Showing posts with label hindi movies. Show all posts
Showing posts with label hindi movies. Show all posts

Friday, 23 October 2015

सिद्धार्थ जाधव

आज (२३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सिद्धार्थ जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. त्यांनी आपल्या अभिनय करकिर्दीची सुरुवात एकांकिका मधून केली. २००६ साली प्रदर्शित झालेल्या केदार शिंदे दिग्दर्शित ''जत्रा'' या चित्रपटाने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. त्यांच वर्षी ते रोहित शेट्टी दिग्दर्शित ''गोलमाल - फन अनलिमिटेड'' या हिंदी चित्रपटात पण झळकले. या मराठी व हिंदी चित्रपटांसोबतच ''ऑउटसोर्सेड'' नावाचा इंग्लिश चित्रपट पण याच वर्षी प्रदर्शित झाला. अशा प्रकारे २००६ साली त्यांनी धमाकेदार सुरवात केली. तेव्हापासून आजतागत ते आपल्या अभिनयाने सर्व रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. केदार शिंदे यांच्या सोबत त्यांची जोडी खुप गाजली.  "माझा नवरा तुझी बायको", "अग बाई अरेच्या", "बकुळा नामदेव घोटाळे", "जबरदस्त", "साडे माडे तीन", "दे धक्का", "गोलमाल रिटर्नस", "बाप रे बाप डोक्याला ताप", "गलगले निघाले", "उलाढाल", "सुंबरान", "गाव तसं चांगलं", "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "सालीने केला घोटाळा", "शिक्षणाच्या आयचा घो", '"हुप्पा हुय्या", "पारध", "क्षणभर विश्रांती", "इरादा पक्का", "लालबाग परळ", "फक्त लढ म्हणा", "सुपरस्टार", "खो-खो", "कुटुंब", "भाऊचा धक्का!", "टाइम प्लीज", "प्रियतमा", "मध्यमवर्ग", "रझाकार", "ड्रीम मॉल", "अग बाई अरेच्या २" आणि ''ढोलकी" या चित्रपटातून ते वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. त्यांच्या विनोदी भूमिका प्रसिद्ध असल्या तरी त्यांनी खुप वैविध्य राखले आहे त्यामुळेच या वर्षी त्यांना ''ड्रीम मॉल'' या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे.

"जागो मोहन प्यारे", "तुमचा मुलगा करतोय काय" आणि "लोच्या झाला रे" या नाटकातून त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांनी सोनी टेलीविज़न या वाहिनीवर ''कॉमेडी सर्कस" या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. प्रसिद्ध हास्य अभिनेता सुनील ग्रोवर यांच्या सोबत ''मैड - मेड इन इंडिया'' या कार्यक्रमात त्यांची भूमिका होती. यांच्या व्यतिरिक्त ''हसा चटकफू'', "घडलंय बिघडलंय", "आपण यांना हसलात का?" आणि "बा, बहू और बेबी" या मालिकेत ही त्यांनी काम केले आहे.

त्यांचा ''शासन'' हा चित्रपट येत्या २२ ऑक्टोबर ला प्रदर्शित होतोय.

Monday, 17 August 2015

सचिन पिळगावकर

मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे सचिन पिळगावकर. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अश्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी ''हाच माझा मार्ग'' नावाने आपली आत्मकथा लिहिली आहे. आज (१७ ऑगस्ट) त्यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!    

सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट

  • एकुलती एक (२०१३) 
  • आयडियाची कल्पना (२०१०)
  • आम्ही सातपुते (२००८)
  • एकदंत (कन्नड) (२००७)
  • ही पोरगी कुणाची (२००६) 
  • नवरा माझा नवसाचा (२००४)
  • कुंकू (१९९४) 
  • आयत्या घरात घरोबा (१९९१)
  • एकापेक्षा एक (१९९०)
  • आमच्या सारखे आम्हीच (१९९०) 
  • आत्मविश्वास (१९८९)
  • भूताचा भाऊ (१९८९)
  • अशी ही बनवा बनवी (१९८८)
  • माझा पती करोडपती (१९८८)
  • गंमत जंमत (१९८७)
  • नवरी मिळे नव-याला (१९८४)
  • सव्वाशेर (१९८४)
  • माय बाप (१९८२)


सचिन पिळगावकर यांनी अभिनय केलेले चित्रपट

  • सांगतो एका (२०१४)
  • एकुलती एक (२०१३) 
  • शर्यत (२०११)
  • आयडियाची कल्पना (२०१०)
  • आम्ही सातपुते (२००८)
  • एकदंत (कन्नड) (२००७)
  • ही पोरगी कुणाची (२००६) 
  • नवरा माझा नवसाचा (२००४)
  • ऎसी भी क्या जल्दी है (१९९६)
  • कुंकू (१९९४) 
  • आयत्या घरात घरोबा (१९९१)
  • आमच्यासारखेच आम्ही (१९९०)
  • एकापेक्षा एक (१९९०)
  • अभी तो मैन जवान हू (१९८९)
  • आत्मविश्वास (१९८९)
  • भूताचा भाऊ (१९८९)
  • अशी ही बनवा बनवी (१९८८)
  • माझा पती करोडपती (१९८८)
  • गंमत जंमत (१९८७)
  • नवरी मिळे नव-याला (१९८४)
  • सव्वाशेर (१९८४)
  • माय बाप (१९८२)
  • सत्ते पे सत्ता (१९८२)
  • नदिया के पार (१९८२)
  • अष्टविनायक (१९७९)
  • गोपाल कृष्णा (१९७९)
  • कॉलेज गर्ल (१९७८)
  • अखियों के झरोकोंसे (१९७८)
  • त्रिशूल (१९७८) 
  • बालिका वधू (१९७६)
  • गीत गाता चल (१९७५)
  • शोले (१९७५)
  • ब्रम्हचारी (१९६८)
  • ज्वेल थीफ (१९६७)
  • मँझली दिदी (१९६७)
  • डाक घर (१९६५)  
  • हा माझा मार्ग एकला (१९६२)

Saturday, 15 August 2015

भारत गणेशपुरे

भारत गणेशपुरे हे मूळचे विदर्भातील अमरावतीचे, संघर्षाच्या काळात हिंदी व मराठी चित्रपटांतून छोट्या भूमिका करून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ''फु बाई फु'' या कार्यक्रमातून. ते सागर कारंडे यांच्यासह ''फु बाई फु''च्या सातव्या पर्वाचे ते विजेते ठरले. विदर्भीयन बोलीमुळे त्यांनी आपली एक विशेष ओळख निर्माण केली. सध्या सुरु ''चला हवा येऊ दया'' या कार्यक्रमातील त्यांनी केलेल्या विविध भूमिका म्हणजे भन्नाटच. त्यात त्यांनी साकारलेला त्रुटरवाडीचा सरपंच विशेष गाजतोय. येत्या २८ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या ''शेगावीचा योगी गजानन'' या चित्रपटात त्यांची भूमिका आहे. आज (१५ ऑगस्ट) त्यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!  

भारत गणेशपुरे यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • स्वामी पब्लिक लिमिटेड (२०१४)
  • डॉ बाबा प्रकाश आमटे (२०१४) 
  • पोस्टर बॉयज (२०१४)  
  • भाकरवाडी ७ कि मी (२०१४) 
  • कापूस कोंड्याची गोष्ट (२०१३)  
  • गाजराची पुंगी (२०१३) 
  • मेरीडियन (२०१३) 
  • एक दार भानगडी फार (२०१३)
  • पिपानी (२०१२)
  • लंगर (२०१२) 
  • उचला रे उचला (२०१२)  
  • आम्ही सुभाष बोलची (२०११)
  • प्रतिबिम्ब (२०११) 
  • सगळ करून भागल (२०११) 
  • सद्रक्षकनाय (२०११) 
  • चल धर पकड (२०१०) 
  • डेबू (२०१०) 
  • टाटा बिरला आणि लैला (२०१०) 
  • कोण आहे रे तिकडे (२०१०) 
  • मीरा बाई नॉट आउट (२००८) 
  • ये मेरा इंडिया (२००८)
  • चेकमेट (२००८) 
  • सख्खा सावत्र (२००८)
  • एक चालीस की लास्ट लोकल (२००७) 
  • ब्लैक फ्राइडे (२००४) 
  • सातच्या आत घरात (२००४) 
  • प्राण जाये पर शान ना जाये (२००३)

भारत गणेशपुरे यांनी अभिनय केलेल्या टिवी मालिका 
  • फु बाई फु 
  • चला हवा येऊ दया 

भारत गणेशपुरे यांनी अभिनय केलेले नाटक
  • जस्ट हलक फुलक



किरण नाटकी