आज (३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हृषिकेश जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे हृषिकेश जोशी. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका हे ते वेगळ्या पध्दतीने करतात. त्यांनी "आजचा दिवस माझा", "अग बाई अरेच्या ", "आजोबा", "अतिथि तुम कब जाओगे?", "भारतीय ", "दे धक्का", "देऊळ", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "मसाला", "निशानी डा वा अंगठा ", "पोश्टर बॉयज " आणि "येलो" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.hrishikeshjoshi.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.
Showing posts with label yellow. Show all posts
Showing posts with label yellow. Show all posts
Sunday, 3 April 2016
हृषिकेश जोशी
आज (३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हृषिकेश जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे हृषिकेश जोशी. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका हे ते वेगळ्या पध्दतीने करतात. त्यांनी "आजचा दिवस माझा", "अग बाई अरेच्या ", "आजोबा", "अतिथि तुम कब जाओगे?", "भारतीय ", "दे धक्का", "देऊळ", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "मसाला", "निशानी डा वा अंगठा ", "पोश्टर बॉयज " आणि "येलो" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.hrishikeshjoshi.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता. Friday, 2 October 2015
कौशल ईमानदार
आज (२ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक कौशल ईमानदार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
कौशल ईमानदार हे त्यांच्या सुमधुर संगीतासाठी ओळखले जातात. पंडित सत्यशील देशपांडे यांच्या कडून त्यांनी संगीताचे धडे घेतले आहेत. कौशल ईमानदार यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या "मराठी अभिमान गीता"ने एक नवीन विश्वविक्रम केला. कौशल ईमानदार यांनी अनेक मलिकांच्या शीर्षक गीतांना संगीत आणि पार्श्वसंगीत दिले. त्यांनी "येलो", "पितृऋण", "संशय कल्लोल", "अजिंठा", "बालगंधर्व" आणि "नॉट ओनली मिसेस राऊत" या मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. मालिका व चित्रपट संगीताच्या सोबतच त्यांचे अनेक संगीत अल्बम्स प्रकाशित झालेले आहेत.
Saturday, 22 August 2015
''गणवेश''च्या निमित्ताने
सध्या अतुल जगदाळे दिग्दर्शित ''गणवेश'' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल जगदाळे दिग्दर्शनामध्ये पदार्पण करीत आहेत. वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूराच्या मुलाला गणवेशासाठी काय संघर्ष करावा लागतो याची कथा ''गणवेश'' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटात किशोर कदम, स्मिता ताम्बे आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागील काही वर्षात छायाचित्रकार ते दिग्दर्शक असा प्रवास केलेल्या छायाचित्रकारांमध्ये संजय जाधव, महेश लिमये, लक्ष्मण उतेकर, अविनाश अरुण, राहुल जाधव आणि केदार गायकवाड प्रमुख आहेत.
संजय जाधव तर सातत्याने ''चेकमेट'', ''रींगा रींगा'', ''फक्त लढ म्हणा'', ''दुनियादारी'' आणि ''प्यारवाली लव स्टोरी'' असे यशस्वी चित्रपट देऊन मराठी चित्रपट सृष्टित आघाडीचे दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले आहे. त्यांच्या ''दुनियादारी'' या चित्रपटाने मराठी चित्रपटांमध्ये नविन विक्रम निर्माण केले. त्यांचा आगामी ''तू ही रे'' हा चित्रपट येत्या सप्टेम्बर महिन्यात प्रदर्शित होतोय. या चित्रपटात प्रेक्षकांची आवडती जोडी स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत आहे.
''उत्तरायण'', ''कॉर्पोरेट'', ''ट्रैफिक सिंगल'', ''फैशन'', ''दबंग'', ''नटरंग'', ''बालगंधर्व'', ''बालक पालक'' आणि ''हिरोइन'' अश्या गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटाचे छायाचित्रकार महेश लिमये यांनी मागील वर्षी अप्रैल २०१४ मध्ये ''येलो'' हा अतिशय वेगळा विषय असलेला चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षक दोघांची कौतुकाची पावती मिळाली. गौरी गाडगीळ, मृणाल कुलकर्णी, उपेन्द्र लिमये आणि ऋषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष जूरी पुरस्कार मिळाला होता. तर चित्रपटाची नायिका गौरी गाडगीळ व संजना रॉय यांना विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला होता.
''ब्लू'', ''इंग्लिश विंग्लिश'', ''बॉस'', ''लेकर हम दिवाना दिल'' आणि ''तेवर'' या हिंदी चित्रपटांचे छायाचित्रकार लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला मराठी चित्रपट ''टपाल'' मागील वर्षी सप्टेम्बर २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. नंदू माधव व वीणा जामकर अभिनीत ''टपाल'' नंतर आता ''लालबागची राणी'' हा त्यांचा नवीन मराठी चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटिला येत आहेत.
युवा छायाचित्रकार अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेल्या ''किल्ला'' या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये ''सर्वोकृष्ट मराठी चित्रपट'' म्हणून गौरवण्यात आले. हा चित्रपट या वर्षी जून महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी कोकणात घडणारी कथा अतिशय सुंदरपणे साकारली होती.
लहान मुलांच्या तरल भावविश्वाचे दर्शन करवणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात तीन कोटींची कमाई करून आशयघन चित्रपट चांगली कमाई करू शकत नाही हा समज खोटा ठरविला.
छायाचित्रकार राहुल जाधव यांचा ''मर्डर मेस्ट्री'' हा चित्रपट या वर्षी जुलाई महिन्यात प्रदर्शित झाला. ''विजय असो'' आणि ''हैलो नंदन'' नंतर हा त्यांचा तीसरा चित्रपट होता. हिंदीतील प्रसिद्द निर्माता नाडीयाडवाला
यांची निर्मिती असलेल्या ''मर्डर मेस्ट्री'' ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
जुलाई महिन्यातच प्रदर्शित झालेल्या ''ऑनलाईन बिनलाईन'' च्या निमित्ताने केदार गायकवाड यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. सिद्धार्थ चांदेकर व हेमंत ढोमे अभिनीत या चित्रपटातून आजच्या युवा पिढीची सोशल मीडिया विषयी असलेली क्रेज असा विषय मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांनी गौरवले पण मराठी चित्रपटाच्या भाऊगर्दी मुळे या चित्रपटाला नुकसान सोसावे लागले.
२०१४ व २०१५ या वर्षात छायाचित्रकारांनी दिग्दर्शनात पदार्पण करून नवनवीन विषय संवेदनशीलपणे हाताळले. त्यांच्या चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळाली, प्रेक्षकांचे व समीक्षकांचे कौतुक मिळाले. अशाच प्रकारे येणाऱ्या काळात ही आपल्याला त्यांच्या कडून नवनवीन प्रयोग बघायला मिळतील अशी अपेक्षा करुया. छायाचित्रकारांनी दिग्दर्शित केलेले सर्वच चित्रपट यशस्वी झाले असे नाही मात्र ते चित्रपट देखणे होते हे मात्र नक्की !!!!
Thursday, 25 December 2014
२०१४ ची मराठी चित्रपट सृष्टि
२०१४ वर्ष मराठी चित्रपट सृष्टिसाठी अतिशय आशादायक व प्रयोगशील वर्ष राहिले. या वर्षी मराठी चित्रपटांमध्ये अनेक नवे प्रयोग झाले, अनेक चित्रपटांनी टिकिट खिडकीवर चांगली कमाई केली, नविन दमाच्या दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांनी मराठीत पदार्पण केले, हिंदी चित्रपट कलाकारांचा मराठीत वावर वाढला. या वर्षी अनेक मराठी चित्रपटांना राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार प्राप्त झाले.
महिला दिग्दर्शक व निर्मात्या यांचा वाढता वावर हे ही या वर्षीच्या मराठी चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे.
या वर्षी जनवरी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''टाइमपास''ने मराठी चित्रपटाची यशस्वी सुरवात केली. रवी जाधव यांनी नटरंग, बालगन्धर्व, बालक पालक नंतर टाइमपासच्या निमित्ताने हिट चित्रपटांचा चौकार मारला. टाइमपास चा ''नया है वह'' या संवादाने अगदी धमाल उडवून दिली.
फरवरी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''फंड्री''ने समीक्षक व प्रेक्षक दोघांना भारावून सोडले. नागराज मंजुळे या नवीन दमाच्या दिग्दर्शकाने पहिल्याच चित्रपटात सर्वांना आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याने चकित केले.
मार्च मध्ये ३ राष्ट्रीय पुरस्कार विजेता, शिवाजी लोटन पाटिल दिग्दर्शित ''धग'' प्रदर्शित झाला.
अप्रिल मध्ये हिंदी चित्रपटांमधील यशस्वी छायाचित्रकार महेश लिमये दिग्दर्शित ''येलो'' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला.
मे महिन्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ''दूसरी गोष्ट'' हा राजकीयपट प्रदर्शित झाला. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ''एक हजाराची नोट'' या चित्रपटाने अनेक पुरस्कार प्राप्त केले. याच महिन्यात ''शाळा'' फेम सुजय डहाके यांचा उर्मिला मार्तोंडकर दिग्दर्शित ''आजोबा'' हा बहु-प्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला.
जुलाई महिन्यात रीतेश देशमुख अभिनीत व निशिकांत कामत दिग्दर्शित ''लय भारी'' प्रदर्शित झाला. पहिल्यांदाच रीतेश देशमुख यांची मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका, निशिकांत कामत यांचे दिग्दर्शन व अजय अतुल यांचे संगीत यामुळे ''लय भारी'' यशस्वी ठरला.
ऑगस्ट महिन्यात अस्तु, पोस्टर बॉयज़, रमा माधव, रेगे असे वेग वेगळया विषयावरचे लक्षवेधी चित्रपट प्रदर्शित झाले. रवि जाधव प्रस्तुत व अभिजीत पानसे दिग्दर्शित ''रेगे'' या चित्रपटाने वेगळा विषय व ट्रिटमेंटमुळे अतिशय चांगली कमाई केली.
सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेले नटी, बावरे प्रेम हे व टपाल हे त्यांच्या वेगळ्या विषयांमुळे चर्चेत राहिले.
ऑक्टोबर महिन्यात सचिन पिळगावकर व सतीश राजवाडे या जोडीचा ''सांगतो ऐका'' प्रदर्शित झाला. याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''डॉ प्रकाश बाबा आमटे'' या समृद्धि पोरे दिग्दर्शित चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टि मध्ये नवा इतिहास घडवला. डॉ प्रकाश बाबा आमटे यांची सत्यकथा, नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय यामुळे हा चित्रपट सुपर हिट ठरला. ''गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा'' विनोदी राजकीयपटाचा सीक्वल ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' नावाने प्रदर्शित झाला.
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या संजय जाधव दिग्दर्शित ''प्यार वाली लव स्टोरी'' सुद्धा या वर्षी यशस्वी चित्रपटांमध्ये मध्ये आपले स्थान बनवू शकला.
नवंबर महिन्यात प्रदर्शित झालेले परेश मोकाशी यांचा ''एलिज़ाबेथ एकादशी'', सचिन कुंडलकर यांचा ''हैप्पी जर्नी'', गजेन्द्र अहिरे यांचा ''स्वामी पब्लिक लिमिटेड'', विषय व दिग्दर्शनामुळे चर्चेत राहिले.
दिसम्बर महिन्यात मध्यमवर्ग, प्रेमासाठी कमिंग सून, मिस मैच प्रदर्शित झाले.
महिला दिग्दर्शक व निर्मात्या यांचा वाढता वावर हे ही या वर्षीच्या मराठी चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे.
या वर्षी जनवरी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''टाइमपास''ने मराठी चित्रपटाची यशस्वी सुरवात केली. रवी जाधव यांनी नटरंग, बालगन्धर्व, बालक पालक नंतर टाइमपासच्या निमित्ताने हिट चित्रपटांचा चौकार मारला. टाइमपास चा ''नया है वह'' या संवादाने अगदी धमाल उडवून दिली. फरवरी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''फंड्री''ने समीक्षक व प्रेक्षक दोघांना भारावून सोडले. नागराज मंजुळे या नवीन दमाच्या दिग्दर्शकाने पहिल्याच चित्रपटात सर्वांना आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याने चकित केले.
मार्च मध्ये ३ राष्ट्रीय पुरस्कार विजेता, शिवाजी लोटन पाटिल दिग्दर्शित ''धग'' प्रदर्शित झाला.
अप्रिल मध्ये हिंदी चित्रपटांमधील यशस्वी छायाचित्रकार महेश लिमये दिग्दर्शित ''येलो'' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला.
मे महिन्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ''दूसरी गोष्ट'' हा राजकीयपट प्रदर्शित झाला. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ''एक हजाराची नोट'' या चित्रपटाने अनेक पुरस्कार प्राप्त केले. याच महिन्यात ''शाळा'' फेम सुजय डहाके यांचा उर्मिला मार्तोंडकर दिग्दर्शित ''आजोबा'' हा बहु-प्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला.
जुलाई महिन्यात रीतेश देशमुख अभिनीत व निशिकांत कामत दिग्दर्शित ''लय भारी'' प्रदर्शित झाला. पहिल्यांदाच रीतेश देशमुख यांची मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका, निशिकांत कामत यांचे दिग्दर्शन व अजय अतुल यांचे संगीत यामुळे ''लय भारी'' यशस्वी ठरला.
ऑगस्ट महिन्यात अस्तु, पोस्टर बॉयज़, रमा माधव, रेगे असे वेग वेगळया विषयावरचे लक्षवेधी चित्रपट प्रदर्शित झाले. रवि जाधव प्रस्तुत व अभिजीत पानसे दिग्दर्शित ''रेगे'' या चित्रपटाने वेगळा विषय व ट्रिटमेंटमुळे अतिशय चांगली कमाई केली.
सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेले नटी, बावरे प्रेम हे व टपाल हे त्यांच्या वेगळ्या विषयांमुळे चर्चेत राहिले.
ऑक्टोबर महिन्यात सचिन पिळगावकर व सतीश राजवाडे या जोडीचा ''सांगतो ऐका'' प्रदर्शित झाला. याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''डॉ प्रकाश बाबा आमटे'' या समृद्धि पोरे दिग्दर्शित चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टि मध्ये नवा इतिहास घडवला. डॉ प्रकाश बाबा आमटे यांची सत्यकथा, नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय यामुळे हा चित्रपट सुपर हिट ठरला. ''गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा'' विनोदी राजकीयपटाचा सीक्वल ''पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'' नावाने प्रदर्शित झाला.
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या संजय जाधव दिग्दर्शित ''प्यार वाली लव स्टोरी'' सुद्धा या वर्षी यशस्वी चित्रपटांमध्ये मध्ये आपले स्थान बनवू शकला.
नवंबर महिन्यात प्रदर्शित झालेले परेश मोकाशी यांचा ''एलिज़ाबेथ एकादशी'', सचिन कुंडलकर यांचा ''हैप्पी जर्नी'', गजेन्द्र अहिरे यांचा ''स्वामी पब्लिक लिमिटेड'', विषय व दिग्दर्शनामुळे चर्चेत राहिले.
दिसम्बर महिन्यात मध्यमवर्ग, प्रेमासाठी कमिंग सून, मिस मैच प्रदर्शित झाले.
Sunday, 7 December 2014
''रीमिक्स'' टाईटल्सचा जमाना
सध्या मराठी चित्रपटांच्या नावांमध्ये इंग्लिश आणि हिंदी वापरण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. ह्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला चित्रपट ''कैंडल मार्च'' असो किंवा मागील काही महिन्यात प्रदर्शित झालेले ''हैप्पी जर्नी'', ''पोस्टर बॉयज़'', ''येलो'', ''टाइम पास'' असो. इंग्लिश टाईटल्सची सध्या मराठी मध्ये चलती आहे, हेच न्हणावे लागेल. इंग्लिश टाईटल्सच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''मिस मैच'', ''लव फैक्टर'', ''आई पि एल'', ''क्लासमेट्स''चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
इंग्लिश आणि हिंदी सोबतच एक नवा प्रकार उदयास आला आहे, तो न्हणजे रीमिक्स टाईटल्सचा. मराठी, हिंदी आणि इंग्लिश पैकी कोणत्याही दोन भाषा वापरून तयार केलेल्या टाईटल्सला आपण रीमिक्स टाईटल न्हणु शकतो. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रीमिक्स टाईटल्स मराठी चित्रपटांमध्ये ''स्वामी पब्लिक लिमिटेड'', ''एलिज़ाबेथ एकादशी'', ''बोल बेबी बोल'', ''प्यारवाली लव स्टोरी'', ''इश्क़ वाला लव'', ''पुणे वाया बिहार'' नाव घेता येईल. अश्या रीमिक्स टाईटल्सच्या येणाऱ्या मराठी चित्रपटामध्ये ''प्रेमासाठी कमिंग सून'', ''७ रोशन विला'', ''बाइकर्स अड्डा''चे नाव प्रामुख्याने घेता येईल.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...