Showing posts with label sa re ga ma p. Show all posts
Showing posts with label sa re ga ma p. Show all posts

Friday, 19 February 2016

अवधूत गुप्ते

आज (१९ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठीतील प्रसिद्द संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी आपली ओळख आता दिग्दर्शक म्हणून पक्की केली आहे. "झेंडा", "मोरय्या", "जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा" आणि "एक तारा" या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. 

संगीत दिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शना सोबतच टीवीवर "सा रे गा मा" या शोचा परीक्षक आणि "खुपते तिथे गुप्ते" चे सूत्र संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती साठी तुम्ही त्यांच्या www.avadhootgupte.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. 

Tuesday, 6 October 2015

सलिल कुलकर्णी

आज (६ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक सलिल कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सलिल कुलकर्णी यांनी अनेक चित्रपट व अल्बम्सना संगीत दिले आहे. "एक उनाड दिवस", "जन मन गण", "जमीन", "चैंपियन", "आता कशाला उद्याची बात", "धागे दोरे", "छोड़ो कल की बाते", "निशानी डावा अंगठा", "विट्ठल विट्ठल", "पांढर", "चिंटू", "चकवा", "बंड्या आणि बेबी", "हाय काय नाय काय", "आनंदी आनंद", "हॉउसफुल" आणि "बॉयोस्कोप" हि त्यातील काही प्रमुख चित्रपटाची नावे आहेत. त्यांचा गीतकार संदीप खरे यांच्यासोबत "आयुष्यावर बोलू काही" हा गाण्याचा संगीतमय कार्यक्रम खुप प्रसिद्द आहे. "सा रे ग म प" व "गौरव महाराष्ट्राचा" या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून त्यांनी काम बघितले आहे. संगीतासोबतच लेखनाची सुद्धा त्यांना आवड आहे, "लोकसत्ता" या नामांकित वृत्तपत्रासाठी ते स्तम्भलेखन करतात.

किरण नाटकी