्रफित'' असो वा मराठी चित्रपटांमधील वाढत असलेले किसिंग सीन्स व बिकनी सीन्स याच गोष्टींकडे लक्ष्य वेधतात.

गजेन्द्र अहिरे यांनी ''नॉट ओनली मिसेस राउत '', ''त्या रात्रि पाऊस होता'', ''सुम्भरान'' व ''पारध'' सारख्या चित्रपटांमधून बोल्ड विषय अतिशय संवदेनशीलपणे हाताळले आहे. मागील काही वर्षात ''नटरंग'', ''लालबाग परळ'', ''काकस्पर्श'', ''रेला रे'', ''पुणे ५२'', ''बालक पालक'' व ''तप्तपदी'' असे अनेक बोल्ड विषय व बोल्ड सीन्स असलेले मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. गिरीश कुलकर्णी व सई ताम्हणकर यांच्या मधील बोल्ड सीन्स मुळे ''पुणे ५२''ची बरीच चर्चा झाली. ''नो एंट्री पुढे धोका आहे'' व ''अशाच एका बेटावर'' मधील सई ताम्हणकर यांच्या बिकनी सीन्सची ही बरीच चर्चा झाली. 

अलीकडच्या काळात मराठी मध्ये बरेच किसिंग सीन्स बघायला मिळाले आहे. त्यामध्ये उपेन्द्र लिमये व मुक्ता बर्वे यांचा ''जोगवा'', पुष्कर जोग व मानसी नाइक ''जबरदस्त'', आदिनाथ कोठारे व उर्मिला कानेटकर यांचा ''अनवट'' व ''दुभंग'', उमेश कामत व प्रिया बापट यांच्या ''टाइम प्लीज'', अमृता सुभाष यांच्या ''सैटरडे संडे'', स्वप्निल जोशी व सोनाली कुलकर्णी यांच्या ''मितवा'' मधील किसिंग सीनचा उल्लेख करता येईल.

किरण नाटकी