आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रख्यात अभिनेत्री ज्योती सुभाष त्यांच्या आई आहेत. अमृता सुभाष यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. जी मराठी वरील "अवघाची संसार" या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी "श्वास", "चौसर", "देवराई", "नितळ", "बघ हात दाखवूया न", "बाधा", "सावली", "फिराक़", "वळु", "कॉन्ट्रैक्ट", "विहीर", "त्या रात्री पाऊस होता", "गंध", "हापुस", "मसाला", "अजिंठा", "बालक पालक", "चिड़िया" आणि "किल्ला" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. अभिनयासोबतच त्या पार्श्वगायन ही करतात. त्या लेखक सुद्धा आहेत. त्यांचे "एक उलट एक सुलट" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
Showing posts with label amruta subhash. Show all posts
Showing posts with label amruta subhash. Show all posts
Friday, 13 May 2016
अमृता सुभाष
आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रख्यात अभिनेत्री ज्योती सुभाष त्यांच्या आई आहेत. अमृता सुभाष यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. जी मराठी वरील "अवघाची संसार" या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी "श्वास", "चौसर", "देवराई", "नितळ", "बघ हात दाखवूया न", "बाधा", "सावली", "फिराक़", "वळु", "कॉन्ट्रैक्ट", "विहीर", "त्या रात्री पाऊस होता", "गंध", "हापुस", "मसाला", "अजिंठा", "बालक पालक", "चिड़िया" आणि "किल्ला" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. अभिनयासोबतच त्या पार्श्वगायन ही करतात. त्या लेखक सुद्धा आहेत. त्यांचे "एक उलट एक सुलट" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.Thursday, 25 June 2015
''ड्रिम मॉल'', ''किल्ला'' आणि ''वेलकम जिंदगी''
उद्या ३ मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'' आणि ''वेलकम जिंदगी''.
सूरज दत्ताराम मुळेकर दिग्दर्शित ''ड्रिम मॉल'' हा थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव आणि नेहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी सिद्धार्थ जाधव यांना सर्वोकृष्ट खलनायकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या चित्रपटात मॉल मध्ये एका रात्रीत घडणाऱ्या गोष्टीची कथा आहे.
या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोकृष्ट मराठी चित्रपट न्हणुन गौरवण्यात आलेला ''किल्ला'' हा चित्रपट सुद्धा उद्या प्रदर्शित होत आहे. अविनाश अरुण या युवा दिग्दर्शकाने ''किल्ला''चे दिग्दर्शन केले आहे. ''किल्ला'' मध्ये लहान मुलांचे भावविश्व साकारण्यात आले आहे. या चित्रपटात अमृता सुभाष, पार्थ भालेराव, अर्चित देवधर, गौरीश गावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ''किल्ला''ला अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवण्यात आले आहे.
उमेश घाटगे दिग्दर्शित ''वेलकम जिंदगी'' मध्ये स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांची फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. या चित्रपटात मोहन आगाशे, सतीश आळेकर, प्रशांत दामले, महेश मांजरेकर, भारती आचरेकर, राजेश्वरी सचदेव, विवेक लागू, पुष्कर शोत्री, मुरली शर्मा, उर्मिला कानेटकर कोठारे आणि जयंत वाडकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ''वेलकम जिंदगी''चा ट्रेलर आधीच यूटुबवर गाजत असून ट्रेलरमध्ये या चित्रपटाचे निर्मिती मूल्य अतिशय चांगले असल्याचे दिसून येते. अतिशय आगळ्या वेगळया विषयवार ''वेलकम जिंदगी'' ची निर्मिती करण्यात आली आहे.
Friday, 31 October 2014
''चिंतामणी'' आणि ''आशियाना''
आज दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत ''चिंतामणी'' आणि ''आशियाना''.

संगीता बालचंद्रन दिग्दर्शित ''चिंतामणी'' मधून भरत जाधव व अमृता सुभाष यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पद्यावर येत आहे. भरत जाधव यांच्यामुळे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद भेटू शकतो. सध्या भरत जाधव यांनी विनोदी चित्रपटांसोबतच वेगवेगळया विषयावरच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
आज प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''आशियाना'' हा बार डांसर्सच्या जीवनावर आधारित आहे असे एकंदरित चित्रपटाच्या पोस्टर्स वरुन दिसतेय. अजीत देवळे दिग्दर्शित या चित्रपटातून तीन नवीन अभिनेत्री मराठी चित्रपट शृष्टीत पदार्पण करणार आहेत, हे ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्ये न्हणता येईल.

संगीता बालचंद्रन दिग्दर्शित ''चिंतामणी'' मधून भरत जाधव व अमृता सुभाष यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पद्यावर येत आहे. भरत जाधव यांच्यामुळे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद भेटू शकतो. सध्या भरत जाधव यांनी विनोदी चित्रपटांसोबतच वेगवेगळया विषयावरच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
आज प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''आशियाना'' हा बार डांसर्सच्या जीवनावर आधारित आहे असे एकंदरित चित्रपटाच्या पोस्टर्स वरुन दिसतेय. अजीत देवळे दिग्दर्शित या चित्रपटातून तीन नवीन अभिनेत्री मराठी चित्रपट शृष्टीत पदार्पण करणार आहेत, हे ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्ये न्हणता येईल.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...