Showing posts with label national award. Show all posts
Showing posts with label national award. Show all posts

Tuesday, 16 February 2016

गजेन्द्र अहिरे

आज (१६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गजेन्द्र अहिरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गजेन्द्र अहिरे मागील तीन दशकांपासून नाटक, टीवी व चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी ''विठ्ठल विठ्ठल'', ''नॉट ओनली मिसेस राउत'', ''सरीवर सरी'', ''सैल'', ''सावर रे'', ''त्या रात्री पाऊस होता'',''नातिगोती'', ''दिवसानं दिवस'', ''बयो'', ''शेवरी'', ''एक क्रांतिवीर - वासुदेव बलवंत फड़के'', ''गुलमोहर'', सुम्भराण'', ''पारध'', ''समुद्र'', ''एका शब्दात सांगतो'',  ''हैल्लो जयहिन्द'', ''पिपानी'', ''टूरिंग टॉकीज'', ''अनुमति'', ''पोस्टकार्ड'', ''अनवट'', ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' सारखे वेगवेगळ्या सामाजिक विषयावर आशयपूर्ण व सुन्दर चित्रपट बनवले आहे. अतिशय कमी वेळात चित्रपट बनवण्यासाठी ते प्रसिद्ध असेल तरी त्यांचा प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव असतो. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''नीलकंठ मास्टर'' व ''टाच'' या चित्रपटाचा समावेश आहे.     

Monday, 16 November 2015

संदीप कुलकर्णी

आज (१६ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. मराठी चित्रपट सुष्टिला वेगळे वळण देणाऱ्या "श्वास" आणि "डोम्बिवली फास्ट" या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठी चित्रपटाला अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ते उत्तम चित्रकार ही आहेत. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "डोम्बिवली रिटर्न" या चित्रपटाचा समावेश आहे. 

संदीप कुलकर्णी यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • मामू (१९९४)
  • हजार चौरसी की माँ (१९९८)
  • शूल (१९९९)
  • श्वास (२००४)
  • डोंबिवली फास्ट (२००५)
  • अधांतरी (२००५)
  • माय बाप (२००६)
  • राजकारण (२००७)
  • एक डाव संसाराचा (२००८)
  • बेधुंद (२००८)
  • गैर (२००९)
  • मेड इन चायना (२००९)
  • वेटिंग रूम (२००९)
  • प्रतिसाद (२०१०)
  • आनंदाचे अंकगणित (२०१०)
  • निर्वाना १३ (२०११)
  • डी डे (२०१३) 
  • प्रेमसूत्र (२०१३)
  • अजिंक्य (२०१३)

Friday, 30 October 2015

विक्रम गोखले

आज (३० ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! विक्रम गोखले त्यांच्या कुटुंबात असलेला अभिनयाचा वारसा घेऊनच अभिनयाच्या क्षेत्रात दाखल झाले. आपल्या समर्थ अभिनयाने विक्रमजी त्यांची प्रत्येक भूमिका लक्ष्यवेधी करतात. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ५८ वर्षे पूर्ण झाले आहेत. दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्रीच्या कितीतरी पिढ्यांसोबत त्यांनी काम केले आहे. २०१२ साली त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील भष्टाचारावर भाष्य करणारा "आघात" हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. "अनुमति" या चित्रपटसाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनयाचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभिनयासोबतच समाजकार्याची आवड सुद्धा त्यांनी जोपासली आहे. त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरीता आपण www.vikramgokhle.com या त्यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊ शकता. 

Tuesday, 27 October 2015

ख्वाडा

या शुक्रवारी "ख्वाडा" हा बहु-प्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार मिळाल्यानंतर या चित्रपटाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले होते.

बाबुराव कऱ्हाडे दिग्दर्शित "ख्वाडा"मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एका कुटुंबाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती बाबुराव कऱ्हाडे यांनी खुप संघर्षातून केली आहे. या चित्रपटामध्ये शशांक शेंडे, अनिल नगरकर, भाऊ शिंदे, सुरेखा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अस्सल ग्रामीण बाज असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडून पसंतीची पावती मिळाली आहे.  

Friday, 11 September 2015

अतुल गोगावले

आज (११ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक अतुल गोगावले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!  हिंदी आणि मराठीमधील आघाडीचे संगीत दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जातात. ''अजय अतुल'' या संगीतकार जोडीतील अतुल गोगावले हे थोरले  बंधू. २००९ साली आलेल्या ''जोगवा'' चित्रपटासाठी सर्वोकृष्ट संगीत दिग्दर्शकांचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर २०१० आलेल्या ''नटरंग'' या चित्रपटाने त्यांची गाणी अवघ्या मराठी जनाच्या ओठावर रुळली. रवी जाधव दिग्दर्शित ''नटरंग'' चित्रपटाच्या यशामागे ''अजय-अतुल'' या जोडीच्या संगीताचा महत्वाचा वाटा होता. या चित्रपटातील सर्वच गाणी खुप गाजली. मागील वर्षी आलेल्या ''लय भारी'' या चित्रपटातील ''माऊली माऊली'' या गाण्याने लोकप्रियतेचा नवीन विक्रम निर्माण केला. 

“अगं बाई अरेच्च्या!”, “गोड गुपित”, “जत्रा”, “सावरखेड एक गाव”, “जबरदस्त”, “बंध प्रेमाचे”, “साडे माडे तीन”, “चेकमेट”, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं”, “मुंबई आमचीच”, “उलाढाल”, “एक डाव धोबीपछाड”, “बेधुंद”, “ऑक्सिजन”, “रिंगा रिंगा”, “भारतीय” आणि “टपाल” या मराठी चित्रपटांना ही त्यांनी संगीत दिले आहे. हरिहरन, कृणाल गांजावाला, सोनू निगम आणि श्रेया घोषाल अशा हिंदीतील दिग्गजांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली आहे. ''सिंघम'' आणि ''अग्निपथ'' या त्यांच्या हिंदी चित्रपटातील गाणी हि खुप लोकप्रिय झाली. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.ajayatul.com या त्यांच्या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटचे अनावरण माननीय अभिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले होते.

किरण नाटकी