आज (१८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! डॉ अमोल कोल्हे यांना स्टार प्रवाह वरील मालिका "राजा शिव छत्रपती" मध्ये छत्रपती महाराजांच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. सोबतच ते उत्तम निवेदक आणि वक्ते आहेत. ते शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत.
Showing posts with label anchor. Show all posts
Showing posts with label anchor. Show all posts
Tuesday, 18 October 2016
डॉ अमोल कोल्हे
आज (१८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! डॉ अमोल कोल्हे यांना स्टार प्रवाह वरील मालिका "राजा शिव छत्रपती" मध्ये छत्रपती महाराजांच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. सोबतच ते उत्तम निवेदक आणि वक्ते आहेत. ते शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत. Thursday, 30 June 2016
निलेश साबले
आज (३० जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते निलेश साबले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! निलेश साबळे यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले तरी सध्या ते अवघ्या महाराष्ट्रात विनोदाचे डॉक्टर म्हणून ओळखले जातात. ते पहिल्यांदा प्रकाश झोतात आले ते जी मराठी वरील "महाराष्ट्राचा सुपरस्टार" हा रियलिटी शो जिंकल्यानंतर. त्यानंतर त्यांनी "फु बाई फु" चे सूत्र संचालन केले आणि महाराष्ट्रातील घरा घरात पोहचले. त्यांनी आपल्या मिश्किल सूत्र संचालनाने सर्वांची मने जिंकली. "फु बाई फु" मध्ये त्यांनी अभिनय व लेखन कौशल्य ही दाखवले. त्यानंतर "चला हवा येऊ दया" या कार्यक्रमाच्या सूत्र संचालन आणि दिग्दर्शनामुळे खरोखरच महाराष्ट्राचे सुपर स्टार झाले.Monday, 4 April 2016
पल्लवी जोशी
आज (४ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी कला आणि व्यावसायिक चित्रपटात अभिनय केला आहे. त्यापैकी “अंधा युद्ध”, “आदमी सडक का”,
“तहलका”, “तृषाग्नी”, “दादा”, “पनाह”,
“बदला”, “मुजरीम”, “मेकिंग ऑफ
द महात्मा”, “रिटा”, “रिहाई”, “रुक्मावती की हवेली”,
“वंचित”, “वो छोकरी”, “सुरज
का सातवा घोडा” आणि “सौदागर” प्रमुख आहे. त्यापैकी त्या सूत्रसंचालक म्हणून पण प्रसिद्द आहेत. त्यांनी काही मालिकांची निर्मिती पण केली आहे.
Tuesday, 6 October 2015
रेणुका शहाणे
आज (७ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आमच्या बालपणीच्या आठवणी पैकी गोष्ट म्हणजे दर रविवारी लागणारी मालिका "सुरभि" आणि त्यात दिसणारे दोन हसरे चेहरे, त्यापैकी एक रेणुका शहाणे. त्या वेळेस ही मालिका अफाट लोकप्रिय झाली होती आणि या मालिकेची सूत्रसंचालिका रेणुका शहाणे सुद्धा. ''सर्कस" या दूरदर्शन वरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी शाहरुख़ खान यांच्या सोबत अभिनय केला होता. "हम आपके है कौन" या अत्यंत गाजलेल्या चित्रपटात आदर्श सुनेची भूमिका त्यांनी केली. त्यांची हि भूमिका इतकी लोकप्रिय झाली की आज हि त्यांना याच भूमिकेसाठी ओळखले जाते. रेणुका शहाणे यांनी ''रीटा" हा चित्रपट सुद्धा दिग्दर्शित केला आहे. त्या हिंदी चित्रपट अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. अलीकडे त्यांनी मराठी चित्रपटात पुनरागमन केले असून त्या ''भाकरवाडी ७ किमी", "जाणिवा" आणि "हायवे" या चित्रपटात दिसल्या आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...
