Showing posts with label Poshter Boyz. Show all posts
Showing posts with label Poshter Boyz. Show all posts

Sunday, 3 April 2016

हृषिकेश जोशी

आज (३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हृषिकेश जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे हृषिकेश जोशी. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका हे ते वेगळ्या पध्दतीने करतात. त्यांनी "आजचा दिवस माझा", "अग बाई अरेच्या ", "आजोबा", "अतिथि तुम कब जाओगे?", "भारतीय ", "दे धक्का", "देऊळ", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "मसाला", "निशानी डा वा अंगठा ", "पोश्टर बॉयज " आणि "येलो" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.hrishikeshjoshi.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता. 

Monday, 25 January 2016

पूजा सावंत

आज (२५ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री पूजा सावंत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! पूजा सावंत यांनी २०१० साली सचित पाटिल दिग्दर्शित "क्षणभर विश्रांती" या चित्रपटातून पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत खुप कमी वेळात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असून मराठी चित्रपटांमधील आघाडीच्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबत चित्रपट केले आहेत. 

पूजा सावंत यांनी अभिनय केलेले चित्रपट
  • क्षणभर विश्रांती (२०१०)
  • आता ग बया (२०११)
  • झकास (२०११)
  • सतरंगी रे (२०१२)
  • पोश्टर बॉयज (२०१४)
  • गोंदण (२०१४) 
  • सांगतो ऐका (२०१४)
  • साट लोट पण सगळ खोट (२०१५)
  • नीलकंठ मास्टर (२०१५)
  • दगडी चाळ (२०१५)
  • वृंदावन (२०१५)

Friday, 13 November 2015

अंशुमन विचारे

आज (१३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अंशुमन विचारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंशुमन विचारे यांनी खुप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे. दूरदर्शन वरील "चालता बोलता" आणि जी मराठी वरील "फु बाई फु" या कार्यक्रमातून ते घरा घरात पोहचले. "फु बाई फु" च्या एका पर्वाचे ते विजेते ठरले. त्यांनी "हंगामा", "स्वराज्य - मराठी पाऊल पडते पुढे", "संघर्ष", "पोस्टर बॉयज" आणि "परतु" या चित्रपटातून अभिनय केला आहे.

किरण नाटकी