Showing posts with label Valu. Show all posts
Showing posts with label Valu. Show all posts

Tuesday, 6 December 2016

उमेश विनायक कुलकर्णी

आज (६ डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! उमेश विनायक कुलकर्णी यांनी "वळू", "विहीर", "देऊळ" आणि "हाइवे" या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अतिशय संवेदनशील विषय ते मनोरंजकपणे मांडतात. त्यांच्या देऊळ या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.  

Friday, 13 May 2016

अमृता सुभाष

आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रख्यात अभिनेत्री ज्योती सुभाष त्यांच्या आई आहेत. अमृता सुभाष यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. जी मराठी वरील "अवघाची संसार" या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी "श्वास", "चौसर", "देवराई", "नितळ", "बघ हात दाखवूया न", "बाधा", "सावली", "फिराक़", "वळु", "कॉन्ट्रैक्ट", "विहीर", "त्या रात्री पाऊस होता", "गंध", "हापुस", "मसाला", "अजिंठा", "बालक पालक", "चिड़िया" आणि "किल्ला" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.  अभिनयासोबतच त्या पार्श्वगायन ही करतात. त्या लेखक सुद्धा आहेत. त्यांचे "एक उलट एक सुलट" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Saturday, 30 January 2016

निर्मिती सावंत

आज (३० जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! निर्मिती सावंत यांनी नाटक, टीवी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून अनेक भूमिका केल्या असल्या तरी त्यांच्या "कुमारी गंगू बाई नॉन मेट्रिक" या टीवी मालिकेमधील भूमिकेसाठी त्या प्रसिद्द आहेत. त्यांची ही भूमिका आणि टीवी मालिका इतकी प्रसिद्द झाली की ह्याच नावाने पुढे नाटक आणि चित्रपटाची पण निर्मिती करण्यात आली. या मालिकेमध्ये त्यांच्या सोबत पंढरीनाथ कांबळे यांची भूमिका होती. झी मराठी वरील "फु बाई फु" या कार्यक्रमाचे परीक्षक पद त्यांनी भूषवल आहे. 

निर्मिति सावंत यांनी अभिनय केलेले चित्रपट  
  • बिनधास्त (१९९९) 
  • नवरा माझा नवसाचा (२००४)
  • कायद्याच बोला (२००५)
  • खबरदार (२००५)
  • हि पोरगी कुणाची (२००६ )
  • शुभमंगल सावधान (२००६)
  • वळु (२००६)
  • श्यामची मम्मी (२००८)
  • सासु नम्बरी जवाई दस नम्बरी (२००८)
  • हफ्ता बंद (२००९)
  • निशानी डावा अंगठा (२००९)
  • हॉर्न ओके प्लीज (२००९)
  • आईडिया ची कल्पना (२०१०)
  • चल धर पकड (२०१०)
  • अय्या (२०१२)
  • गंगू बाई नॉन मेट्रिक (२०१३)

Tuesday, 26 January 2016

नंदू माधव

आज (२६ जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते नंदू माधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मोजके पण अतिशय अर्थपूर्ण चित्रपट व भूमिका करणार्या अभिनेत्यांमध्ये नंदू माधव यांची गणना होते. २०१० साली प्रदर्शित झालेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित "हरिचन्द्राची फैक्टरी" मध्ये त्यांनी दादासाहेब फालके यांची केंद्रीय भूमिका केली होती. हा चित्रपट व त्यांच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा झाली. अभिनयाबरोबर सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय आहेत. त्यांनी खालील चित्रपटात अभिनय केला आहे.  
  • दायरा (१९९६)
  • शूल (१९९९)
  • अशी ज्ञानेश्वरी (२००१) 
  • वळु (२००८) 
  • बारू (२०१०) 
  • मर्मबन्ध (२०१०) 
  • हरिचंद्राची फैक्टरी (२०१०) 
  • जन गण मन (२०१२)
  • शाळा (२०१२)  
  • मुक्ती (२०१२) 
  • टपाल (२०१३) 
  • मैं और चार्ल्स (२०१५)

किरण नाटकी