आज (३० जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते निलेश साबले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! निलेश साबळे यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले तरी सध्या ते अवघ्या महाराष्ट्रात विनोदाचे डॉक्टर म्हणून ओळखले जातात. ते पहिल्यांदा प्रकाश झोतात आले ते जी मराठी वरील "महाराष्ट्राचा सुपरस्टार" हा रियलिटी शो जिंकल्यानंतर. त्यानंतर त्यांनी "फु बाई फु" चे सूत्र संचालन केले आणि महाराष्ट्रातील घरा घरात पोहचले. त्यांनी आपल्या मिश्किल सूत्र संचालनाने सर्वांची मने जिंकली. "फु बाई फु" मध्ये त्यांनी अभिनय व लेखन कौशल्य ही दाखवले. त्यानंतर "चला हवा येऊ दया" या कार्यक्रमाच्या सूत्र संचालन आणि दिग्दर्शनामुळे खरोखरच महाराष्ट्राचे सुपर स्टार झाले.
Showing posts with label chala hawa yeu dya. Show all posts
Showing posts with label chala hawa yeu dya. Show all posts
Thursday, 30 June 2016
निलेश साबले
आज (३० जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते निलेश साबले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! निलेश साबळे यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले तरी सध्या ते अवघ्या महाराष्ट्रात विनोदाचे डॉक्टर म्हणून ओळखले जातात. ते पहिल्यांदा प्रकाश झोतात आले ते जी मराठी वरील "महाराष्ट्राचा सुपरस्टार" हा रियलिटी शो जिंकल्यानंतर. त्यानंतर त्यांनी "फु बाई फु" चे सूत्र संचालन केले आणि महाराष्ट्रातील घरा घरात पोहचले. त्यांनी आपल्या मिश्किल सूत्र संचालनाने सर्वांची मने जिंकली. "फु बाई फु" मध्ये त्यांनी अभिनय व लेखन कौशल्य ही दाखवले. त्यानंतर "चला हवा येऊ दया" या कार्यक्रमाच्या सूत्र संचालन आणि दिग्दर्शनामुळे खरोखरच महाराष्ट्राचे सुपर स्टार झाले.Saturday, 15 August 2015
भारत गणेशपुरे
भारत गणेशपुरे हे मूळचे विदर्भातील अमरावतीचे, संघर्षाच्या काळात हिंदी व मराठी चित्रपटांतून छोट्या भूमिका करून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ''फु बाई फु'' या कार्यक्रमातून. ते सागर कारंडे यांच्यासह ''फु बाई फु''च्या सातव्या पर्वाचे ते विजेते ठरले. विदर्भीयन बोलीमुळे त्यांनी आपली एक विशेष ओळख निर्माण केली. सध्या सुरु ''चला हवा येऊ दया'' या कार्यक्रमातील त्यांनी केलेल्या विविध भूमिका म्हणजे भन्नाटच. त्यात त्यांनी साकारलेला त्रुटरवाडीचा सरपंच विशेष गाजतोय. येत्या २८ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या ''शेगावीचा योगी गजानन'' या चित्रपटात त्यांची भूमिका आहे. आज (१५ ऑगस्ट) त्यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!
भारत गणेशपुरे यांनी अभिनय केलेले चित्रपट
- स्वामी पब्लिक लिमिटेड (२०१४)
- डॉ बाबा प्रकाश आमटे (२०१४)
- पोस्टर बॉयज (२०१४)
- भाकरवाडी ७ कि मी (२०१४)
- कापूस कोंड्याची गोष्ट (२०१३)
- गाजराची पुंगी (२०१३)
- मेरीडियन (२०१३)
- एक दार भानगडी फार (२०१३)
- पिपानी (२०१२)
- लंगर (२०१२)
- उचला रे उचला (२०१२)
- आम्ही सुभाष बोलची (२०११)
- प्रतिबिम्ब (२०११)
- सगळ करून भागल (२०११)
- सद्रक्षकनाय (२०११)
- चल धर पकड (२०१०)
- डेबू (२०१०)
- टाटा बिरला आणि लैला (२०१०)
- कोण आहे रे तिकडे (२०१०)
- मीरा बाई नॉट आउट (२००८)
- ये मेरा इंडिया (२००८)
- चेकमेट (२००८)
- सख्खा सावत्र (२००८)
- एक चालीस की लास्ट लोकल (२००७)
- ब्लैक फ्राइडे (२००४)
- सातच्या आत घरात (२००४)
- प्राण जाये पर शान ना जाये (२००३)
- फु बाई फु
- चला हवा येऊ दया
- जस्ट हलक फुलक
Wednesday, 29 April 2015
चला हवा येऊ दया
काल ''चला हवा येऊ दया'' या शो चे ७४ भाग पूर्ण झाले, आता ७५ व्या भागात काय धमाल होईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या शो मध्ये मागील ७४ भागात मराठीतील जवळपास सर्वच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. ''लई भारी'' चित्रपटाच्या निमित्ताने या ''चला हवा येऊ दया''ची सुरूवात करण्यात आली होती. ५० व्या भागात ''बाजी''च्या निमित्ताने श्रेयस तळपदे यांनी या शो मध्ये हजेरी लावली होती.
एका पेक्षा एक दर्जेदार कलावंतांची फौज व उत्फुर्त विनोद हि ह्या शो ची खास वैशिष्ट्ये आहे. निलेश साबळे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, विनीत बोंडे, श्रेया बुगडे, मानसी नाईक हे सर्व कलाकार प्रत्येक भागात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. सेलिब्रिटी बदलत जातात पण हे सर्व कलाकार अगदी प्रत्येक भागात धमाल करतात. कित्येकदा तर सेलिब्रिटी पेक्षा हेच कलाकार जास्त भाव जाऊन जातात, किंबहुना हे सर्वच कलाकार आता सेलिब्रिटी झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही. भारत गणेशपुरे यांनी रंगवलेला सरपंच, भाऊ कदम रंगवत असलेले डैडी, कुशल बद्रिके यांचा डायरेक्टर व सरपंचाचा मुलगा, सागर करंडे यांनी रंगवलेली स्त्री पात्रे, विनीत बोंडे यांचे छोटा मुलगा, श्रेया बुगडे यांनी रंगवलेले मिसेस बडबडे हे सर्व पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. तुषार देवल यांच्या उल्लेखाशिवाय हा लेख अपुरा आहे. त्यांचा ''जेम्स बैंड'' तर या शो ची जान आहे. शो च्या सुरवातीला प्रियदर्शन जाधव पण ''चला हवा येऊ दया'' मध्ये भुमिका करायचे पण त्यांना हा शो मध्येच सोडावा लागला. या शो मध्ये येणारे सेलेब्रिटी ही ''चला हवा येऊ दया'' चे नियमित प्रेक्षक व चाहते असल्याचे मान्य करतात.
''चला हवा येऊ दया''च्या निमित्ताने मराठी चित्रपट व नाटकांच्या प्रसिद्धीसाठी महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मराठी चित्रपटांची हवा करण्यात ''चला हवा येऊ दया'' महत्वाची भूमिका बजावत आहे. ''चला हवा येऊ दया'' चे सर्वच एपिसोड हिट आहेत पण ''डॉ प्रकाश बाबा आमटे''च्या निमित्ताने करण्यात आलेला नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या सोबतचा एपिसोड, टिम दुनियादारी, टिम हंटर सोबतचा एपिसोड माझे पर्सनल फेवरेट आहेत. ''चला हवा येऊ दया'' हा शो ''कॉमेडी नाइट्स विथ कपिल'' वर बेतलेला असल्याची या शो च्या चर्चा सुरवातीला होती. पण आपली ओळख निर्माण करण्यात हा शो पूर्णपणे यशस्वी झाला आहे.
एका पेक्षा एक दर्जेदार कलावंतांची फौज व उत्फुर्त विनोद हि ह्या शो ची खास वैशिष्ट्ये आहे. निलेश साबळे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, विनीत बोंडे, श्रेया बुगडे, मानसी नाईक हे सर्व कलाकार प्रत्येक भागात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. सेलिब्रिटी बदलत जातात पण हे सर्व कलाकार अगदी प्रत्येक भागात धमाल करतात. कित्येकदा तर सेलिब्रिटी पेक्षा हेच कलाकार जास्त भाव जाऊन जातात, किंबहुना हे सर्वच कलाकार आता सेलिब्रिटी झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही. भारत गणेशपुरे यांनी रंगवलेला सरपंच, भाऊ कदम रंगवत असलेले डैडी, कुशल बद्रिके यांचा डायरेक्टर व सरपंचाचा मुलगा, सागर करंडे यांनी रंगवलेली स्त्री पात्रे, विनीत बोंडे यांचे छोटा मुलगा, श्रेया बुगडे यांनी रंगवलेले मिसेस बडबडे हे सर्व पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. तुषार देवल यांच्या उल्लेखाशिवाय हा लेख अपुरा आहे. त्यांचा ''जेम्स बैंड'' तर या शो ची जान आहे. शो च्या सुरवातीला प्रियदर्शन जाधव पण ''चला हवा येऊ दया'' मध्ये भुमिका करायचे पण त्यांना हा शो मध्येच सोडावा लागला. या शो मध्ये येणारे सेलेब्रिटी ही ''चला हवा येऊ दया'' चे नियमित प्रेक्षक व चाहते असल्याचे मान्य करतात.''चला हवा येऊ दया''च्या निमित्ताने मराठी चित्रपट व नाटकांच्या प्रसिद्धीसाठी महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मराठी चित्रपटांची हवा करण्यात ''चला हवा येऊ दया'' महत्वाची भूमिका बजावत आहे. ''चला हवा येऊ दया'' चे सर्वच एपिसोड हिट आहेत पण ''डॉ प्रकाश बाबा आमटे''च्या निमित्ताने करण्यात आलेला नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या सोबतचा एपिसोड, टिम दुनियादारी, टिम हंटर सोबतचा एपिसोड माझे पर्सनल फेवरेट आहेत. ''चला हवा येऊ दया'' हा शो ''कॉमेडी नाइट्स विथ कपिल'' वर बेतलेला असल्याची या शो च्या चर्चा सुरवातीला होती. पण आपली ओळख निर्माण करण्यात हा शो पूर्णपणे यशस्वी झाला आहे.
टेलीविज़न सोबतच यूटुबवर सुद्धा या शो चे तितकेच दर्शक आहेत, हे येथे विषेश नमूद करायला हवे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...