Showing posts with label smile. Show all posts
Showing posts with label smile. Show all posts

Saturday, 12 December 2015

भरत जाधव

आज (१२ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली. नंतर त्यांना "सही रे सही" नाटकातून ओळख मिळाली. त्यांच्या इतर नाटकांमध्ये "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल द बेस्ट", "आमच्या सारखे आम्हीच" आणि "ढॅण्ट ढॅण" या नाटकांचा समावेश आहे. नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. या जोडीनी अनेक यशस्वी नाटके व चित्रपट दिले आहेत. भरत जाधव हे त्यांच्या कॉमिक टाइमिंग साठी ओळखले जातात. "चिरंजीव" या त्यांच्या येणाऱ्या चित्रपटात ते अत्यंत वेगळया भूमिकेत दिसणार आहे.  

भरत जाधव यांनी अभिनय केलेले चित्रपट  
  • वास्तव  (१९९९)
  • खतरनाक (२०००)
  • प्राण जाये पर शान न जाये (२००३)
  • हाऊस फुल्ल (२००४)
  • नव-याची कमाल बायकोची धमाल (२००४)
  • खबरदार (२००५)
  • पछाडलेला (२००५)
  • सरीवर सर (२००५)
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
  • जत्रा (२००६)
  • चालू नवरा भोळी बायको (२००६)
  • गोलमाल (२००६)
  • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
  • गलगले निघाले (२००८)
  • साडे माडे तीन (२००८)
  • गोंद्या मारतंय तंगडं (२००८)
  • लग्नाची वरात लंडनच्या घरात (२००९)
  • क्षणभर विश्रांती (२०१०)
  • टाटा बिरला आणि मैना (२०१०)
  • शिक्षणाच्या आयच्या घो (२०१०)
  • जावई बापू जिंदाबाद (२०१०)
  • झक मारली बायको केली (२०१०)
  • बम बम बोले (२०१०)
  • डावपेच (२०११)
  • शहाणपण देगा देवा ! (२०११)
  • झिंग चिक झिंग (२०११)
  • फक्त लढ म्हणा (२०११)
  • बाबुरावला पकडा (२०१२)
  • नो एंट्री - पुढे धोका आहे (२०१२)
  • दम असेल तर (२०१२)
  • खो-खो (२०१२)
  • येड्यांची जत्रा (२०१२)
  • पुणे व्हाया बिहार (२०१३)
  • सत ना गत (२०१३)
  • श्रीमंत दामोदर पंत (२०१३)
  • अग बाई अरेच्या २ (२०१५)
  • पी से पी एम तक (२०१५)

Tuesday, 13 October 2015

स्पृहा जोशी

आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनय करणाऱ्या युवा अभिनेत्रीमध्ये स्पृहा जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. शाळेमध्ये असतानाच त्यांना गजेन्द्र अहिरे यांच्या "माय बाप" या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. "अग्निहोत्र", "एका लग्नाची दूसरी गोष्ट", "उँच माझा झोका", "एका लग्नाची तीसरी गोष्ट" या मालिकांमुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्या. स्पृहा जोशी यांचे "समुद्र" हे नाटक सध्या बरेच गाजतेय, त्यांच्या "नांदी" या नाटकाची बरीच चर्चा होती. अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्पृहा जोशी यांनी "नांदी" मध्ये काम केले. त्यांचे  "पेईंग गेस्ट" आणि "बॉयोस्कोप (एक होता काऊ)" हे चित्रपट या वर्षी प्रदर्शित झालेत. स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या त्यांची "किचनची सुपरस्टार" हि मालिका सुरु आहे. 

त्या स्तंभलेखन करतात, कविता लिहितात आणि गीतलेखन ही करतात. त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्या अभिनया इतक्याच प्रसिद्द आहेत. त्यांनी "बावरे प्रेम हे" आणि "डबल सीट" या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे. खास करून त्यांनी "डबल सीट" चित्रपटासाठी लिहिलेली गाणी खूपच श्रवणीय झाली आहे. त्याचा www.kangoshti.blogspot.in हा ब्लॉग वाचकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत  आहे.  

Tuesday, 6 October 2015

रेणुका शहाणे

आज (७ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आमच्या बालपणीच्या आठवणी पैकी गोष्ट म्हणजे दर रविवारी लागणारी मालिका "सुरभि" आणि त्यात दिसणारे दोन हसरे चेहरे, त्यापैकी एक रेणुका शहाणे. त्या वेळेस ही मालिका अफाट लोकप्रिय झाली होती आणि या मालिकेची सूत्रसंचालिका रेणुका शहाणे सुद्धा. ''सर्कस" या दूरदर्शन वरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी शाहरुख़ खान यांच्या सोबत अभिनय केला होता. "हम आपके है कौन" या अत्यंत गाजलेल्या चित्रपटात आदर्श सुनेची भूमिका त्यांनी केली. त्यांची हि भूमिका इतकी लोकप्रिय झाली की आज हि त्यांना याच भूमिकेसाठी ओळखले जाते. रेणुका शहाणे यांनी ''रीटा" हा चित्रपट सुद्धा दिग्दर्शित केला आहे. त्या हिंदी चित्रपट अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. अलीकडे त्यांनी मराठी चित्रपटात पुनरागमन केले असून त्या ''भाकरवाडी ७ किमी", "जाणिवा" आणि "हायवे" या चित्रपटात दिसल्या आहेत. 

किरण नाटकी