Showing posts with label Ashach Eka Betavar. Show all posts
Showing posts with label Ashach Eka Betavar. Show all posts

Tuesday, 28 June 2016

मंगेश देसाई

आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्षी त्यांचा भगवान दादा च्या जीवनावर आधारीत "एक अलबेला" हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांचे या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्व स्तरातून कौतुक झाले. या चित्रपटात विद्या बालन यांची भूमिका होती. त्यांना "खेळ मांडला" या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा स्क्रीन अवार्ड प्राप्त झाला आहे. त्यांची विजू माने दिग्दर्शित "स्ट्रगलर साला" या वेब सीरीज मध्ये पण एका भागात अभिनयाने सर्वांना मोहित केले.

Sunday, 31 January 2016

अंकुश चौधरी

आज (३१ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अंकुश चौधरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंकुश चौधरी यांना मराठी चित्रपट सृष्टीतील हिट मशीन म्हटल्यास वावग ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून असो किवा अभिनेता म्हणून असो अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. "झकास" आणि "नो एंट्री पुढे धोका आहे" या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. "दुनियादारी", "क्लासमेट्स", "डबल सीट", "दगडी चाळ", "गुरु" असे लागोपाठ यशस्वी चित्रपट त्यांनी अभिनेता म्हणून दिले आहेत. दिपा परब यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव "ऑटोग्राफ" आहे.

किरण नाटकी