आज (२५ दिसंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मधुगंधा कुलकर्णी यांनी लेखिका आणि अभिनेत्री अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर त्यांना ओळख मिळाली ती "एलिजाबेथ एकादशी" या चित्रपटाच्या पटकथा लेखनामधून. त्या याच चित्रपटाच्या दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत.
Showing posts with label writer. Show all posts
Showing posts with label writer. Show all posts
Sunday, 25 December 2016
मधुगंधा कुलकर्णी
आज (२५ दिसंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मधुगंधा कुलकर्णी यांनी लेखिका आणि अभिनेत्री अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर त्यांना ओळख मिळाली ती "एलिजाबेथ एकादशी" या चित्रपटाच्या पटकथा लेखनामधून. त्या याच चित्रपटाच्या दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. Friday, 29 April 2016
प्रियदर्शन जाधव
आज (२९ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रियदर्शन जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रियदर्शन जाधव हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी रवी जाधव यांच्या "टाईम पास" या चित्रपटाची कथा लिहिली होती आणि या चित्रपटाच्या दुसर्या भागात थेट नायक म्हणून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. झी मराठीवरील "फु बाई फु" या कार्यक्रमात ही त्यांनी भाग घेतला होता. "चला हवा येऊ दया" च्या काही भागांमध्ये पण त्यांनी अभिनय केला आहे.
Tuesday, 3 November 2015
सोनाली कुलकर्णी
आज (३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

सोनाली कुलकर्णी यांना आपण संवेदनशील अभिनेत्री सोबतच एक संवेदनशील लेखिका म्हणून ही ओळखतो. त्यांनी अनेक वर्षे लोकसत्ताच्या "विवा" या पुरवणीचे संपादन केले, त्यात त्यांनी लिहिलेल्या "सो कूल" या स्तंभावर आधारीत त्यांच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. व्यावसायिक आणि कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट करतांना त्यात योग्य संतुलन त्यांनी साधले आहे. त्यांनी चित्रपट सृष्टितील आपली कारकीर्द गिरीश कर्नाड दिग्दर्शित "चेलुवी" या चित्रपटातून सुरु केली. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. या चित्रपटांमध्ये "अग्निवर्षा", "कितने दूर कितने पास", "कैरी", "घराबाहेर", "जहा तुम ले चलो", "जुनून", "टॅक्सी नंबर ९२११", "डरना जरूरी है", "डॉ. प्रकाश बाबा आमटे", "डॉ. बाबासाहेब आंबेडकर", "दायरा", "दिल चाहता है", "दिल विल प्यार व्यार", "देवराई", "दोघी", "प्यार तूने क्या किया", "ब्राईड अँड प्रेज्युडिस", "मिशन कश्मिर", "मुक्ता", "सखी", "सिंघम" प्रमुख आहे. या वर्षी त्यांची प्रमुख भूमिका असणारा "अग बाई अरेच्या" हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांना "फूॅक सु डी मी" या इटालियन चित्रपटासाठी मिलान अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सावात सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी "खतरों के खिलाड़ी " व "झलक दिखला जा" या रियलिटी शो मध्ये भाग घेऊन आपल्या एक्शन आणि नृत्य कौशल्यासाठी कौतुक मिळवले. त्यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.sonalikulkarni.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Sunday, 1 November 2015
नवंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस
नवंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस
- २ नवंबर - अरुण कदम (अभिनेता)
- ३ नवंबर - सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री व लेखिका)
- ३ नवंबर - स्व लक्ष्मीकांत बर्डे (अभिनेता)
- ४ नवंबर - मिलिंद सोमण (अभिनेता)
- ७ नवंबर - जयेश चव्हाण (अभिनेता)
- ९ नवंबर - किशोर कदम (अभिनेता, कवी व गीतलेखक)
- ९ नवंबर - सुबोध भावे (अभिनेता)
- १३ नवंबर - अंशुमन विचारे (अभिनेता)
- १६ नवंबर - संदीप कुलकर्णी (अभिनेता)
- १६ नवंबर - श्रीराम लागू (अभिनेता)
- १७ नवंबर - रत्नाकर मतकरी (दिग्दर्शक)
- १७ नवंबर - सुशांत शेलार (अभिनेता)
- १८ नवंबर - अमित अभ्यंकर (दिग्दर्शक)
- १८ नवंबर - नितिनकुमार बोरा (दिग्दर्शक)
- १९ नवंबर - नितिन नायगावकर (लेखक)
- २० नवंबर - अविनाश अरुण(दिग्दर्शक)
- २३ नवंबर - अमृता खानविलकर (अभिनेत्री)
- २४ नवंबर - अमोल पालेकर (दिग्दर्शक व अभिनेता)
- २४ नवंबर - प्रणय तेलंग (दिग्दर्शक)
- २६ नवंबर - विजय शिंदे (दिग्दर्शक)
- २९ नवंबर - नेहा पेंडसे (अभिनेत्री)
Tuesday, 6 October 2015
सलिल कुलकर्णी
आज (६ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक सलिल कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सलिल कुलकर्णी यांनी अनेक चित्रपट व अल्बम्सना संगीत दिले आहे. "एक उनाड दिवस", "जन मन गण", "जमीन", "चैंपियन", "आता कशाला उद्याची बात", "धागे दोरे", "छोड़ो कल की बाते", "निशानी डावा अंगठा", "विट्ठल विट्ठल", "पांढर", "चिंटू", "चकवा", "बंड्या आणि बेबी", "हाय काय नाय काय", "आनंदी आनंद", "हॉउसफुल" आणि "बॉयोस्कोप" हि त्यातील काही प्रमुख चित्रपटाची नावे आहेत. त्यांचा गीतकार संदीप खरे यांच्यासोबत "आयुष्यावर बोलू काही" हा गाण्याचा संगीतमय कार्यक्रम खुप प्रसिद्द आहे. "सा रे ग म प" व "गौरव महाराष्ट्राचा" या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून त्यांनी काम बघितले आहे. संगीतासोबतच लेखनाची सुद्धा त्यांना आवड आहे, "लोकसत्ता" या नामांकित वृत्तपत्रासाठी ते स्तम्भलेखन करतात.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
