Showing posts with label kedar shinde. Show all posts
Showing posts with label kedar shinde. Show all posts

Saturday, 16 January 2016

केदार शिंदे

आज (१६ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! केदार शिंदे हे महाराष्ट्रातील प्रसिद्द शाहिर "शाहिर साबळे" यांचे नातू आहेत. केदार शिंदे यांनी ''अग बाई अरेच्या'', ''जत्रा'', ''यंदा कर्त्तव्य आहे'', ''माझा नवरा तुझी बायको'', ''मुक्काम पोस्ट लंडन'', ''याचा काही नेम नाही'', ''गलगले निघाले'', ''बकुला नामदेव घोटाळे'', ''इरादा पक्का'', ''ऑन ड्यूटी २४ तास'', ''खो खो'', ''श्रीमंत दामोदर पंत'' अशा दर्जेदार विनोदी चित्रपटाची मेजवानी मराठी प्रेक्षकांना दिली आहे. या चित्रपटांमधून त्याची भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्याबरोबर जोडी विशेष गाजली. हिंदीमध्ये केदार शिंदे यांनी "तो बात पक्की" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट 
  • अगं बाई... अरेच्या (२००६)
  • जत्रा (२००६)
  • यंदा कर्तव्य आहे (२००६)
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
  • ह्यांचा काही नेम नाही (२००८)
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००८)
  • गलगले निघाले (२००८)
  • इरादा पक्का (२०१०)
  • ऑन ड्यूटी २४ तास (२०१०)
  • श्रीमंत दामोदर पंत (२०१३) 
  • खो खो (२०१३)
  • अग बाई अरेच्या २ (२०१५)

Friday, 23 October 2015

सिद्धार्थ जाधव

आज (२३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सिद्धार्थ जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. त्यांनी आपल्या अभिनय करकिर्दीची सुरुवात एकांकिका मधून केली. २००६ साली प्रदर्शित झालेल्या केदार शिंदे दिग्दर्शित ''जत्रा'' या चित्रपटाने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. त्यांच वर्षी ते रोहित शेट्टी दिग्दर्शित ''गोलमाल - फन अनलिमिटेड'' या हिंदी चित्रपटात पण झळकले. या मराठी व हिंदी चित्रपटांसोबतच ''ऑउटसोर्सेड'' नावाचा इंग्लिश चित्रपट पण याच वर्षी प्रदर्शित झाला. अशा प्रकारे २००६ साली त्यांनी धमाकेदार सुरवात केली. तेव्हापासून आजतागत ते आपल्या अभिनयाने सर्व रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. केदार शिंदे यांच्या सोबत त्यांची जोडी खुप गाजली.  "माझा नवरा तुझी बायको", "अग बाई अरेच्या", "बकुळा नामदेव घोटाळे", "जबरदस्त", "साडे माडे तीन", "दे धक्का", "गोलमाल रिटर्नस", "बाप रे बाप डोक्याला ताप", "गलगले निघाले", "उलाढाल", "सुंबरान", "गाव तसं चांगलं", "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "सालीने केला घोटाळा", "शिक्षणाच्या आयचा घो", '"हुप्पा हुय्या", "पारध", "क्षणभर विश्रांती", "इरादा पक्का", "लालबाग परळ", "फक्त लढ म्हणा", "सुपरस्टार", "खो-खो", "कुटुंब", "भाऊचा धक्का!", "टाइम प्लीज", "प्रियतमा", "मध्यमवर्ग", "रझाकार", "ड्रीम मॉल", "अग बाई अरेच्या २" आणि ''ढोलकी" या चित्रपटातून ते वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. त्यांच्या विनोदी भूमिका प्रसिद्ध असल्या तरी त्यांनी खुप वैविध्य राखले आहे त्यामुळेच या वर्षी त्यांना ''ड्रीम मॉल'' या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे.

"जागो मोहन प्यारे", "तुमचा मुलगा करतोय काय" आणि "लोच्या झाला रे" या नाटकातून त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांनी सोनी टेलीविज़न या वाहिनीवर ''कॉमेडी सर्कस" या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. प्रसिद्ध हास्य अभिनेता सुनील ग्रोवर यांच्या सोबत ''मैड - मेड इन इंडिया'' या कार्यक्रमात त्यांची भूमिका होती. यांच्या व्यतिरिक्त ''हसा चटकफू'', "घडलंय बिघडलंय", "आपण यांना हसलात का?" आणि "बा, बहू और बेबी" या मालिकेत ही त्यांनी काम केले आहे.

त्यांचा ''शासन'' हा चित्रपट येत्या २२ ऑक्टोबर ला प्रदर्शित होतोय.

Friday, 22 May 2015

''अग बाई अरेच्या २'' आणि ''पाशबंध''

आज ''अग बाई अरेच्या २'' आणि ''पाशबंध'' हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत. या दोन्ही चित्रपटात स्त्री केंद्रीय भूमिकेत आहे, हे विशेष.

आज केदार शिंदे दिग्दर्शित ''अग बाई अरेच्या २'' प्रदर्शित झाला, या चित्रपटात सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. या आधी केदार शिंदे यांनी ''अग बाई अरेच्या'', ''जत्रा'', ''यंदा कर्त्तव्य आहे'', ''माझा नवरा तुझी बायको'', ''मुक्काम पोस्ट लंडन'', ''याचा काही नेम नाही'', ''गलगले निघाले'', ''बकुला नामदेव घोटाळे'', ''इरादा पक्का'', ''ऑन ड्यूटी २४ तास'', ''खो खो'', ''श्रीमंत दामोदर पंत'' अशा दर्जेदार विनोदी चित्रपटाची मेजवानी मराठी प्रेक्षकांना दिली आहे. या चित्रपटांमधून त्याची भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्याबरोबर जोडी विशेष गाजली. हिंदी चित्रपटांनंतर सोनाली कुलकर्णी सध्या सातत्याने वेगवेगळ्या विषयावरच्या मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका करत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या रुपातील ''अग बाई अरेच्या २'' च्या पोस्टरना पसंतीची पावती मिळाली आहे.

आनंदराम दिग्दर्शित ''पाशबंध'' मध्ये ''एलिजाबेथ एकादशी'' फेम नंदिता धुरी यांची प्रमुख भूमिका आहे. ३० वर्षापुर्वी धुळे शहरात घडलेल्या सत्य घटनेवर हा मराठी चित्रपट आधारित आधारीत आहे.

किरण नाटकी