आज (३१ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अंकुश चौधरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंकुश चौधरी यांना मराठी चित्रपट सृष्टीतील हिट मशीन म्हटल्यास वावग ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून असो किवा अभिनेता म्हणून असो अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. "झकास" आणि "नो एंट्री पुढे धोका आहे" या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. "दुनियादारी", "क्लासमेट्स", "डबल सीट", "दगडी चाळ", "गुरु" असे लागोपाठ यशस्वी चित्रपट त्यांनी अभिनेता म्हणून दिले आहेत. दिपा परब यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव "ऑटोग्राफ" आहे.
Showing posts with label duniyadari. Show all posts
Showing posts with label duniyadari. Show all posts
Sunday, 31 January 2016
अंकुश चौधरी
आज (३१ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अंकुश चौधरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंकुश चौधरी यांना मराठी चित्रपट सृष्टीतील हिट मशीन म्हटल्यास वावग ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून असो किवा अभिनेता म्हणून असो अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. "झकास" आणि "नो एंट्री पुढे धोका आहे" या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. "दुनियादारी", "क्लासमेट्स", "डबल सीट", "दगडी चाळ", "गुरु" असे लागोपाठ यशस्वी चित्रपट त्यांनी अभिनेता म्हणून दिले आहेत. दिपा परब यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव "ऑटोग्राफ" आहे.Tuesday, 17 November 2015
सुशांत शेलार
आज (१७ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुशांत शेलार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपट सृष्टीतील एक तडफदार आणि देखणा नायक म्हणजे सुशांत शेलार. सुशांत शेलार यांची दुनियादारी चित्रपटातील भूमिका आणि त्यांचा डायलॉग "हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते!!!" बराच गाजला. सोबतच त्यांनी "वंशवेल", "धूम २ धमाल", "क्लासमेट्स'', "मैटर", "तू ही रे", "ब्लाइंड गेम", "प्रतिबिम्ब" आणि "संघर्ष" या चित्रपटात ही भूमिका केल्या आहेत.Sunday, 18 October 2015
स्वप्निल जोशी
आज (१८ ऑक्टोम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते स्वप्निल जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

मराठी चित्रपट सृष्टीतील आजचे सुपरस्टार ''स्वप्निल जोशी" यांचे नाव घेतले की आपल्याला त्यांचा रामानंद सागर निर्देशित ''कृष्णा" या मालिकेतील त्यांची केंद्रीय भूमिका आठवते. त्यांची ''कृष्णा" ची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक टीवी हिंदी व मराठी टीवी मालिकेमधून भूमिका केल्या किंबहुना ते छोट्या पद्यावरच जास्त रमले असे म्हटल्यास वावग ठरणार नाही. ''गुलाम ए मुस्तफा" आणि "दिल विल प्यार व्यार" या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. २०१० साली प्रदर्शित झालेल्या कांचन अधिकारी दिग्दर्शित "मानिनी" या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आगमन केले. हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला व स्वप्निल जोशी यांचा अभिनय पण. मध्यंतरी त्यांनी "चेकमेट", "टारगेट" आणि "आम्ही सातपुते" असे चित्रपट केले. सतीश राजवाडे यांच्या "मुंबई पुणे मुंबई" या चित्रपटात त्यांची मुक्ता बर्वेसोबत केमिस्ट्री खुप गाजली आणि हा चित्रपट सुद्धा खुप चालला. या चित्रपटाचा पुढचा भाग "मुंबई पुणे मुंबई २" येत्या काही दिवसात प्रदर्शित होत आहे.
संजय जाधव दिग्दर्शित ''दुनियादारी" हा चित्रपट त्यांच्या करियरला वेगळे वळण देणारा ठरला. संजय जाधवचे दिग्दर्शन व स्वप्निल जाधव - सई ताम्हणकर यांची जोडी हा मराठी चित्रपटाच्या यशाचा नविन फार्मूला चित्रपटातून गवसला. "प्यारवाली लवस्टोरी" आणि "तू ही रे" चित्रपटात हेच सिद्ध झाले आहे. सोबतच त्यांनी ''मंगलाष्टक वन्स मोर", "पोर बाजार" आणि "वेलकम ज़िंदगी" हे चित्रपट पण केले. याच वर्षी प्रदर्शित झालेला ''मितवा" या चित्रपटात त्यांची प्रार्थना बेहरे व सोनाली कुलकर्णी यांची जोडी ही पसंत केल्या गेली.
Saturday, 5 September 2015
''तू हि रे'' आणि ''द शैडो''
या आठवड्यात दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत ''तू हि रे'' आणि ''द शैडो''.
''दुनियादारी'' व ''प्यारवाली लव स्टोरी'' नंतर दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते स्वप्निल जोशी व अभिनेत्री सई ताम्हणकर या जोडीचा तीसरा चित्रपट ''तू हि रे'' या शुक्रवारी प्रदर्शित झाला. ''तू हि रे'' मध्ये स्वप्निल जोशी, सईं ताम्हणकर व तेजस्विनी पंडित यांनी प्रेम कहानी रंगवली आहे. या चित्रपटाचे मार्केटिंग अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे, चित्रपटाची स्टार वैल्यू खुप जास्त आहे, स्वप्निल जोशी आणि सईं ताम्हणकर यांच्या जोडीने मराठी प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे, संजय जाधव यांचे दिग्दर्शन या सर्व बाबींमुळे हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.
या आठवड्यात प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''द शैडो'' हा भयपट असून रोहन सातघरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मानसी नाईक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
मागील आठवड्यात ''ढोलकी'', ''हायवे'' आणि ''शेगावीचा योगी गजानन'' हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते.
''दुनियादारी'' व ''प्यारवाली लव स्टोरी'' नंतर दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते स्वप्निल जोशी व अभिनेत्री सई ताम्हणकर या जोडीचा तीसरा चित्रपट ''तू हि रे'' या शुक्रवारी प्रदर्शित झाला. ''तू हि रे'' मध्ये स्वप्निल जोशी, सईं ताम्हणकर व तेजस्विनी पंडित यांनी प्रेम कहानी रंगवली आहे. या चित्रपटाचे मार्केटिंग अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे, चित्रपटाची स्टार वैल्यू खुप जास्त आहे, स्वप्निल जोशी आणि सईं ताम्हणकर यांच्या जोडीने मराठी प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे, संजय जाधव यांचे दिग्दर्शन या सर्व बाबींमुळे हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.
या आठवड्यात प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''द शैडो'' हा भयपट असून रोहन सातघरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मानसी नाईक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
मागील आठवड्यात ''ढोलकी'', ''हायवे'' आणि ''शेगावीचा योगी गजानन'' हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते.
Thursday, 25 June 2015
सई ताम्हणकर
मराठी चित्रपट सृष्टितील बोल्ड एंड ब्यूटिफुल अभिनेत्री न्हणजे सई ताम्हणकर, अतिशय कमी वेळात अभिनयाच्या बळावर त्यांनी मराठी चित्रपट सृष्टित आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपट सृष्टि सोबतच या वर्षी त्यांनी ''हंटर'' या हिंदी चित्रपटांमधून महत्त्वाची भूमिका साकारून हिंदी चित्रपट सृष्टित ही यशस्वी पदार्पण केले आहे, या आधी अगदी कारीयरच्या सुरवातीला त्यांनी ''ब्लैक एंड व्हाइट'' आणि ''गजनी'' या दोन मोठ्या हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. स्वप्निल जोशी यांच्याबरोबर सईची जोडी विशेष गाजली, ''दुनियादारी'', ''मंगलाष्टक वन्स मोर'', ''प्यार वाली लव स्टोरी'' या चित्रपटांमधून हि जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे. ''तू हि रे'' हा या जोडीचा आगामी चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होतोय. संजय जाधव, स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर हे त्रिकुट आज मराठी चित्रपट सृष्टित यशाचे सूत्र मानले जाते. आज सई ताम्हणकर यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा. सई ताम्हणकर यांनी अभिनय केलेले चित्रपट
- ब्लैक एण्ड व्हाइट (२००८)
- सनई चौघडे (२००८)
- पिकनिक (२००८)
- गजनी (२००८)
- हाय काय .... नाय काय …. (२००९)
- बे दुने साढे चार (२००९)
- सुम्भरान (२००९)
- अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
- मिशन पॉसिबल (२०१०)
- रीटा (२०१०)
- लालबाग परळ (२०१०)
- झकास (२०११)
- राडा रॉक्स (२०११)
- दोन घडीचा डाव (२०११)
- पुणे ५२ (२०१२)
- अशाच एका बेटावर (२०१२)
- गाजराची पुंगी (२०१२)
- विला (२०१२)
- नो एन्ट्री पुढे धोका आहे (२०१२)
- अघोर (२०१२)
- बाबुरावला पकडा (२०१२)
- धागेदोरे (२०१२)
- बालक पालक (२०१३)
- झपाटलेला २ (२०१३)
- दुनियादारी (२०१३)
- टाइम प्लीज (२०१३)
- अनुमति (२०१३)
- मंगलाष्टक वन्स मोर (२०१३)
- तेंदुलकर आउट (२०१३)
- गुरु पौर्णिमा (२०१४)
- पोर बाजार (२०१४)
- प्यार वाली लव स्टोरी (२०१४)
- पोस्ट कार्ड (२०१४)
- सौ शशि देवधर (२०१४)
- क्लासमेट्स (२०१५)
- हंटर (२०१५)
- तू हि रे (२०१५)
- फु बाई फु
- या गोजिरवाण्या घरात
- अग्नी शिखा
- साथी रे
- कस्तूरी
Monday, 22 December 2014
''पीके''
आमिर खान बहु-प्रतीक्षित ''पीके'' हा चित्रपट ह्या शुक्रवारी प्रदर्शित झाल्यामुळे एकहि मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नाही, मागच्या शुक्रवारी ४ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते.
चेन्नई एक्सप्रेस आणि दुनियादारीसाठी झालेला संघर्ष वगळता हिंदी व मराठी चित्रपटातील चुरस टिकिट खिडकीवर फारशी पाहायला मिळत नाही.
Wednesday, 15 October 2014
प्यारवाली लवस्टोरी की दुनियादारी २ ?
संजय जाधव यांचा ''प्यारवाली लवस्टोरी'' येत्या २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. ''दुनियादारी''च्या हाऊसफूल यशानंतर त्यांचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे ''प्यारवाली लवस्टोरी'' बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ''प्यारवाली लवस्टोरी'' चे प्रमोशन सुद्धा खुप धडाक्यात सुरु आहे.
''दुनियादारी'' आणि ''प्यारवाली लवस्टोरी''च्या कलाकारांमध्ये बरेच कलाकार तेच असल्यामुळे ''प्यारवाली लवस्टोरी'' की ''दुनियादारी २'' हा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडतोय. आता तोच प्रश्न माझ्या मित्राने मला विचारल्यामुळे हा लेख. या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यानंतर मलाही हाच प्रश्न पडला होता कारण ट्रेलर मधून ''प्यारवाली लवस्टोरी'' ही एक प्रेमत्रिकोण असलेली प्रेमकथा आहे असे लक्षात येते आणि कथेतील मुख्य पात्र तीच आहेत स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर आणि उर्मिला कानेटकर. ''प्यारवाली लवस्टोरी''च्या प्रमोशन मध्येपण दुनियादारीचीच थीम वापरण्यात आलीय.
खर तर प्रेक्षकांना मनोरंजन हवय, शेक्सपीरने न्हटले आहेच नावात काय ठेवलय !!!!
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
