Showing posts with label marathi movie this week. Show all posts
Showing posts with label marathi movie this week. Show all posts

Thursday, 5 November 2015

वीरात वीर मराठा

आज "वीरात वीर मराठा" हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. अमोल भावे दिग्दर्शित या चित्रपटात आर्य जीत, तन्वी किशोर, रीमा लागू, हरीश सावंत आणि दया यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा एक्शन पट आहे. अमोल भावे यांनी या आधी "उचला रे उचला" आणि "पटल तर घ्या" हे दोन मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहे.  

पुढील आठवड्यात "मुंबई पुणे मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली" हे दोन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

Wednesday, 4 March 2015

कट्टी बट्टी

उद्या ''कट्टी बट्टी'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेंद्र पवार असून या चित्रपटाच्या निमित्ताने एक आगळी वेगळी लव-स्टोरी मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नायक व नायिका नवोदित कलाकार असून त्यांना अरुण नलावडे , विलास उजवणे या सारख्या जेष्ठ कलाकारांची साथ मिळाली आहे.

Sunday, 22 February 2015

चित्रफित ३.० मेगा पिक्सेल

ह्या आठवड्यात ''चित्रफित ३.० मेगा पिक्सेल'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दिवाकर घोडके दिग्दर्शित हा त्याच्या बोल्ड पोस्टर्स मुळे चर्चित आहे. सध्या वेगवेगळया विषयवार मराठी चित्रपटाची निर्मिति केल्या जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी मध्ये बोल्ड चित्रपट प्रदर्शित झाला आहे.   

Saturday, 3 January 2015

लोकमान्य - एक युगपुरुष

काल ओम राऊत दिग्दर्शित व सुबोध भावे अभिनीत बहु-प्रतिक्षित चित्रपट ''लोकमान्य - एक युगपुरुष'' प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाविषयी लोकांमध्ये औत्सुक्य होते, सोबतच या चित्रपटाचे प्रोमोशन्स ही दणक्यात करण्यात आले. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर त्याला ५ लाखापेक्षा अधिक हिट्स मिळाले होते. या वरूनच या चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता लक्षात येते. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत अाहे.

या आधी सुबोध भावे यांनी रवी जाधव यांच्या ''बालगंधर्व'' या चित्रपटात बालगंधर्व यांची शीर्षक भुमिका केली होती. त्यानंतर आता ते लोकमान्य टिळक यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येत आहे   . 

Friday, 21 November 2014

''विटी दांडू'' आणि ''मामाच्या गावाला जाऊया''

आज दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत ''विटी दांडू'' आणि ''मामाच्या गावाला जाऊया''.

''विटी दांडू'' ही स्वत्रंतपूर्व काळातील नातू व आजोबा यांच्या नाते सम्बन्धावर आधारित गोष्ट असून या चित्रपटात आजोबाची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी साकारली आहे. गणेश कदम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले अाहे. अजय देवगण फिल्म्स या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे.

आज प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''मामाच्या गावाला जाऊया'' हा पूर्णपणे जंगलात निर्मित पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर हेमंत जोशी यांनी केलेले आहे. मामाच्या गावाला जाणे याचा अर्थ धमाल, मौजमजा असा असतो त्यामुळे ''मामाच्या गावाला जाऊया'' हे शीर्षक नक्कीच प्रेक्षकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा करुया.

''डॉ प्रकाश बाबा आमटे'' या चित्रपटाला सहाव्या आठवड्यात ही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय व मागच्या आठवड्यात प्रदर्शित ''एलिजाबेथ एकादशी''ला ही प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे त्यामुळे या चित्रपटाशी आज प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना स्पर्धा करावी लागणार आहे. पुढील आठवड्यात ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' व  ''हैप्पी जर्नी'' हे दोन  बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहेत.    

किरण नाटकी