Showing posts with label Devrai. Show all posts
Showing posts with label Devrai. Show all posts

Friday, 13 May 2016

अमृता सुभाष

आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रख्यात अभिनेत्री ज्योती सुभाष त्यांच्या आई आहेत. अमृता सुभाष यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. जी मराठी वरील "अवघाची संसार" या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी "श्वास", "चौसर", "देवराई", "नितळ", "बघ हात दाखवूया न", "बाधा", "सावली", "फिराक़", "वळु", "कॉन्ट्रैक्ट", "विहीर", "त्या रात्री पाऊस होता", "गंध", "हापुस", "मसाला", "अजिंठा", "बालक पालक", "चिड़िया" आणि "किल्ला" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.  अभिनयासोबतच त्या पार्श्वगायन ही करतात. त्या लेखक सुद्धा आहेत. त्यांचे "एक उलट एक सुलट" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

किरण नाटकी