Showing posts with label shala. Show all posts
Showing posts with label shala. Show all posts
Saturday, 26 March 2016
Monday, 22 February 2016
केतकी माटेगावकर
आज (२२ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! "सा रे गा मा" या गाण्याच्या रियलिटी शो मधून पहिल्यांदा केतकीची ओळख सर्वांना झाली. गायनानंतर केतकीनी "शाळा" या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयात पाहिले पाऊल टाकले. "शाळा" या पहिल्याच चित्रपटात केतकीनी रसिकांची मने जिंकून घेतली. "शाळा" नंतर ती "काकस्पर्श", "तानी", "टाईम पास", "टाईम पास २" या चित्रपटांमधून दिसली. आता तिचा "फुंटरू" हा मराठी चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटातील तिच्या वेगळया लूकची जोरदार चर्चा आहे. "शाळा" नंतर दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या सोबत तिचा दूसरा चित्रपट असणार आहे.Tuesday, 26 January 2016
नंदू माधव
आज (२६ जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते नंदू माधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मोजके पण अतिशय अर्थपूर्ण चित्रपट व भूमिका करणार्या अभिनेत्यांमध्ये नंदू माधव यांची गणना होते. २०१० साली प्रदर्शित झालेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित "हरिचन्द्राची फैक्टरी" मध्ये त्यांनी दादासाहेब फालके यांची केंद्रीय भूमिका केली होती. हा चित्रपट व त्यांच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा झाली. अभिनयाबरोबर सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय आहेत. त्यांनी खालील चित्रपटात अभिनय केला आहे.
- दायरा (१९९६)
- शूल (१९९९)
- अशी ज्ञानेश्वरी (२००१)
- वळु (२००८)
- बारू (२०१०)
- मर्मबन्ध (२०१०)
- हरिचंद्राची फैक्टरी (२०१०)
- जन गण मन (२०१२)
- शाळा (२०१२)
- मुक्ती (२०१२)
- टपाल (२०१३)
- मैं और चार्ल्स (२०१५)
सुजय डहाके
आज (२६ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सुजय डहाके यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सुजय यांनी दिग्दर्शित केलेला
पहिला चित्रपट "शाळा"
हा होता. हा चित्रपट
मिलिंद बोकिळ यांच्या "शाळा"
याच नावाच्या गाजलेल्या
कादंबरीवर आधारित
होता. प्रदर्शनपूर्वीच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात
प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे
पहिल्याच चित्रपटासाठी सुजय यांच्याकडून
खुप अपेक्षा होत्या. चित्रपट
प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाकडून असलेल्या प्रेक्षकांच्या
अपेक्षा पूर्ण झाल्या आणि
सुजय पहिल्याच चित्रपटात स्टार दिग्दर्शक
बनले. त्यांनतर त्याचा दूसरा
चित्रपट "आजोबा" हा त्यांनी
हिंदितील प्रसिद्द अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला
प्रमुख भूमिकेत घेऊन बनवला. हा
चित्रपट आजोबा नावाच्या बिबट्यावर आधारित होता. या वर्षी
त्यांचा "फूंतरू" हा साइंस
फिक्शन चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात
केतकी माटेगांवकर हिची
प्रमुख भूमिका होती पण
हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे
कामगिरी करू शकला
नाही.
सुजय डहाके यांनी दिग्दर्शित
केलेले चित्रपट
- शाळा (२०११)
- आजोबा (२०१४)
- फूंतरू (२०१५)
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...

