आज (२५ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सन्देश कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सन्देश कुलकर्णी यांनी "मसाला" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी "कॉफी आणि बरच काही" या चित्रपटात अभिनय पण केला आहे. ते सोनाली कुलकर्णी यांचे बंधू आहेत. ते अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या सोबत विवाहबद्ध झाले आहेत.
Showing posts with label sonali kulkarni. Show all posts
Showing posts with label sonali kulkarni. Show all posts
Thursday, 25 August 2016
सन्देश कुलकर्णी
आज (२५ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सन्देश कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सन्देश कुलकर्णी यांनी "मसाला" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी "कॉफी आणि बरच काही" या चित्रपटात अभिनय पण केला आहे. ते सोनाली कुलकर्णी यांचे बंधू आहेत. ते अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या सोबत विवाहबद्ध झाले आहेत.Tuesday, 3 November 2015
सोनाली कुलकर्णी
आज (३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

सोनाली कुलकर्णी यांना आपण संवेदनशील अभिनेत्री सोबतच एक संवेदनशील लेखिका म्हणून ही ओळखतो. त्यांनी अनेक वर्षे लोकसत्ताच्या "विवा" या पुरवणीचे संपादन केले, त्यात त्यांनी लिहिलेल्या "सो कूल" या स्तंभावर आधारीत त्यांच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. व्यावसायिक आणि कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट करतांना त्यात योग्य संतुलन त्यांनी साधले आहे. त्यांनी चित्रपट सृष्टितील आपली कारकीर्द गिरीश कर्नाड दिग्दर्शित "चेलुवी" या चित्रपटातून सुरु केली. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. या चित्रपटांमध्ये "अग्निवर्षा", "कितने दूर कितने पास", "कैरी", "घराबाहेर", "जहा तुम ले चलो", "जुनून", "टॅक्सी नंबर ९२११", "डरना जरूरी है", "डॉ. प्रकाश बाबा आमटे", "डॉ. बाबासाहेब आंबेडकर", "दायरा", "दिल चाहता है", "दिल विल प्यार व्यार", "देवराई", "दोघी", "प्यार तूने क्या किया", "ब्राईड अँड प्रेज्युडिस", "मिशन कश्मिर", "मुक्ता", "सखी", "सिंघम" प्रमुख आहे. या वर्षी त्यांची प्रमुख भूमिका असणारा "अग बाई अरेच्या" हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांना "फूॅक सु डी मी" या इटालियन चित्रपटासाठी मिलान अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सावात सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी "खतरों के खिलाड़ी " व "झलक दिखला जा" या रियलिटी शो मध्ये भाग घेऊन आपल्या एक्शन आणि नृत्य कौशल्यासाठी कौतुक मिळवले. त्यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.sonalikulkarni.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Sunday, 1 November 2015
नवंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस
नवंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस
- २ नवंबर - अरुण कदम (अभिनेता)
- ३ नवंबर - सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री व लेखिका)
- ३ नवंबर - स्व लक्ष्मीकांत बर्डे (अभिनेता)
- ४ नवंबर - मिलिंद सोमण (अभिनेता)
- ७ नवंबर - जयेश चव्हाण (अभिनेता)
- ९ नवंबर - किशोर कदम (अभिनेता, कवी व गीतलेखक)
- ९ नवंबर - सुबोध भावे (अभिनेता)
- १३ नवंबर - अंशुमन विचारे (अभिनेता)
- १६ नवंबर - संदीप कुलकर्णी (अभिनेता)
- १६ नवंबर - श्रीराम लागू (अभिनेता)
- १७ नवंबर - रत्नाकर मतकरी (दिग्दर्शक)
- १७ नवंबर - सुशांत शेलार (अभिनेता)
- १८ नवंबर - अमित अभ्यंकर (दिग्दर्शक)
- १८ नवंबर - नितिनकुमार बोरा (दिग्दर्शक)
- १९ नवंबर - नितिन नायगावकर (लेखक)
- २० नवंबर - अविनाश अरुण(दिग्दर्शक)
- २३ नवंबर - अमृता खानविलकर (अभिनेत्री)
- २४ नवंबर - अमोल पालेकर (दिग्दर्शक व अभिनेता)
- २४ नवंबर - प्रणय तेलंग (दिग्दर्शक)
- २६ नवंबर - विजय शिंदे (दिग्दर्शक)
- २९ नवंबर - नेहा पेंडसे (अभिनेत्री)
Friday, 16 January 2015
कलरफुल मराठी मूवी - क्लासमेट्स
उलाढाल, सतरंगी रे व नारबाची वाड़ी नंतर दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आता ''क्लासमेट्स'' हा दर्जेदार मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. निखळ मनोरंजन करणारा असा ''क्लासमेट्स'' आहे. सध्या युवक ही मराठी चित्रपटांकडे वळतोय व त्याच्या आवडी निवडी लक्षात घेऊन चित्रपट बनवले जातात, ''क्लासमेट्स'' हा असाच चित्रपट आहे.
''क्लासमेट्स''मध्ये दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी चित्रपटाची प्रत्येक फ्रेम कशी मनोरंजक होईल याकडे कटाक्षाने लक्ष्य दिले अाहे. चित्रपटाची गोष्ट ही महाविद्यालयातील विद्यार्थी राजकारणाविषयी आहे. या चित्रपटात रहस्य हे शेवटी उलगडण्यात आल्याने शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा ताणली जाते. चित्रपटाचे छायांकन या चित्रपटाची विशेषता आहे.
चित्रपटात काही गाणी जबरदस्ती टाकल्यासारखी वाटतात. चित्रपटाचे कलाकार व महाविद्यालयीन वातावरण बघता दुनियादारीची आठवण तुम्हाला येऊ शकते.
शेवटी हा चित्रपट तुम्हाला खुप मोठा सन्देश देणार नाही मात्र अडीच तास मनोरंजन नक्की करेल, तेव्हा आपल्या ''क्लासमेट्स'' सोबत चित्रपट बघायला विसरु नका.
Saturday, 29 November 2014
''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''
मी आज ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघितला, हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याची इच्छा होती पण एकूण कामाचा व्याप बघता ते आज शक्य झाले. आज चित्रपट प्रदर्शित होऊन ५१ दिवसानंतरही हा चित्रपट बघण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होती. ८व्या आठवड्यातही हा चित्रपट गर्दी खेचतोय हेच ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''चे व मराठी चित्रपटाचे मोठे यश आहे.
जवळपास तीन वर्षापुर्वी ''मी सिंधुताई सपकाळ'' बघितला होता, हा चित्रपट सिंधुताई सपकाळ यांच्या ''मी वनवासी'' या आत्मचरित्रावर आधारित होता. आत्मचरित्रावर आधारित हा एक उत्तम चित्रपट आहे. ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' याच परंपरेतला चित्रपट आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला मी डॉ प्रकाश आमटे यांचे आत्मकथन ''प्रकाशवाटा'' वाचले होते, त्यात त्यांनी वर्णन केलेले हेमलकसा मधील सुरुवातीचे दिवस, त्यांना आलेल्या अडचणी, अनुभव सगळेच अंगावर काटा आणणारे होते. हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही संवेदनशील झाल्याशिवाय राहत नाही. कमी अधिक प्रमाणात हाच अनुभव ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघून येतो.
डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून हेमलकसा येथे जंगलात शून्यातून विश्व उभारले. विविध समस्यांना तोंड देत, तेथील आदिवासी समाजाला प्रतिकूल परिस्थितीत आयोग्यसेवा उपलब्ध करून दिली. तेवढ्यावरच न थांबता तिथे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देत, तेथील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ते करीत आहेत.
एक चित्रपट न्हणुन ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मध्ये काही उणिवा असल्या तरी या चित्रपटाची कथा थेट मनाला भिडणारी आहे. विश्वास वाटायला कठीण अशी ही सत्यकथा आहे. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे यांच्या सोबतच सर्व सहकलाकारांचा अभिनय अगदी प्रभवशाली आहे. वास्तविक लोकेशन्सवर चित्रपट चित्रित झाल्यामुळे चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यास मदत झाली आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक हरवून जातातच पण चित्रपट संपल्यावर येणारे आमटे कुटुंबिय व कार्यकर्ते यांचे फोटोज बघण्यासाठी पण थांबतात, यासाठी आपण खास करून समृद्धि पोरे यांचे अभिनन्दन करायला हवे ज्यांनी हे प्रेरणादायी कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत केली आहे.
या चित्रपटात बऱ्याच वैद्यरभीय व नागपूरच्या कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विदर्भात चित्रीकरण झालेल्या चित्रपटात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.
''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मधील मुख्य प्रेरणा आहे, बदल. ज्या प्रकारे डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी गडचिरोलीच्या आदिवासी समाजात सकारात्मक बदल घडून आणला आहे. त्याच प्रकारे आपण स्वत मध्ये व आपल्या समाजात काय सकारात्मक बदल घडून आणतो हेच महत्वाचे आहे.
जवळपास तीन वर्षापुर्वी ''मी सिंधुताई सपकाळ'' बघितला होता, हा चित्रपट सिंधुताई सपकाळ यांच्या ''मी वनवासी'' या आत्मचरित्रावर आधारित होता. आत्मचरित्रावर आधारित हा एक उत्तम चित्रपट आहे. ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' याच परंपरेतला चित्रपट आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मी डॉ प्रकाश आमटे यांचे आत्मकथन ''प्रकाशवाटा'' वाचले होते, त्यात त्यांनी वर्णन केलेले हेमलकसा मधील सुरुवातीचे दिवस, त्यांना आलेल्या अडचणी, अनुभव सगळेच अंगावर काटा आणणारे होते. हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही संवेदनशील झाल्याशिवाय राहत नाही. कमी अधिक प्रमाणात हाच अनुभव ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघून येतो.
डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून हेमलकसा येथे जंगलात शून्यातून विश्व उभारले. विविध समस्यांना तोंड देत, तेथील आदिवासी समाजाला प्रतिकूल परिस्थितीत आयोग्यसेवा उपलब्ध करून दिली. तेवढ्यावरच न थांबता तिथे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देत, तेथील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ते करीत आहेत.
एक चित्रपट न्हणुन ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मध्ये काही उणिवा असल्या तरी या चित्रपटाची कथा थेट मनाला भिडणारी आहे. विश्वास वाटायला कठीण अशी ही सत्यकथा आहे. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे यांच्या सोबतच सर्व सहकलाकारांचा अभिनय अगदी प्रभवशाली आहे. वास्तविक लोकेशन्सवर चित्रपट चित्रित झाल्यामुळे चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यास मदत झाली आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक हरवून जातातच पण चित्रपट संपल्यावर येणारे आमटे कुटुंबिय व कार्यकर्ते यांचे फोटोज बघण्यासाठी पण थांबतात, यासाठी आपण खास करून समृद्धि पोरे यांचे अभिनन्दन करायला हवे ज्यांनी हे प्रेरणादायी कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत केली आहे.
या चित्रपटात बऱ्याच वैद्यरभीय व नागपूरच्या कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विदर्भात चित्रीकरण झालेल्या चित्रपटात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.
''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मधील मुख्य प्रेरणा आहे, बदल. ज्या प्रकारे डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी गडचिरोलीच्या आदिवासी समाजात सकारात्मक बदल घडून आणला आहे. त्याच प्रकारे आपण स्वत मध्ये व आपल्या समाजात काय सकारात्मक बदल घडून आणतो हेच महत्वाचे आहे.
Thursday, 6 November 2014
क्लासमेट्स
उलाढाल, सतरंगी रे आणि नारबाची वाड़ी नंतर नव्या पिढीतील मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा ''क्लासमेट्स'' हा नवीन मराठी चित्रपट पुढील वर्षी १६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सचित पाटिल, सुशांत शेलार व सिद्धार्थ चांदेकर अशी तगड़ी स्टारकास्ट असणारा हा सिनेमा कॉलेज मधील विद्यार्थांची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे व त्याला विद्यार्थी संघटनांमधील राजकारणाची जोड आहे असे ट्रेलर मधून दिसते.
या चित्रपटाचा ट्रेलर सध्या यूटुबवर गाजतोय. विविध रंगाच्या अक्षरांच्या रुपात असलेल्या ''क्लासमेट्स''च्या टाइटल प्रमाणे त्यांच्या ट्रेलर मध्ये ही रंगाची उधळण केली आहे जी नक्कीच डोळ्यांना सुखावणारी आहे. ''क्लासमेट्स'' त्यांच्या ट्रेलर मधून चित्रपटाविषयी उत्सुकता जागवतो, सोबतच मराठी चित्रपटांमध्ये सध्या प्रमोशन व ट्रेलर बरेच काम केले जाते हे ही येथे अधोरेखित होते.
Sunday, 12 October 2014
डॉ प्रकाश बाबा आमटे
ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''डॉ प्रकाश बाबा आमटे'', ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' व ''इश्क़वाला लव''.समृद्धि पोरे दिग्दर्शित '' डॉ बाबा प्रकाश आमटे '' मधून नाना पाटेकर यांनी देऊळ नंतर बऱ्याच दिवसांनी मराठीत पुनरागमन केलय, सोबतच ''डॉ प्रकाश बाबा आमटे'' यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असल्याने या चित्रपटाविषयी लोकांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्याचा फायदा या चित्रपटाला होताना दिसत आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद व्यक्त होताना दिसतोय. नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी यांची जोडी व केमिस्ट्री हे ही ह्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्ये न्हणावे लागेल. हि जोडी ह्या आधी उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ''देऊळ'' या चित्रपटातूनही मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. डॉ प्रकाश बाबा आमटे यांचे आत्मकथन ''प्रकाशवाटा'' ह्याच वर्षी मी वाचले असून त्यामध्ये संवेदनशील करणारे अनेक प्रसंग होते. त्यामुळे मला सुद्धा या चित्रपटाची प्रतीक्षा होती.
या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झालेल्या ''गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'' या धमाल विनोदी राजकीयपटाचा सीक्वल आहे. एकी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना, मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे अशी दिग्गज मंडळी या चित्रपटात असल्यामुळे या चित्रपटालाही मराठी प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे.
या शुक्रवारी प्रदर्शित झालेला तीसरा चित्रपट ''इश्क़वाला लव'' हा चित्रपट एक प्रेमकथा असून ''एक वेगळी प्रेमकथा'' अशी टैग लाइन निर्मात्यांनी या चित्रपटाला दिली अाहे. आदिनाथ कोठारे अभिनीत या चित्रपटाच्या दिग्दर्शक रेणु देसाई आहेत.
या शुक्रवारी वेगवेगळ्या धाटणीचे तीन चांगले चित्रपट प्रदर्शित झालेत, तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन नक्कीच त्यांचा आनंद घ्या.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
