Showing posts with label ek tara. Show all posts
Showing posts with label ek tara. Show all posts

Friday, 19 February 2016

अवधूत गुप्ते

आज (१९ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठीतील प्रसिद्द संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी आपली ओळख आता दिग्दर्शक म्हणून पक्की केली आहे. "झेंडा", "मोरय्या", "जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा" आणि "एक तारा" या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. 

संगीत दिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शना सोबतच टीवीवर "सा रे गा मा" या शोचा परीक्षक आणि "खुपते तिथे गुप्ते" चे सूत्र संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती साठी तुम्ही त्यांच्या www.avadhootgupte.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. 

Saturday, 23 May 2015

तेजस्विनी पंडित

नाटक, मालिका व चित्रपट या अभिनयाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात समर्थपणे वावरणाऱ्या अभिनेत्रीमध्ये
तेजस्विनी पंडित यांचे नाव सध्या, आघाडीवरील अभिनेत्रींपैकी एक आहे. 23 मे ला पुणे येथे जन्मलेल्या तेजस्विनी पंडित प्रख्यात अभिनेत्री ज्योति चांदेकर यांच्या कन्या आहेत. तेजस्विनी पंडित सॉफ्टवेयर इंजीनियर भूषण बोपचे यांच्याशी 2012 साली विवाहबद्ध झाल्या आहेत. त्या अभिनयासोबतच नृत्य, चित्रकला व खेळांमध्ये निपुण आहेत. ''अग बाई अरेच्या'' या चित्रपटातून त्यांनी आपली कारकिर्द सुरु केली. ''मी सिंधुताई सपकाळ'' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. ऋषिकेश जोशी दिग्दर्शित ''नांदी'' या नाटकातून त्या महत्वाच्या भूमिका साकारत आहेत. हे नाटक सध्या रंगभूमीवर खुप गाजत आहे. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''7 रोशन विला'', संजय जाधव दिग्दर्शित ''तू हि रे'' चित्रपटाचा समावेश आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना अनेक शुभेच्छा. 

तेजस्विनी पंडित यांचे चित्रपट
  • 7 रोशन विला 
  • युध्द (२०१५)
  • कैंडल मार्च (२०१४)
  • एक तारा (२०१४) 
  • मुक्ति (२०१२) 
  • ब्लफमास्टर (२०१२) 
  • पकड़ा पकड़ी (२०१०)
  • मी सिंधुताई सपकाळ (२०१०)
  • वाटवळ (२०१०) 
  • रानभूल (२००९)
  • टारगेट (२००९)
  • गैर (२००९)
  • नाथा पुरे आता (२००५)
  • अग बाई अरेच्या (२००४)

तेजस्विनी पंडित यांच्या अभिनय केलेल्या टि वी मालिका
  • कालाय तस्मै नमः (ETV मराठी - २०१२)
  • एकच ह्या जन्मी जानू (जी मराठी - २०१२)
  • लज्जा (जी मराठी - २०११)
  • तुझ नी माझ घर श्रीमताच (स्टार प्रवाह - २०१०)
  • गाणे तुमचे आमचे (ETV मराठी - २००७)

तेजस्विनी पंडित यांच्या अभिनय केलेले नाटक
  • नांदी 
  • येरे येरे पैसा 
  • रखेली

Saturday, 31 January 2015

''एक तारा''

काल ''एक तारा'' हा चित्रपट प्रदर्शित झाला.

''एक तारा'' मध्ये संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असून चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत गुप्ते आहेत. अनेक सुमधुर गाण्यांनंतर आता अवधूत गुप्ते वेगवेगळ्या विषयावरच्या सिनेमांची मेजवानी सध्या मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांना देत आहे. झेंडा, मोरय्या व जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा नंतर दिग्दर्शक न्हणुन ''एक तारा'' हा त्यांचा चौथा मराठी चित्रपट आहे. ''एक तारा'' मध्ये संगीत महत्वाच्या भूमिकेत असणार आहे, हे पोस्टरवरूनच सिद्ध होते. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हातात गिटार असलेला नायक संतोष जुवेकर, रसिकांचे प्रतिनिधित्व करणारे हात सर्वच चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारे आहे.

Saturday, 3 January 2015

२०१५ ची मराठी चित्रपट सृष्टि

२०१४ प्रमाणेच याही वर्षी मराठी चित्रपट सृष्टीत अनेक नवीन प्रयोग पाहायला मिळणार आहे. याची सुरवात याच शुक्रवारी ''लोकमान्य - एक युगपुरुष''ने झाली आहे.  या नंतर जनवरी महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित ''बाळकडू'', मकरंद अनासपुरे अभिनीत ''साट लोट पण सगळ खोट'' व  मल्टी स्टारर ''क्लासमेट्स'' प्रदर्शित होणार आहे.  

फरवरी महिन्यात लागोपाठ दोन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे श्रेयस तळपदे अभिनीत ''बाजी'' व स्वप्निल जोशी अभिनीत ''मितवा''. याच महिन्यात रवि जाधव प्रस्तुत ''कॉफी आणि बरच काही'' सुद्धा प्रदर्शित होणार आहे.  

या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये एक तारा, जाणिवा, पी जी, वक्रतुंड महाकाय, बाबांची शाळा, किल्ला, सिद्धान्त, नीलकण्ठ मास्टर, बुगडी माझी सांडली ग, मर्डर मिस्ट्री, व्हाट अबाउट सावरकर याचा समावेश असणार आहे. 

किरण नाटकी