Showing posts with label dilip prabhalkar. Show all posts
Showing posts with label dilip prabhalkar. Show all posts

Wednesday, 5 August 2015

दिलीप प्रभावळकर

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा काल वाढदिवस होता. नाट्य, चित्रपट व मालिका या अभिनयाच्या सर्वच क्षेत्रात संचार करणाऱ्या या दिलीप सरांना आमच्या तर्फे वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …. 

दिलीप प्रभावळकर यांचे चित्रपट 

  • चिमणराव गुंड्याभाऊ (1979)
  • एक डाव भुताचा (1981)
  • छक्के पंजे (1985)
  • झाकली मुठ सव्वालाखाची (1986)
  • धरलं तर चावतंय (1990)
  • चौकट राजा (1991)
  • एक होता विदुषक (1992)
  • झपाटलेला ( 1993)
  • आपली माणसे (1993)
  • बेकाबू (1994)
  • कथा दोन गणपतरावांची (1996)
  • सरकारनामा (1997)
  • रात्र-आरंभ (1999)
  • आधारस्तंभ (2002)
  • एन-काउंटर दी किलर (2002)
  • चुपके से (2003)
  • गॉड ओन्ली नोज (2003)
  • पछाडलेला (2004)
  • अगबाई अरेच्चा (2004)
  • फोनेक्स (2005)
  • कवडसे (2005)
  • पहेली (2005)
  • लगे रहो मुन्नाभाई (2006)
  • शिवा (2006)


दिलीप प्रभावळकर यांची नाटके 

  • अलबत्या खलबत्या (1972)
  • आरण्यक (1974)
  • पोट्रेट (1977)
  • सूर्याची पिल्ले (1978)
  • पळा पळा कोण पुढे पळेल तो (1983)
  • विठ्ठला (1985)
  • वासूची सासू (1987)
  • एका जून्या वर्षी (1988)
  • नातीगोती (1989)
  • घर तिघांचे हवे (1990)
  • एक हाती मुलगी (1990)
  • हसवाफसवी (1991)
  • कलम 302 (1991)
  • संध्याछाया (1993)
  • जावई माझा भला (1994)
  • चुक भूल द्यावी घ्यावी (1996)
  • बटाट्याची चाळ (2001)
  • नांदा सौख्य भरे (2001)
  • वाटचाल (2004)
  • अप्पा आणि बाप्पा (2005)

दिलीप प्रभावळकर यांच्या मालिका 

  • चिमणराव (1977)
  • झोपी गेलेला जागा झाला (1986)
  • काम फत्ते (1987)
  • चिरंजीव (1989 )
  • नो प्रॉब्लेम (1989)
  • बेरीज वजाबाकी (1990)
  • एका हाताची टाळी
  • राजा राजा
  • कथानी (1992)
  • साळसूद (1997)
  • नॉक नॉक कौन है (1998)
  • छोटा मुह और बडी बात (1998)
  • अपना अपना स्टाईल हिंदी (2000)
  • घरकूल (2000)
  • टूरटूर
  • श्रीयुत गंगाधर टिपरे (2001)

Sunday, 22 March 2015

''हंटर''च्या निमित्ताने

सध्या ''हंटर'' या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर व राधिका आपटे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचे नाव चर्चेत आहे. सई ताम्हणकर यांनी आपल्या करियरच्या सुरवातीपासूनच या आधी ''गजनी'' व ''ब्लैक एंड व्हाईट'' या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तर राधिका आपटे यांनी मराठी सोबतच हिंदी, बंगाली, तेलगू, तामील आणि मल्यालम अशा विविध भाषिक चित्रपटांमधून अभिनय केला आहे. मराठी मुलाची गोष्ट असल्यामुळे साहजिकच ''हंटर''मध्ये सई ताम्हणकर व राधिका आपटे यांच्यासोबतच हंटर मध्ये रविन्द्र मंकणी, नीना कुलकर्णी, ज्योति सुभाष आणि विवेक तत्ववादी अशी मराठी कलाकारांचा अभिनय बघायला मिळणार आहे. अलीकडे प्रदर्शित झालेल्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका होत्या, अनुराग कश्यप दिग्दर्शित ''अग्ली'' मध्ये गिरीश कुलकर्णी यांच्या भूमिकेची सकारात्मक दखल सर्वच समीक्षकांनी घेतली होती. ''अब तक छप्पन २'' मध्ये तर नाना पाटेकर यांच्या सोबतच विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर व ऋषिकेश जोशी अशी दमदार मराठी कलाकारांची फौजच होती. सध्या बॉलीवुड मध्ये मराठी कलाकारांची चलती आहे असेच न्हणावे लागेल.      

ज्याप्रमाणे सध्या दर दुसऱ्या किवा तिसऱ्या मराठी चित्रपटात बॉलीवुडमधील कलाकार दिसून येतात त्याच प्रमाणे बॉलीवुडमध्ये सध्या मराठी कलाकार दिसून येत आहेत. मागे एका मराठी अभिनेत्रीने तिच्या मुलाखतीत ''बॉलीवुड मध्ये छोटया भूमिकेसाठीही खुप चांगले पैसे मिळतात'' असे सांगितल्याचे आठवते. बॉलीवुड मध्ये काम करणारे अनेक मराठी कलाकार आहेत पण मराठी हीरो मात्र बॉलीवुडमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच आहेत.

पूर्वी लक्ष्मण बर्डे सारखे मराठी सुपरस्टार हिंदी मध्ये चरित्र कलाकाराच्या भूमिका करायचे तर त्यांच्यावर टिका व्हायची. अशोक सराफ मात्र मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही नियमितपणे सक्रिय राहिले. मराठी व हिंदी दोन्ही ठिकाणी नियमितपणे सक्रिय असलेल्या मराठी कलाकारांमध्ये सचिन पिळगावकर, सदाशिव अमरापुरकर, रमेश देव, विक्रम गोखले, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे, मोहन जोशी, शिवाजी साटम, विजय पाटकर, सचिन खेडेकर, अजिंक्य देव, संदीप कुलकर्णी, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, राजेश श्रृंगारपुरे, नागेश भोसले, अनंत जोग, यतिन कार्येकर, उदय टिकेकर, प्रसाद ओक यांची नावे ठळकपणे घेता येईल, हि यादी बरीच लांब आहे. मराठी व हिन्दी सोबतच अतुल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, महेश मांजरेकर व सयाजी शिंदे यांनी दाक्षिणात्य चित्रपटांतही बरेच नाव कमावले आहे. मराठी अभिनेत्यांप्रमाणे, मराठी अभिनेत्रीही हिंदी व इतर भाषिक चित्रपटात तितक्याच सामर्थ्यपणे कार्यरत आहेत, ''हंटर''च्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.  

महेश मांजरेकर निर्मित व दिग्दर्शित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक मराठी कलाकारांना संधी दिली आहे, त्यांच्या वास्तव, प्राण जाये पण शान ना जाये, जिस देश में गंगा रहता है, सिटी ऑफ़ गोल्ड सारख्या चित्रपटांमधून अनेक मराठी कलाकारांची फौज दिसते. सचिन कुंडलकर यांच्या ''अय्या'' मधून सुबोध भावे यांनी हिंदित डेब्यू केला होता. रोहित शेट्टी यांनी पण ''गोलमाल'' सीरीज व ''सिंघम'' सीरीज मध्ये श्रेयस तलपडे, सचिन खेडेकर, अश्विनी कळसेकर, सोनाली कुलकर्णी, जीतेन्द्र जोशी यांनी भूमिका केल्या आहेत.

Friday, 21 November 2014

''विटी दांडू'' आणि ''मामाच्या गावाला जाऊया''

आज दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत ''विटी दांडू'' आणि ''मामाच्या गावाला जाऊया''.

''विटी दांडू'' ही स्वत्रंतपूर्व काळातील नातू व आजोबा यांच्या नाते सम्बन्धावर आधारित गोष्ट असून या चित्रपटात आजोबाची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी साकारली आहे. गणेश कदम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले अाहे. अजय देवगण फिल्म्स या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे.

आज प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''मामाच्या गावाला जाऊया'' हा पूर्णपणे जंगलात निर्मित पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर हेमंत जोशी यांनी केलेले आहे. मामाच्या गावाला जाणे याचा अर्थ धमाल, मौजमजा असा असतो त्यामुळे ''मामाच्या गावाला जाऊया'' हे शीर्षक नक्कीच प्रेक्षकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा करुया.

''डॉ प्रकाश बाबा आमटे'' या चित्रपटाला सहाव्या आठवड्यात ही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय व मागच्या आठवड्यात प्रदर्शित ''एलिजाबेथ एकादशी''ला ही प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे त्यामुळे या चित्रपटाशी आज प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना स्पर्धा करावी लागणार आहे. पुढील आठवड्यात ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' व  ''हैप्पी जर्नी'' हे दोन  बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहेत.    

किरण नाटकी