Showing posts with label superstar. Show all posts
Showing posts with label superstar. Show all posts

Saturday, 12 December 2015

भरत जाधव

आज (१२ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली. नंतर त्यांना "सही रे सही" नाटकातून ओळख मिळाली. त्यांच्या इतर नाटकांमध्ये "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल  बेस्ट", "आमच्या सारखे आम्हीच" आणि "ढॅण्ट ढॅण" या नाटकांचा समावेश आहे. नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. या जोडीनी अनेक यशस्वी नाटके व चित्रपट दिले आहेत. भरत जाधव हे त्यांच्या कॉमिक टाइमिंग साठी ओळखले जातात. "चिरंजीव" या त्यांच्या येणाऱ्या चित्रपटात ते अत्यंत वेगळया भूमिकेत दिसणार आहे.  

भरत जाधव यांनी अभिनय केलेले चित्रपट  
  • वास्तव  (१९९९)
  • खतरनाक (२०००)
  • प्राण जाये पर शान न जाये (२००३)
  • हाऊस फुल्ल (२००४)
  • नव-याची कमाल बायकोची धमाल (२००४)
  • खबरदार (२००५)
  • पछाडलेला (२००५)
  • सरीवर सर (२००५)
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
  • जत्रा (२००६)
  • चालू नवरा भोळी बायको (२००६)
  • गोलमाल (२००६)
  • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
  • गलगले निघाले (२००८)
  • साडे माडे तीन (२००८)
  • गोंद्या मारतंय तंगडं (२००८)
  • लग्नाची वरात लंडनच्या घरात (२००९)
  • क्षणभर विश्रांती (२०१०)
  • टाटा बिरला आणि मैना (२०१०)
  • शिक्षणाच्या आयच्या घो (२०१०)
  • जावई बापू जिंदाबाद (२०१०)
  • झक मारली बायको केली (२०१०)
  • बम बम बोले (२०१०)
  • डावपेच (२०११)
  • शहाणपण देगा देवा ! (२०११)
  • झिंग चिक झिंग (२०११)
  • फक्त लढ म्हणा (२०११)
  • बाबुरावला पकडा (२०१२)
  • नो एंट्री - पुढे धोका आहे (२०१२)
  • दम असेल तर (२०१२)
  • खो-खो (२०१२)
  • येड्यांची जत्रा (२०१२)
  • पुणे व्हाया बिहार (२०१३)
  • सत ना गत (२०१३)
  • श्रीमंत दामोदर पंत (२०१३)
  • अग बाई अरेच्या २ (२०१५)
  • पी से पी एम तक (२०१५)

Friday, 18 September 2015

प्रिया बापट

आज (१८ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री प्रिया बापट यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २००० साली प्रदर्शित झालेल्या ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' या चित्रपटातुन त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ''मुन्नाभाई MBBS'' आणि ''लगे रहो मुन्नाभाई'' या हिंदी चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या पण त्या छोट्या भूमिकेतही त्यांनी आपली चमक दाखवली. ''मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'' या प्रचंड गाजलेल्या चित्रपटात त्यांनी सचिन खेडेकर यांच्या मुलीची भूमिका केली होती. २०१३ साली आलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित ''काकस्पर्श'' हा चित्रपट त्यांच्या करियरला कलाटणी देणारा ठरला. त्यात प्रिया बापट यांनी बालविधवेची भूमिका केली होती. त्यानंतर ''टाईम प्लीज'', "आंधळी कोथिम्बीर'', "हैप्पी जर्नी ", "लोकमान्य एक युग पुरुष" आणि " टाईम पास २" असे यशस्वी चित्रपट त्यांनी दिले आहे. या सर्वच चित्रपटात त्यांच्या अभिनयाचे व लूकचे कौतुक झाले. 

आज घडीला १९ लाखापेक्षा जास्त लोक त्यांच्या फेसबुक पेजला लाइक करतात, यावरून त्यांचे किती फैंस आहेत याचा सहज अंदाज येऊ शकतो. ''नवा गडी नव राज्य" हे त्यांच अत्यंत गाजलेल नाटक, या नाटकावर ''टाईम प्लीज'' या चित्रपटाची निर्मिती झाली त्यातही त्यांची प्रमुख भूमिका होती. याच नाटकातील त्यांचे सह कलाकार व चित्रपट अभिनेता उमेश कामत यांच्या सोबत त्या विवाहबद्ध झाल्या आहेत. उमेश कामत व प्रिया बापट हि मराठी चित्रपट सृष्टि मधील सर्वात क्यूट जोडी आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.priyabapat.in या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता. 

किरण नाटकी