आज (३ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मानसी नाईक यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मानसी नाईक यांनी "ज़बरदस्त" या चित्रपटातून आपली अभिनयाची कारकीर्द सुरु केली. २०१२ साली आलेल्या "तीन बायका फजीती आयका" या चित्रपटातील "वाट बघतोय रिक्शावाला" या आइटम सांग ने त्यांना विशेष प्रसिद्धि मिळवून दिली. या सोबतच त्यांनी "टारगेट", "फक्त लढ म्हणा", "कुटुंब", "कोकणस्थ", "हुतुतु" आणि "मर्डर मिस्त्री" या चित्रपटात अभिनय केला आहे. "चला हवा येऊ दया" च्या काही भागांमध्ये पण त्यांनी अभिनय केला आहे.
Showing posts with label manasi naik. Show all posts
Showing posts with label manasi naik. Show all posts
Wednesday, 3 February 2016
मानसी नाईक
आज (३ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मानसी नाईक यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मानसी नाईक यांनी "ज़बरदस्त" या चित्रपटातून आपली अभिनयाची कारकीर्द सुरु केली. २०१२ साली आलेल्या "तीन बायका फजीती आयका" या चित्रपटातील "वाट बघतोय रिक्शावाला" या आइटम सांग ने त्यांना विशेष प्रसिद्धि मिळवून दिली. या सोबतच त्यांनी "टारगेट", "फक्त लढ म्हणा", "कुटुंब", "कोकणस्थ", "हुतुतु" आणि "मर्डर मिस्त्री" या चित्रपटात अभिनय केला आहे. "चला हवा येऊ दया" च्या काही भागांमध्ये पण त्यांनी अभिनय केला आहे. Saturday, 5 September 2015
''तू हि रे'' आणि ''द शैडो''
या आठवड्यात दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत ''तू हि रे'' आणि ''द शैडो''.
''दुनियादारी'' व ''प्यारवाली लव स्टोरी'' नंतर दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते स्वप्निल जोशी व अभिनेत्री सई ताम्हणकर या जोडीचा तीसरा चित्रपट ''तू हि रे'' या शुक्रवारी प्रदर्शित झाला. ''तू हि रे'' मध्ये स्वप्निल जोशी, सईं ताम्हणकर व तेजस्विनी पंडित यांनी प्रेम कहानी रंगवली आहे. या चित्रपटाचे मार्केटिंग अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे, चित्रपटाची स्टार वैल्यू खुप जास्त आहे, स्वप्निल जोशी आणि सईं ताम्हणकर यांच्या जोडीने मराठी प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे, संजय जाधव यांचे दिग्दर्शन या सर्व बाबींमुळे हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.
या आठवड्यात प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''द शैडो'' हा भयपट असून रोहन सातघरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मानसी नाईक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
मागील आठवड्यात ''ढोलकी'', ''हायवे'' आणि ''शेगावीचा योगी गजानन'' हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते.
''दुनियादारी'' व ''प्यारवाली लव स्टोरी'' नंतर दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते स्वप्निल जोशी व अभिनेत्री सई ताम्हणकर या जोडीचा तीसरा चित्रपट ''तू हि रे'' या शुक्रवारी प्रदर्शित झाला. ''तू हि रे'' मध्ये स्वप्निल जोशी, सईं ताम्हणकर व तेजस्विनी पंडित यांनी प्रेम कहानी रंगवली आहे. या चित्रपटाचे मार्केटिंग अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे, चित्रपटाची स्टार वैल्यू खुप जास्त आहे, स्वप्निल जोशी आणि सईं ताम्हणकर यांच्या जोडीने मराठी प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे, संजय जाधव यांचे दिग्दर्शन या सर्व बाबींमुळे हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.
या आठवड्यात प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''द शैडो'' हा भयपट असून रोहन सातघरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मानसी नाईक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
मागील आठवड्यात ''ढोलकी'', ''हायवे'' आणि ''शेगावीचा योगी गजानन'' हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते.
Friday, 10 July 2015
''मर्डर मेस्त्री''
आज राहुल जाधव दिग्दर्शित ''मर्डर मेस्त्री'' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ''मर्डर मेस्त्री'' मध्ये दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी, वंदना गुप्ते, क्रांति रेडकर, संजय खापरे, मानसी नाईक, विकास कदम, कमलाकर सातपुते अशी तगडी स्टार कास्ट आहे. सस्पेंस आणि विनोदाचे आगळे वेगळे मिश्रण या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे मार्केटिंग अतिशय जोरदार पद्धतीने करण्यात आले असून त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदीतील प्रख्यात निर्माते नाडियाडवाला मराठीत पदार्पण करीत आहे. ''मर्डर मेस्त्री''चे दिग्दर्शन राहुल जाधव यांनी या आधी ''विजय असो'' आणि ''हेल्लो नंदन'' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
मागील ३ आठवड्यात ''२ प्रेमी प्रेमाचे'', ''ब्लैकबोर्ड'', ''टाइम बरा वाईट'', ''वांटेड बायको नंबर १'', ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'', ''वेलकम जिंदगी'', ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर'' असे तब्बल १० चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या शुक्रवारी फक्त ''मर्डर मेस्त्री'' हा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
मागील ३ आठवड्यात ''२ प्रेमी प्रेमाचे'', ''ब्लैकबोर्ड'', ''टाइम बरा वाईट'', ''वांटेड बायको नंबर १'', ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'', ''वेलकम जिंदगी'', ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर'' असे तब्बल १० चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या शुक्रवारी फक्त ''मर्डर मेस्त्री'' हा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
Wednesday, 29 April 2015
चला हवा येऊ दया
काल ''चला हवा येऊ दया'' या शो चे ७४ भाग पूर्ण झाले, आता ७५ व्या भागात काय धमाल होईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या शो मध्ये मागील ७४ भागात मराठीतील जवळपास सर्वच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. ''लई भारी'' चित्रपटाच्या निमित्ताने या ''चला हवा येऊ दया''ची सुरूवात करण्यात आली होती. ५० व्या भागात ''बाजी''च्या निमित्ताने श्रेयस तळपदे यांनी या शो मध्ये हजेरी लावली होती.
एका पेक्षा एक दर्जेदार कलावंतांची फौज व उत्फुर्त विनोद हि ह्या शो ची खास वैशिष्ट्ये आहे. निलेश साबळे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, विनीत बोंडे, श्रेया बुगडे, मानसी नाईक हे सर्व कलाकार प्रत्येक भागात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. सेलिब्रिटी बदलत जातात पण हे सर्व कलाकार अगदी प्रत्येक भागात धमाल करतात. कित्येकदा तर सेलिब्रिटी पेक्षा हेच कलाकार जास्त भाव जाऊन जातात, किंबहुना हे सर्वच कलाकार आता सेलिब्रिटी झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही. भारत गणेशपुरे यांनी रंगवलेला सरपंच, भाऊ कदम रंगवत असलेले डैडी, कुशल बद्रिके यांचा डायरेक्टर व सरपंचाचा मुलगा, सागर करंडे यांनी रंगवलेली स्त्री पात्रे, विनीत बोंडे यांचे छोटा मुलगा, श्रेया बुगडे यांनी रंगवलेले मिसेस बडबडे हे सर्व पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. तुषार देवल यांच्या उल्लेखाशिवाय हा लेख अपुरा आहे. त्यांचा ''जेम्स बैंड'' तर या शो ची जान आहे. शो च्या सुरवातीला प्रियदर्शन जाधव पण ''चला हवा येऊ दया'' मध्ये भुमिका करायचे पण त्यांना हा शो मध्येच सोडावा लागला. या शो मध्ये येणारे सेलेब्रिटी ही ''चला हवा येऊ दया'' चे नियमित प्रेक्षक व चाहते असल्याचे मान्य करतात.
''चला हवा येऊ दया''च्या निमित्ताने मराठी चित्रपट व नाटकांच्या प्रसिद्धीसाठी महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मराठी चित्रपटांची हवा करण्यात ''चला हवा येऊ दया'' महत्वाची भूमिका बजावत आहे. ''चला हवा येऊ दया'' चे सर्वच एपिसोड हिट आहेत पण ''डॉ प्रकाश बाबा आमटे''च्या निमित्ताने करण्यात आलेला नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या सोबतचा एपिसोड, टिम दुनियादारी, टिम हंटर सोबतचा एपिसोड माझे पर्सनल फेवरेट आहेत. ''चला हवा येऊ दया'' हा शो ''कॉमेडी नाइट्स विथ कपिल'' वर बेतलेला असल्याची या शो च्या चर्चा सुरवातीला होती. पण आपली ओळख निर्माण करण्यात हा शो पूर्णपणे यशस्वी झाला आहे.
एका पेक्षा एक दर्जेदार कलावंतांची फौज व उत्फुर्त विनोद हि ह्या शो ची खास वैशिष्ट्ये आहे. निलेश साबळे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, विनीत बोंडे, श्रेया बुगडे, मानसी नाईक हे सर्व कलाकार प्रत्येक भागात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. सेलिब्रिटी बदलत जातात पण हे सर्व कलाकार अगदी प्रत्येक भागात धमाल करतात. कित्येकदा तर सेलिब्रिटी पेक्षा हेच कलाकार जास्त भाव जाऊन जातात, किंबहुना हे सर्वच कलाकार आता सेलिब्रिटी झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही. भारत गणेशपुरे यांनी रंगवलेला सरपंच, भाऊ कदम रंगवत असलेले डैडी, कुशल बद्रिके यांचा डायरेक्टर व सरपंचाचा मुलगा, सागर करंडे यांनी रंगवलेली स्त्री पात्रे, विनीत बोंडे यांचे छोटा मुलगा, श्रेया बुगडे यांनी रंगवलेले मिसेस बडबडे हे सर्व पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. तुषार देवल यांच्या उल्लेखाशिवाय हा लेख अपुरा आहे. त्यांचा ''जेम्स बैंड'' तर या शो ची जान आहे. शो च्या सुरवातीला प्रियदर्शन जाधव पण ''चला हवा येऊ दया'' मध्ये भुमिका करायचे पण त्यांना हा शो मध्येच सोडावा लागला. या शो मध्ये येणारे सेलेब्रिटी ही ''चला हवा येऊ दया'' चे नियमित प्रेक्षक व चाहते असल्याचे मान्य करतात.''चला हवा येऊ दया''च्या निमित्ताने मराठी चित्रपट व नाटकांच्या प्रसिद्धीसाठी महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मराठी चित्रपटांची हवा करण्यात ''चला हवा येऊ दया'' महत्वाची भूमिका बजावत आहे. ''चला हवा येऊ दया'' चे सर्वच एपिसोड हिट आहेत पण ''डॉ प्रकाश बाबा आमटे''च्या निमित्ताने करण्यात आलेला नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या सोबतचा एपिसोड, टिम दुनियादारी, टिम हंटर सोबतचा एपिसोड माझे पर्सनल फेवरेट आहेत. ''चला हवा येऊ दया'' हा शो ''कॉमेडी नाइट्स विथ कपिल'' वर बेतलेला असल्याची या शो च्या चर्चा सुरवातीला होती. पण आपली ओळख निर्माण करण्यात हा शो पूर्णपणे यशस्वी झाला आहे.
टेलीविज़न सोबतच यूटुबवर सुद्धा या शो चे तितकेच दर्शक आहेत, हे येथे विषेश नमूद करायला हवे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...