Showing posts with label bhau kadam. Show all posts
Showing posts with label bhau kadam. Show all posts

Saturday, 2 May 2015

''टाइमपास २'' चित्रपट समीक्षा

''टाइमपास २'' बद्दल सांगायचे असल्यास ''दोन घटका टाइमपास'' असे थोडक्यात वर्णन करता येईल.

''टाइमपास २'' मध्ये ''टाइमपास''चीच कथा पुढे सरकते. ऐनिमेशनच्या रूपाने सुरु झालेली चित्रपटाची कथा कुठेही रेंगाळत नाही. ''टाइमपास २''मध्ये शाब्दिक विनोदावर जास्त भर देण्यात आलाय, चुकीचे इंग्रजी उच्चारण चित्रपटाची बहुतेक पात्र करतात आणि हेच संवाद टाळ्या व हसे वसूल करतात. ''टाइमपास'' मध्ये हिट झालेले सर्व संवाद ''टाइमपास २''मध्येही ऐकायला मिळतात, त्यात विशेष नविन काही भर पडत नाही. कोकणात व मुंबईच्या समुद्र किनारी चित्रित केलेली गाणी व दृश्य प्रेक्षणीय झालेली आहेत. प्रियदर्शन जाधव व प्रिया जाधव यांनी आपले काम चोखपणे पार पाडले आहे. वैभव मांगळे व भाऊ कदम हि आपल्या भूमिकेत अगदी फिट बसले आहेत. विजु माने आपल्या छोट्या भूमिकेत प्रभावीत करतात. दगडू कुठले काम करून  श्रीमंत झालाय, तो नेमके कुठले काम करतो असे अनेक प्रश्न चित्रपट बघताना पडतात पण मसाला चित्रपटात जास्त डोके चालवायचे नसते फक्त जे समोर चालले आहे त्याचा आनंद घ्यायचा असतो. शेवटी प्राजु दगडूला मिळते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, व त्यासाठी तुम्हाला जवळच्या चित्रपट गृहात जाऊन टाइम पास बघावा लागेल.   

''टाइमपास'' मधील सर्व पात्र मनोरंजक पद्धतीने लिहिल्यात आली असून हॉलीवुडमध्ये ज्या प्रमाणे चित्रपटाच्या सीरीज बनवण्यात येतात त्याचप्रमाणे मराठीत ''टाइमपास'' सीरीज पुढील अनेक वर्षे मराठी चित्रपट सुष्टीत धमाल करेल यात मला काहीही शंका नाही. ''टाइमपास ३ '' केव्हा येतोय हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Wednesday, 29 April 2015

चला हवा येऊ दया

काल ''चला हवा येऊ दया'' या शो चे ७४ भाग पूर्ण झाले, आता ७५ व्या भागात काय धमाल होईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या शो मध्ये मागील ७४ भागात मराठीतील जवळपास सर्वच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. ''लई भारी'' चित्रपटाच्या निमित्ताने या ''चला हवा येऊ दया''ची सुरूवात करण्यात आली होती. ५० व्या भागात ''बाजी''च्या निमित्ताने श्रेयस तळपदे यांनी या शो मध्ये हजेरी लावली होती.

एका पेक्षा एक दर्जेदार कलावंतांची फौज व उत्फुर्त विनोद हि ह्या शो ची खास वैशिष्ट्ये आहे. निलेश साबळे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, विनीत बोंडे, श्रेया बुगडे, मानसी नाईक हे सर्व कलाकार प्रत्येक भागात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. सेलिब्रिटी बदलत जातात पण हे सर्व कलाकार अगदी प्रत्येक भागात धमाल करतात. कित्येकदा तर सेलिब्रिटी पेक्षा हेच कलाकार जास्त भाव जाऊन जातात, किंबहुना हे सर्वच कलाकार आता सेलिब्रिटी झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही. भारत गणेशपुरे यांनी रंगवलेला सरपंच, भाऊ कदम रंगवत असलेले डैडी, कुशल बद्रिके यांचा डायरेक्टर व सरपंचाचा मुलगा, सागर करंडे यांनी रंगवलेली स्त्री पात्रे, विनीत बोंडे यांचे छोटा मुलगा, श्रेया बुगडे यांनी रंगवलेले मिसेस बडबडे हे सर्व पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. तुषार देवल यांच्या उल्लेखाशिवाय हा लेख अपुरा आहे. त्यांचा ''जेम्स बैंड'' तर या शो ची जान आहे. शो च्या सुरवातीला प्रियदर्शन जाधव पण ''चला हवा येऊ दया'' मध्ये भुमिका करायचे पण त्यांना हा शो मध्येच सोडावा लागला. या शो मध्ये येणारे सेलेब्रिटी ही ''चला हवा येऊ दया'' चे नियमित प्रेक्षक व चाहते असल्याचे मान्य करतात.

''चला हवा येऊ दया''च्या निमित्ताने मराठी चित्रपट व नाटकांच्या प्रसिद्धीसाठी महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मराठी चित्रपटांची हवा करण्यात ''चला हवा येऊ दया'' महत्वाची भूमिका बजावत आहे. ''चला हवा येऊ दया'' चे सर्वच एपिसोड हिट आहेत पण ''डॉ प्रकाश बाबा आमटे''च्या निमित्ताने करण्यात आलेला नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या सोबतचा एपिसोड, टिम दुनियादारी, टिम हंटर सोबतचा एपिसोड माझे पर्सनल फेवरेट आहेत. ''चला हवा येऊ दया'' हा शो ''कॉमेडी नाइट्स विथ कपिल'' वर बेतलेला असल्याची या शो च्या चर्चा सुरवातीला होती. पण आपली ओळख निर्माण करण्यात हा शो पूर्णपणे यशस्वी झाला आहे.

टेलीविज़न सोबतच यूटुबवर सुद्धा या शो चे तितकेच दर्शक आहेत, हे येथे विषेश नमूद करायला हवे.

किरण नाटकी