Showing posts with label Target. Show all posts
Showing posts with label Target. Show all posts

Wednesday, 3 February 2016

मानसी नाईक

आज (३ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मानसी नाईक यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मानसी नाईक यांनी "ज़बरदस्त" या चित्रपटातून आपली अभिनयाची कारकीर्द सुरु केली. २०१२ साली आलेल्या "तीन बायका फजीती आयका" या चित्रपटातील "वाट बघतोय रिक्शावाला" या आइटम सांग ने त्यांना विशेष प्रसिद्धि मिळवून दिली. या सोबतच त्यांनी "टारगेट", "फक्त लढ म्हणा", "कुटुंब", "कोकणस्थ", "हुतुतु" आणि "मर्डर मिस्त्री" या चित्रपटात अभिनय केला आहे. "चला हवा येऊ दया" च्या काही भागांमध्ये पण त्यांनी अभिनय केला आहे.  

Saturday, 23 May 2015

तेजस्विनी पंडित

नाटक, मालिका व चित्रपट या अभिनयाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात समर्थपणे वावरणाऱ्या अभिनेत्रीमध्ये
तेजस्विनी पंडित यांचे नाव सध्या, आघाडीवरील अभिनेत्रींपैकी एक आहे. 23 मे ला पुणे येथे जन्मलेल्या तेजस्विनी पंडित प्रख्यात अभिनेत्री ज्योति चांदेकर यांच्या कन्या आहेत. तेजस्विनी पंडित सॉफ्टवेयर इंजीनियर भूषण बोपचे यांच्याशी 2012 साली विवाहबद्ध झाल्या आहेत. त्या अभिनयासोबतच नृत्य, चित्रकला व खेळांमध्ये निपुण आहेत. ''अग बाई अरेच्या'' या चित्रपटातून त्यांनी आपली कारकिर्द सुरु केली. ''मी सिंधुताई सपकाळ'' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. ऋषिकेश जोशी दिग्दर्शित ''नांदी'' या नाटकातून त्या महत्वाच्या भूमिका साकारत आहेत. हे नाटक सध्या रंगभूमीवर खुप गाजत आहे. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''7 रोशन विला'', संजय जाधव दिग्दर्शित ''तू हि रे'' चित्रपटाचा समावेश आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना अनेक शुभेच्छा. 

तेजस्विनी पंडित यांचे चित्रपट
  • 7 रोशन विला 
  • युध्द (२०१५)
  • कैंडल मार्च (२०१४)
  • एक तारा (२०१४) 
  • मुक्ति (२०१२) 
  • ब्लफमास्टर (२०१२) 
  • पकड़ा पकड़ी (२०१०)
  • मी सिंधुताई सपकाळ (२०१०)
  • वाटवळ (२०१०) 
  • रानभूल (२००९)
  • टारगेट (२००९)
  • गैर (२००९)
  • नाथा पुरे आता (२००५)
  • अग बाई अरेच्या (२००४)

तेजस्विनी पंडित यांच्या अभिनय केलेल्या टि वी मालिका
  • कालाय तस्मै नमः (ETV मराठी - २०१२)
  • एकच ह्या जन्मी जानू (जी मराठी - २०१२)
  • लज्जा (जी मराठी - २०११)
  • तुझ नी माझ घर श्रीमताच (स्टार प्रवाह - २०१०)
  • गाणे तुमचे आमचे (ETV मराठी - २००७)

तेजस्विनी पंडित यांच्या अभिनय केलेले नाटक
  • नांदी 
  • येरे येरे पैसा 
  • रखेली

किरण नाटकी