आज (३१ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अंकुश चौधरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंकुश चौधरी यांना मराठी चित्रपट सृष्टीतील हिट मशीन म्हटल्यास वावग ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून असो किवा अभिनेता म्हणून असो अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. "झकास" आणि "नो एंट्री पुढे धोका आहे" या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. "दुनियादारी", "क्लासमेट्स", "डबल सीट", "दगडी चाळ", "गुरु" असे लागोपाठ यशस्वी चित्रपट त्यांनी अभिनेता म्हणून दिले आहेत. दिपा परब यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव "ऑटोग्राफ" आहे.
Showing posts with label classmates. Show all posts
Showing posts with label classmates. Show all posts
Sunday, 31 January 2016
अंकुश चौधरी
आज (३१ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अंकुश चौधरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंकुश चौधरी यांना मराठी चित्रपट सृष्टीतील हिट मशीन म्हटल्यास वावग ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून असो किवा अभिनेता म्हणून असो अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. "झकास" आणि "नो एंट्री पुढे धोका आहे" या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. "दुनियादारी", "क्लासमेट्स", "डबल सीट", "दगडी चाळ", "गुरु" असे लागोपाठ यशस्वी चित्रपट त्यांनी अभिनेता म्हणून दिले आहेत. दिपा परब यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव "ऑटोग्राफ" आहे.Tuesday, 17 November 2015
सुशांत शेलार
आज (१७ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुशांत शेलार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपट सृष्टीतील एक तडफदार आणि देखणा नायक म्हणजे सुशांत शेलार. सुशांत शेलार यांची दुनियादारी चित्रपटातील भूमिका आणि त्यांचा डायलॉग "हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते!!!" बराच गाजला. सोबतच त्यांनी "वंशवेल", "धूम २ धमाल", "क्लासमेट्स'', "मैटर", "तू ही रे", "ब्लाइंड गेम", "प्रतिबिम्ब" आणि "संघर्ष" या चित्रपटात ही भूमिका केल्या आहेत.Friday, 16 January 2015
कलरफुल मराठी मूवी - क्लासमेट्स
उलाढाल, सतरंगी रे व नारबाची वाड़ी नंतर दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आता ''क्लासमेट्स'' हा दर्जेदार मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. निखळ मनोरंजन करणारा असा ''क्लासमेट्स'' आहे. सध्या युवक ही मराठी चित्रपटांकडे वळतोय व त्याच्या आवडी निवडी लक्षात घेऊन चित्रपट बनवले जातात, ''क्लासमेट्स'' हा असाच चित्रपट आहे.
''क्लासमेट्स''मध्ये दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी चित्रपटाची प्रत्येक फ्रेम कशी मनोरंजक होईल याकडे कटाक्षाने लक्ष्य दिले अाहे. चित्रपटाची गोष्ट ही महाविद्यालयातील विद्यार्थी राजकारणाविषयी आहे. या चित्रपटात रहस्य हे शेवटी उलगडण्यात आल्याने शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा ताणली जाते. चित्रपटाचे छायांकन या चित्रपटाची विशेषता आहे.
चित्रपटात काही गाणी जबरदस्ती टाकल्यासारखी वाटतात. चित्रपटाचे कलाकार व महाविद्यालयीन वातावरण बघता दुनियादारीची आठवण तुम्हाला येऊ शकते.
शेवटी हा चित्रपट तुम्हाला खुप मोठा सन्देश देणार नाही मात्र अडीच तास मनोरंजन नक्की करेल, तेव्हा आपल्या ''क्लासमेट्स'' सोबत चित्रपट बघायला विसरु नका.
Sunday, 7 December 2014
''रीमिक्स'' टाईटल्सचा जमाना
सध्या मराठी चित्रपटांच्या नावांमध्ये इंग्लिश आणि हिंदी वापरण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. ह्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला चित्रपट ''कैंडल मार्च'' असो किंवा मागील काही महिन्यात प्रदर्शित झालेले ''हैप्पी जर्नी'', ''पोस्टर बॉयज़'', ''येलो'', ''टाइम पास'' असो. इंग्लिश टाईटल्सची सध्या मराठी मध्ये चलती आहे, हेच न्हणावे लागेल. इंग्लिश टाईटल्सच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''मिस मैच'', ''लव फैक्टर'', ''आई पि एल'', ''क्लासमेट्स''चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
इंग्लिश आणि हिंदी सोबतच एक नवा प्रकार उदयास आला आहे, तो न्हणजे रीमिक्स टाईटल्सचा. मराठी, हिंदी आणि इंग्लिश पैकी कोणत्याही दोन भाषा वापरून तयार केलेल्या टाईटल्सला आपण रीमिक्स टाईटल न्हणु शकतो. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रीमिक्स टाईटल्स मराठी चित्रपटांमध्ये ''स्वामी पब्लिक लिमिटेड'', ''एलिज़ाबेथ एकादशी'', ''बोल बेबी बोल'', ''प्यारवाली लव स्टोरी'', ''इश्क़ वाला लव'', ''पुणे वाया बिहार'' नाव घेता येईल. अश्या रीमिक्स टाईटल्सच्या येणाऱ्या मराठी चित्रपटामध्ये ''प्रेमासाठी कमिंग सून'', ''७ रोशन विला'', ''बाइकर्स अड्डा''चे नाव प्रामुख्याने घेता येईल.
Thursday, 6 November 2014
क्लासमेट्स
उलाढाल, सतरंगी रे आणि नारबाची वाड़ी नंतर नव्या पिढीतील मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा ''क्लासमेट्स'' हा नवीन मराठी चित्रपट पुढील वर्षी १६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सचित पाटिल, सुशांत शेलार व सिद्धार्थ चांदेकर अशी तगड़ी स्टारकास्ट असणारा हा सिनेमा कॉलेज मधील विद्यार्थांची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे व त्याला विद्यार्थी संघटनांमधील राजकारणाची जोड आहे असे ट्रेलर मधून दिसते.
या चित्रपटाचा ट्रेलर सध्या यूटुबवर गाजतोय. विविध रंगाच्या अक्षरांच्या रुपात असलेल्या ''क्लासमेट्स''च्या टाइटल प्रमाणे त्यांच्या ट्रेलर मध्ये ही रंगाची उधळण केली आहे जी नक्कीच डोळ्यांना सुखावणारी आहे. ''क्लासमेट्स'' त्यांच्या ट्रेलर मधून चित्रपटाविषयी उत्सुकता जागवतो, सोबतच मराठी चित्रपटांमध्ये सध्या प्रमोशन व ट्रेलर बरेच काम केले जाते हे ही येथे अधोरेखित होते.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...

