Showing posts with label fu bai fu. Show all posts
Showing posts with label fu bai fu. Show all posts

Thursday, 20 October 2016

अतुल तोडणकर

आज (२० ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अतुल तोडणकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! ते "फु बाई फु" या मराठी हास्य कार्यक्रमाचे विजेते ठरले. त्यांनी "थैंक्स माँ", "इरादा पक्का", "अकल्पित" आणि "व्हाट अबाउट सावरकर" या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.   



Thursday, 30 June 2016

निलेश साबले

आज (३० जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते निलेश साबले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! निलेश साबळे यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले तरी सध्या ते अवघ्या महाराष्ट्रात विनोदाचे डॉक्टर म्हणून ओळखले जातात. ते पहिल्यांदा प्रकाश झोतात आले ते जी मराठी वरील "महाराष्ट्राचा सुपरस्टार" हा रियलिटी शो जिंकल्यानंतर. त्यानंतर त्यांनी "फु बाई फु" चे सूत्र संचालन केले आणि महाराष्ट्रातील घरा घरात पोहचले. त्यांनी आपल्या मिश्किल सूत्र संचालनाने सर्वांची मने जिंकली. "फु बाई फु" मध्ये त्यांनी अभिनय व लेखन कौशल्य ही दाखवले. त्यानंतर "चला हवा येऊ दया" या कार्यक्रमाच्या सूत्र संचालन आणि दिग्दर्शनामुळे खरोखरच महाराष्ट्राचे सुपर स्टार झाले.

Friday, 29 April 2016

प्रियदर्शन जाधव

आज (२९ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रियदर्शन जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रियदर्शन जाधव हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी रवी जाधव यांच्या "टाईम पास" या चित्रपटाची कथा लिहिली होती  आणि या चित्रपटाच्या दुसर्या भागात थेट नायक म्हणून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. झी मराठीवरील "फु बाई फु" या कार्यक्रमात ही त्यांनी भाग घेतला होता. "चला हवा येऊ दया" च्या काही  भागांमध्ये पण त्यांनी अभिनय केला आहे.

Tuesday, 22 March 2016

विशाखा सुभेदार


आज (२२ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्या "फु बाई फु" या मालिकेतील त्यांच्या विनोदी अभिनयामुळे प्रकाशझोतात आल्या. त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका केल्या आहेत.   

Friday, 13 November 2015

अंशुमन विचारे

आज (१३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अंशुमन विचारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंशुमन विचारे यांनी खुप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे. दूरदर्शन वरील "चालता बोलता" आणि जी मराठी वरील "फु बाई फु" या कार्यक्रमातून ते घरा घरात पोहचले. "फु बाई फु" च्या एका पर्वाचे ते विजेते ठरले. त्यांनी "हंगामा", "स्वराज्य - मराठी पाऊल पडते पुढे", "संघर्ष", "पोस्टर बॉयज" आणि "परतु" या चित्रपटातून अभिनय केला आहे.

किरण नाटकी