आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रख्यात अभिनेत्री ज्योती सुभाष त्यांच्या आई आहेत. अमृता सुभाष यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. जी मराठी वरील "अवघाची संसार" या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी "श्वास", "चौसर", "देवराई", "नितळ", "बघ हात दाखवूया न", "बाधा", "सावली", "फिराक़", "वळु", "कॉन्ट्रैक्ट", "विहीर", "त्या रात्री पाऊस होता", "गंध", "हापुस", "मसाला", "अजिंठा", "बालक पालक", "चिड़िया" आणि "किल्ला" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. अभिनयासोबतच त्या पार्श्वगायन ही करतात. त्या लेखक सुद्धा आहेत. त्यांचे "एक उलट एक सुलट" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
Showing posts with label killa. Show all posts
Showing posts with label killa. Show all posts
Friday, 13 May 2016
अमृता सुभाष
आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रख्यात अभिनेत्री ज्योती सुभाष त्यांच्या आई आहेत. अमृता सुभाष यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. जी मराठी वरील "अवघाची संसार" या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी "श्वास", "चौसर", "देवराई", "नितळ", "बघ हात दाखवूया न", "बाधा", "सावली", "फिराक़", "वळु", "कॉन्ट्रैक्ट", "विहीर", "त्या रात्री पाऊस होता", "गंध", "हापुस", "मसाला", "अजिंठा", "बालक पालक", "चिड़िया" आणि "किल्ला" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. अभिनयासोबतच त्या पार्श्वगायन ही करतात. त्या लेखक सुद्धा आहेत. त्यांचे "एक उलट एक सुलट" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.Friday, 20 November 2015
अविनाश अरुण
आज (२० नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अविनाश अरुण यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! युवा छायाचित्रकार अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेल्या ''किल्ला'' या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये ''सर्वोकृष्ट मराठी चित्रपट'' म्हणून गौरवण्यात आले. हा चित्रपट मागील वर्षी जून महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी कोकणात घडणारी कथा अतिशय सुंदरपणे साकारली होती. लहान मुलांच्या तरल भावविश्वाचे दर्शन करवणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात तीन कोटींची कमाई करून आशयघन चित्रपट चांगली कमाई करू शकत नाही हा समज खोटा ठरविला.Saturday, 22 August 2015
''गणवेश''च्या निमित्ताने
सध्या अतुल जगदाळे दिग्दर्शित ''गणवेश'' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल जगदाळे दिग्दर्शनामध्ये पदार्पण करीत आहेत. वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूराच्या मुलाला गणवेशासाठी काय संघर्ष करावा लागतो याची कथा ''गणवेश'' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटात किशोर कदम, स्मिता ताम्बे आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागील काही वर्षात छायाचित्रकार ते दिग्दर्शक असा प्रवास केलेल्या छायाचित्रकारांमध्ये संजय जाधव, महेश लिमये, लक्ष्मण उतेकर, अविनाश अरुण, राहुल जाधव आणि केदार गायकवाड प्रमुख आहेत.
संजय जाधव तर सातत्याने ''चेकमेट'', ''रींगा रींगा'', ''फक्त लढ म्हणा'', ''दुनियादारी'' आणि ''प्यारवाली लव स्टोरी'' असे यशस्वी चित्रपट देऊन मराठी चित्रपट सृष्टित आघाडीचे दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले आहे. त्यांच्या ''दुनियादारी'' या चित्रपटाने मराठी चित्रपटांमध्ये नविन विक्रम निर्माण केले. त्यांचा आगामी ''तू ही रे'' हा चित्रपट येत्या सप्टेम्बर महिन्यात प्रदर्शित होतोय. या चित्रपटात प्रेक्षकांची आवडती जोडी स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत आहे.
''उत्तरायण'', ''कॉर्पोरेट'', ''ट्रैफिक सिंगल'', ''फैशन'', ''दबंग'', ''नटरंग'', ''बालगंधर्व'', ''बालक पालक'' आणि ''हिरोइन'' अश्या गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटाचे छायाचित्रकार महेश लिमये यांनी मागील वर्षी अप्रैल २०१४ मध्ये ''येलो'' हा अतिशय वेगळा विषय असलेला चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षक दोघांची कौतुकाची पावती मिळाली. गौरी गाडगीळ, मृणाल कुलकर्णी, उपेन्द्र लिमये आणि ऋषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष जूरी पुरस्कार मिळाला होता. तर चित्रपटाची नायिका गौरी गाडगीळ व संजना रॉय यांना विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला होता.
''ब्लू'', ''इंग्लिश विंग्लिश'', ''बॉस'', ''लेकर हम दिवाना दिल'' आणि ''तेवर'' या हिंदी चित्रपटांचे छायाचित्रकार लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला मराठी चित्रपट ''टपाल'' मागील वर्षी सप्टेम्बर २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. नंदू माधव व वीणा जामकर अभिनीत ''टपाल'' नंतर आता ''लालबागची राणी'' हा त्यांचा नवीन मराठी चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटिला येत आहेत.
युवा छायाचित्रकार अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेल्या ''किल्ला'' या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये ''सर्वोकृष्ट मराठी चित्रपट'' म्हणून गौरवण्यात आले. हा चित्रपट या वर्षी जून महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी कोकणात घडणारी कथा अतिशय सुंदरपणे साकारली होती.
लहान मुलांच्या तरल भावविश्वाचे दर्शन करवणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात तीन कोटींची कमाई करून आशयघन चित्रपट चांगली कमाई करू शकत नाही हा समज खोटा ठरविला.
छायाचित्रकार राहुल जाधव यांचा ''मर्डर मेस्ट्री'' हा चित्रपट या वर्षी जुलाई महिन्यात प्रदर्शित झाला. ''विजय असो'' आणि ''हैलो नंदन'' नंतर हा त्यांचा तीसरा चित्रपट होता. हिंदीतील प्रसिद्द निर्माता नाडीयाडवाला
यांची निर्मिती असलेल्या ''मर्डर मेस्ट्री'' ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
जुलाई महिन्यातच प्रदर्शित झालेल्या ''ऑनलाईन बिनलाईन'' च्या निमित्ताने केदार गायकवाड यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. सिद्धार्थ चांदेकर व हेमंत ढोमे अभिनीत या चित्रपटातून आजच्या युवा पिढीची सोशल मीडिया विषयी असलेली क्रेज असा विषय मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांनी गौरवले पण मराठी चित्रपटाच्या भाऊगर्दी मुळे या चित्रपटाला नुकसान सोसावे लागले.
२०१४ व २०१५ या वर्षात छायाचित्रकारांनी दिग्दर्शनात पदार्पण करून नवनवीन विषय संवेदनशीलपणे हाताळले. त्यांच्या चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळाली, प्रेक्षकांचे व समीक्षकांचे कौतुक मिळाले. अशाच प्रकारे येणाऱ्या काळात ही आपल्याला त्यांच्या कडून नवनवीन प्रयोग बघायला मिळतील अशी अपेक्षा करुया. छायाचित्रकारांनी दिग्दर्शित केलेले सर्वच चित्रपट यशस्वी झाले असे नाही मात्र ते चित्रपट देखणे होते हे मात्र नक्की !!!!
Thursday, 25 June 2015
''ड्रिम मॉल'', ''किल्ला'' आणि ''वेलकम जिंदगी''
उद्या ३ मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'' आणि ''वेलकम जिंदगी''.
सूरज दत्ताराम मुळेकर दिग्दर्शित ''ड्रिम मॉल'' हा थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव आणि नेहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी सिद्धार्थ जाधव यांना सर्वोकृष्ट खलनायकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या चित्रपटात मॉल मध्ये एका रात्रीत घडणाऱ्या गोष्टीची कथा आहे.
या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोकृष्ट मराठी चित्रपट न्हणुन गौरवण्यात आलेला ''किल्ला'' हा चित्रपट सुद्धा उद्या प्रदर्शित होत आहे. अविनाश अरुण या युवा दिग्दर्शकाने ''किल्ला''चे दिग्दर्शन केले आहे. ''किल्ला'' मध्ये लहान मुलांचे भावविश्व साकारण्यात आले आहे. या चित्रपटात अमृता सुभाष, पार्थ भालेराव, अर्चित देवधर, गौरीश गावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ''किल्ला''ला अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवण्यात आले आहे.
उमेश घाटगे दिग्दर्शित ''वेलकम जिंदगी'' मध्ये स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांची फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. या चित्रपटात मोहन आगाशे, सतीश आळेकर, प्रशांत दामले, महेश मांजरेकर, भारती आचरेकर, राजेश्वरी सचदेव, विवेक लागू, पुष्कर शोत्री, मुरली शर्मा, उर्मिला कानेटकर कोठारे आणि जयंत वाडकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ''वेलकम जिंदगी''चा ट्रेलर आधीच यूटुबवर गाजत असून ट्रेलरमध्ये या चित्रपटाचे निर्मिती मूल्य अतिशय चांगले असल्याचे दिसून येते. अतिशय आगळ्या वेगळया विषयवार ''वेलकम जिंदगी'' ची निर्मिती करण्यात आली आहे.
Saturday, 9 May 2015
युवा दिग्दर्शकांची गगन भरारी
मागच्या रविवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात ''कोर्ट'' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांचा खास उल्लेख केला. युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांच्या ''कोर्ट'' या चित्रपटाने अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गौरवोद्गार काढले. २८ वर्षाच्या या युवा दिग्दर्शकाने केलेल्या कामाबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. यातून दोन गोष्टी ठळकपणे दिसून येतात पहिली न्हणजे मराठी चित्रपटाने राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केलेली नवीन ओळख, दूसरी गोष्ट न्हाणजे युवा दिग्दर्शकांची गगन भरारी. मराठी चित्रपटांनी अगदी सुरवतीच्या काळापासून राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली असली तरी आता त्यात सातत्य येताना दिसून येत आहे.''कोर्ट'' या चित्रपटासोबतच ''किल्ला'' या चित्रपटाने सुद्धा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. या वर्षीचा सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार ''किल्ला''ला मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण सुद्धा युवक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर ''टाईमपास २'' सोबत दाखवला जात आहे. शाळेतील मुलांच्या भावविश्वावर आधारित या चित्रपटाचा नितांत सुन्दर असा ट्रेलर सध्या मराठी रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा चित्रपट येत्या २६ जून ला प्रदर्शित होत आहे.
सध्या मराठी चित्रपट सृष्टीला जी नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे त्यात हे चैतन्य ताम्हणे व अविनाश अरुण यांच्या सारख्या युवा दिग्दर्शकांचा नक्कीच महत्वाचा वाटा आहे. या दोन्ही दिग्दर्शकांचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे त्यांच्या कडून भविष्य काळात चांगल्या कलाकृती बघायला मिळणार अशी अपेक्षा करुया. हिच गोष्ट मराठी चित्रपट अधिकाधिक समृद्ध होणार आहे, हे स्पष्ट करते.
Wednesday, 25 March 2015
पुन्हा एकदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची ''सुवर्ण''मुद्रा
या वर्षी पुन्हा एकदा मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची ''सुवर्ण''मुद्रा उमटवलेली आहे. २०१४ चा सर्वोकृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ सम्मान चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ''कोर्ट'' या मराठी चित्रपटाला प्राप्त झालेला आहे. ''कोर्ट'' चित्रपट भारतीय न्याय व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर एका वृद्ध शाहीराची गोष्ट सांगतो. या चित्रपटाला या आधी अनेक राष्ट्रीय व अंतर-राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून पुरस्कारांसोबतच समीक्षकांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झाला आहेत. या वरूनच मराठी चित्रपट सध्या किती उंच भरारी घेतोय हे स्पष्ट होते. हा चित्रपट येत्या १७ अप्रैलला प्रदर्शित होणार आहे. ''ख्वाडा'' या चित्रपटाचे दिग्दर्शक बाबुराव कऱ्हाडे यांना विशेष जूरी पुरस्कार प्राप्त झाला सोबतच सर्वोकृष्ट ध्वनी संयोजनाचा पुरस्कारही ''ख्वाडा''साठी महावीर सब्बनवाल यांना प्राप्त झाला आहे. सर्वोकृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित ''एलिज़ाबेथ एकादशी'' या चित्रपटाला प्राप्त झाला आहे. सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार अविनाश अरुण दिग्दर्शित ''किल्ला'' या चित्रपटाला मिळाला आहे. सर्वोकृष्ट लघुपटाचा मान रवी जाधव दिग्दर्शित ''मित्रा''ला मिळाला आहे.
गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने बाजी मारताना दिसून येत आहे. २०० ४ ते २ ०१४ या गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मराठी चित्रपटांनी सातत्याने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चमकदार कामगीरी केली आहे. उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन,अभिनय, संगीत, संहिता, संवाद अशा सर्वच क्षेत्रात मराठी चित्रपटांनी पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. उत्कृष्ट सामाजिक चित्रपट व उत्कृष्ट बाल कलाकार या श्रेणीत तर कायम मराठी चित्रपटाचा वरचष्मा राहिला आहे. या वर्षी पुरस्कार मिळवण्याळया चित्रपटांसह गेल्या दहा वर्षात देवराई,उत्तरायण, गिरणी, एक सागर किनारी, इट्स प्रभात, द्विजा, डोम्बिवली फास्ट, शेवरी, टिंग्या, निरोप, जोगवा, गंध, हरीचंद्राची फैक्टरी, नटरंग, बाबू बैंड बाजा, चैंपियंस, मी सिंधुताई सपकाळ, मला आई व्याहाचय, पिस्तुल्या, देऊळ, शाळा, बालगंधर्व, विष्णुपंत दामले - बोलपटाचे मूकनायक, जय भीम कामरेड, ऐरावत,धग, अनुमती, संहिता, इन्वेस्टमेंट, फँड्री, अस्त, आजचा दिवस माझा या चित्रपटांनी, त्यातील कलवंतांनी व तंत्रज्ञांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवून मराठी चित्रपट सृष्टीला नवी भरारी दिली आहे. या सर्व नव-नवीन कथा, कल्पना, सामाजिक आशय, दिग्दर्शक, कलावंत व तंत्रज्ञांनी आपल्या मराठी चित्रपटांला अधिकाधिक समृध्द केले आहे.
Saturday, 3 January 2015
२०१५ ची मराठी चित्रपट सृष्टि
२०१४ प्रमाणेच याही वर्षी मराठी चित्रपट सृष्टीत अनेक नवीन प्रयोग पाहायला मिळणार आहे. याची सुरवात याच शुक्रवारी ''लोकमान्य - एक युगपुरुष''ने झाली आहे. या नंतर जनवरी महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित ''बाळकडू'', मकरंद अनासपुरे अभिनीत ''साट लोट पण सगळ खोट'' व मल्टी स्टारर ''क्लासमेट्स'' प्रदर्शित होणार आहे.
फरवरी महिन्यात लागोपाठ दोन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे श्रेयस तळपदे अभिनीत ''बाजी'' व स्वप्निल जोशी अभिनीत ''मितवा''. याच महिन्यात रवि जाधव प्रस्तुत ''कॉफी आणि बरच काही'' सुद्धा प्रदर्शित होणार आहे.
या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये एक तारा, जाणिवा, पी जी, वक्रतुंड महाकाय, बाबांची शाळा, किल्ला, सिद्धान्त, नीलकण्ठ मास्टर, बुगडी माझी सांडली ग, मर्डर मिस्ट्री, व्हाट अबाउट सावरकर याचा समावेश असणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...