Showing posts with label social. Show all posts
Showing posts with label social. Show all posts

Tuesday, 16 February 2016

गजेन्द्र अहिरे

आज (१६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गजेन्द्र अहिरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गजेन्द्र अहिरे मागील तीन दशकांपासून नाटक, टीवी व चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी ''विठ्ठल विठ्ठल'', ''नॉट ओनली मिसेस राउत'', ''सरीवर सरी'', ''सैल'', ''सावर रे'', ''त्या रात्री पाऊस होता'',''नातिगोती'', ''दिवसानं दिवस'', ''बयो'', ''शेवरी'', ''एक क्रांतिवीर - वासुदेव बलवंत फड़के'', ''गुलमोहर'', सुम्भराण'', ''पारध'', ''समुद्र'', ''एका शब्दात सांगतो'',  ''हैल्लो जयहिन्द'', ''पिपानी'', ''टूरिंग टॉकीज'', ''अनुमति'', ''पोस्टकार्ड'', ''अनवट'', ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' सारखे वेगवेगळ्या सामाजिक विषयावर आशयपूर्ण व सुन्दर चित्रपट बनवले आहे. अतिशय कमी वेळात चित्रपट बनवण्यासाठी ते प्रसिद्ध असेल तरी त्यांचा प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव असतो. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''नीलकंठ मास्टर'' व ''टाच'' या चित्रपटाचा समावेश आहे.     

Monday, 9 November 2015

किशोर कदम

आज (९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार, अभिनेते व कवी किशोर कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

ते सौमित्र या टोपण नावाने कविता लिहितात. त्यांचे "जावे कवितांच्या गावा" आणि "... आणि तरीही मी!" हे कवितासंग्रह प्रसिद्द झाले आहेत. त्यांना लिहिलेल्या गीतांचा अल्बम "गारवा" हा खुप गाजला. त्यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित "समर" या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. "नटरंग" या मराठी रवी जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपटातल्या पाण्डोबाच्या भूमिकेने त्यांना नविन ओळख मिळवून दिली. "मम्मो", "लिमिटेड माणुसकी", "संशोधन", "दिल पे मत ले यार", "ध्यासपर्व", "ब्लैक फ्राइडे", "शोभायात्रा", "कॉन्ट्रैक्ट", "फूँक", "एक कप च्या", "जोगवा", "मरेपर्यंत फाशी", "समान्तर", "प्रतिसाद", "बालगंधर्व", "तार्यांचे बेट", "बालक पालक", "हा भारत माझा", "अनुमती", "फँड्री", "रज्जो", "रेला रे", "स्पेशल २६", टूरिंग टॉकीज", "तुह्या धर्म कोणचा?", "अनवट", "मंजुनाथ", "पोस्टकार्ड", "सिद्धांत", "जाणिवा" आणि "हाईवे" या हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "चौर्य", "चिरंजीव", "दमलेल्या बाबाची कहानी", "घंटा", "गणवेश", "इश्क प्रेम लव" आणि  "परतु" या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या प्रत्येक चित्रपटात ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहेत.

Sunday, 11 October 2015

निशिगंधा वाड

आज प्रसिद्द अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!! 

निशिगंधा वाड यांनी या मराठी कौटुम्बिक चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्द आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून काम केले आहे. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये "वाजवा रे वाजवा", "शेजारी शेजारी", "एकापेक्षा एक", "प्रतिकार", "बंधन", "कर्मयोद्धा", "बाळा जो जो रे", "जन्मदाता", "सलीम लंगडे पे मत रो", "सासर माहेर", "दादागिरी", "अशी ही ज्ञानेश्वरी", "आप मुझे अच्छे लगने लगे", "तुमको ना भूल पायेंगे", "दिवानगी", "शापित", "रोक", "लाइफ में कभी कभी" आणि "अलीबाबा और चालीस चोर" प्रमुख आहेत. अभिनया सोबतच त्यांना संशोधनाचीही आवड आहे. त्यांच्या प्रबंधासाठी त्यांना मुंबई विद्यापीठातून पीएचडी प्राप्त झाली आहे. त्या "चार चौघी" या मराठी मासिकाशी जुळल्या होत्या.  

Thursday, 1 October 2015

"दगडी चाळ" आणि "मूंगळा"

उद्या "दगडी चाळ" आणि "मूंगळा" हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

चंद्रकांत कणसे दिग्दर्शित "दगडी चाळ" मध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, पूजा सावंत आणि संजय खापरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची जोडी पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.

विजय देवकर दिग्दर्शित "मूंगळा" हा चित्रपट सामाजिक प्रश्नांवर आधारीत आहे. 

Thursday, 10 September 2015

अतुल कुलकर्णी

आज (१० सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नेशनल स्कूल ऑफ़ ड्रामा मधून त्यांनी आपले शिक्षण केले आहे. त्यांनी "कैरी", "ध्यासपर्व", "१०वी फ", "वास्तुपुरुष", "देवराई", "चकवा", "मातीमाय", "वळू", "नटरंग", "प्रेमाची गोष्ट" आणि "हॅपी जर्नी" अशा चित्रपटात अभिनय करून आपली संवेदनशील अभिनेता अशी ओळख पक्की केली आहे. त्यांनी हिंदीमध्ये "हे राम", "चांदनी बार", "दम", "सत्ता", "खाकी", "पेज ३", "रंग दे बसंती" अश्या मोजक्या पण आशयघन चित्रपटात काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी "हे राम" आणि "चांदनी बार" चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

संवेदनशील अभिनयासोबतच संवेदनशील माणूस म्हणून ही त्यांनी आपली ओळख बनवली आहे. वेळोवेळी ते वर्तमानपत्रात अभ्यासपूर्ण लेख लिहून सामाजिक व राजकीय विषयावर आपली मते मांडत असतात. ''क्वेस्ट'' नावाच्या सामाजिक संस्थेद्वारे ते शिक्षणाच्या क्षेत्रात काम करीत आहेत. या संस्थेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही www.quest.org.in वेबसाईटला भेट देऊ शकता. अतुल कुलकर्णी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.atulkulkarni.com ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता.

Sunday, 23 August 2015

नागराज मंजुळे

मराठी चित्रपट सृष्टितील संवेदनशील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आज (२४ ऑगस्ट) वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!! ''फँड्री'' या पहिल्याच चित्रपटातून संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण केली आहे. ''फँड्री''ने अनेक राष्ट्रिय व अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजविले सोबतच अनेक पुरस्कारावर आपले नाव कोरले. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या दिग्दर्शनाबरोबर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ''फँड्री'' या चित्रपटात त्यांनी दिग्दर्शन व अभिनय या दोन्ही बाजू समर्थपणे पेलल्या होत्या. त्यानंतर त्यांनी निखिल महाजन दिग्दर्शित ''बाजी'' मध्ये इंस्पेक्टरची भूमिका साकारली होती. आता ते पुन्हा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ''हायवे'' या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचा ''सैराट'' हा आगामी चित्रपट पुढील वर्षी जनवरी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

किरण नाटकी