Showing posts with label balgandharv. Show all posts
Showing posts with label balgandharv. Show all posts

Monday, 9 November 2015

सुबोध भावे

आज (९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुबोध भावे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

सुबोध भावे यांनी चित्रपट, नाटक आणि टिवी मालिका या तिन्ही क्षेत्रात अभिनय केला आहे. सुबोध भावे यांनी "लोकमान्य - एक युगपुरुष" आणि "बालगंधर्व" या चित्रपटात लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व यांची भूमिका साकारली. या दोन्ही  चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. येत्या दिवाळीमध्ये १२ नवंबरला ''कट्यार काळजात घुसली" या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. 

सुबोध भावे यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • कट्यार काळजात घुसली  (२०१५)
  • लोकमान्य - एक युगपुरुष (२०१५ )
  • स्वामी पब्लिक लिमिटेड (२०१४)
  • अनुमती (२०१३)
  • टूरिंग टॉकीज (२०१३)
  • बालक-पालक (बी.पी.) (२०१३)
  • झाले मोकळी आकाश (२०१३)
  • अय्या (हिंदी) (२०१२)
  • भारतीय (२०१२)
  • चिंटू (२०१२)
  • पाऊलवाट (२०११)
  • बालगंधर्व (२०११)
  • झाले मोकळे आकाश (२०१०)
  • ती रात्र (२०१०)
  • रानभूल (२०१०)
  • लाडीगोडी (२०१०)
  • हापूस (२०१०)
  • पाश (२०१०)
  • कथा तिच्या लग्नाची (२००९)
  • त्या रात्री पाऊस होता (२००९)
  • क्षणोक्षणी (२००९)
  • उलाढाल (२००८)
  • एक डाव धोबी पछाड (२००८)
  • मन पाखरू पाखरू (२००८)
  • सखी (२००८)
  • सनई चौघडे (२००८)
  • आव्हान (२००७)
  • माझी आई (२००७)
  • श्री सिद्धीविनायक महिमा (२००७)
  • मिशन चॅम्पियन (२००७)
  • आईशपथ (२००६)
  • क्षण (२००६)
  • मोहत्यांची रेणुका (२००६)
  • लालबागचा राजा (२००६)
  • आम्ही असू लाडके (२००५)
  • कवडसे (२००५)
  • मी तुझी तुजीच रे (२००५)
  • सत्तेसाठी काहीही (२००३)
  • ध्यासपर्व (२००१)
  • वीर सावरकर (२००१)
  • संत बसवेश्वर (१९९०)

Friday, 2 October 2015

कौशल ईमानदार

आज (२ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक कौशल ईमानदार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

कौशल ईमानदार हे त्यांच्या सुमधुर संगीतासाठी ओळखले जातात. पंडित सत्यशील देशपांडे यांच्या कडून त्यांनी संगीताचे धडे घेतले आहेत. कौशल ईमानदार यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या "मराठी अभिमान गीता"ने एक नवीन विश्वविक्रम केला. कौशल ईमानदार यांनी अनेक मलिकांच्या शीर्षक गीतांना संगीत आणि पार्श्वसंगीत दिले. त्यांनी "येलो", "पितृऋण", "संशय कल्लोल", "अजिंठा", "बालगंधर्व" आणि "नॉट ओनली मिसेस राऊत" या मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. मालिका व चित्रपट संगीताच्या सोबतच त्यांचे अनेक संगीत अल्बम्स प्रकाशित झालेले आहेत.

Tuesday, 22 September 2015

रवी जाधव

आज (२२ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी २०१० साली ''नटरंग'' चित्रपट दिग्दर्शित करून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिळाला, त्यांना सर्वोकृष्ट दिग्दर्शासाठी जी गौरव पुरस्कार देण्यात आला.  यासोबतच अनेक चित्रपट सोहळ्यांमध्ये "नटरंग''ला अनेक पुरस्कार मिळाले. ''नटरंग''ने टिकिट खिडकीवर सुद्धा तूफान गर्दी खेचली. दिग्दर्शन, अभिनय, संगीत, नृत्य अशा सगळ्यालाच अंगासाठी ''नटरंग''चा गौरव करण्यात आला. त्यामुळे पदर्पणातच त्यांनी स्टार दिग्दर्शक अशी ओळख निर्माण केली व ती "बालगंधर्व", "बालक पालक", "टाईमपास", "टाईमपास २" आणि "बायस्कोप (मित्रा)" अशी वाढत गेली.

आता रवी जाधव हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते सध्या ''बैंजो'' या त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटावर काम करत आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.ravijadhav.com या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता.

Saturday, 3 January 2015

लोकमान्य - एक युगपुरुष

काल ओम राऊत दिग्दर्शित व सुबोध भावे अभिनीत बहु-प्रतिक्षित चित्रपट ''लोकमान्य - एक युगपुरुष'' प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाविषयी लोकांमध्ये औत्सुक्य होते, सोबतच या चित्रपटाचे प्रोमोशन्स ही दणक्यात करण्यात आले. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर त्याला ५ लाखापेक्षा अधिक हिट्स मिळाले होते. या वरूनच या चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता लक्षात येते. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत अाहे.

या आधी सुबोध भावे यांनी रवी जाधव यांच्या ''बालगंधर्व'' या चित्रपटात बालगंधर्व यांची शीर्षक भुमिका केली होती. त्यानंतर आता ते लोकमान्य टिळक यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येत आहे   . 

किरण नाटकी