आज (१६ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शका स्वप्ना वाघमारे जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! स्वप्ना वाघमारे जोशी या सध्या मराठीतील आघाडीच्या चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी विविध वाहिन्याकारिता वेगवेगळ्या मालिकांची निर्मिती केल्यानंतर मराठीत "मितवा" या रोमांटिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर त्यांनी संजय लीला भंसाली निर्मित "लाल इश्क़" या सस्पेंस थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सोबतच त्यांनी "फुगे" या चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले आहे. त्यांनी वेगवेगळे विषय आणि जॉनर हाताळले आहे. हिंदी मध्ये त्यांनी हिमेश रेशमिया अभिनीत "दमादम" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Showing posts with label mitwa. Show all posts
Showing posts with label mitwa. Show all posts
Saturday, 16 July 2016
Sunday, 18 October 2015
स्वप्निल जोशी
आज (१८ ऑक्टोम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते स्वप्निल जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

मराठी चित्रपट सृष्टीतील आजचे सुपरस्टार ''स्वप्निल जोशी" यांचे नाव घेतले की आपल्याला त्यांचा रामानंद सागर निर्देशित ''कृष्णा" या मालिकेतील त्यांची केंद्रीय भूमिका आठवते. त्यांची ''कृष्णा" ची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक टीवी हिंदी व मराठी टीवी मालिकेमधून भूमिका केल्या किंबहुना ते छोट्या पद्यावरच जास्त रमले असे म्हटल्यास वावग ठरणार नाही. ''गुलाम ए मुस्तफा" आणि "दिल विल प्यार व्यार" या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. २०१० साली प्रदर्शित झालेल्या कांचन अधिकारी दिग्दर्शित "मानिनी" या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आगमन केले. हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला व स्वप्निल जोशी यांचा अभिनय पण. मध्यंतरी त्यांनी "चेकमेट", "टारगेट" आणि "आम्ही सातपुते" असे चित्रपट केले. सतीश राजवाडे यांच्या "मुंबई पुणे मुंबई" या चित्रपटात त्यांची मुक्ता बर्वेसोबत केमिस्ट्री खुप गाजली आणि हा चित्रपट सुद्धा खुप चालला. या चित्रपटाचा पुढचा भाग "मुंबई पुणे मुंबई २" येत्या काही दिवसात प्रदर्शित होत आहे.
संजय जाधव दिग्दर्शित ''दुनियादारी" हा चित्रपट त्यांच्या करियरला वेगळे वळण देणारा ठरला. संजय जाधवचे दिग्दर्शन व स्वप्निल जाधव - सई ताम्हणकर यांची जोडी हा मराठी चित्रपटाच्या यशाचा नविन फार्मूला चित्रपटातून गवसला. "प्यारवाली लवस्टोरी" आणि "तू ही रे" चित्रपटात हेच सिद्ध झाले आहे. सोबतच त्यांनी ''मंगलाष्टक वन्स मोर", "पोर बाजार" आणि "वेलकम ज़िंदगी" हे चित्रपट पण केले. याच वर्षी प्रदर्शित झालेला ''मितवा" या चित्रपटात त्यांची प्रार्थना बेहरे व सोनाली कुलकर्णी यांची जोडी ही पसंत केल्या गेली.
Thursday, 12 February 2015
मितवा
स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णी अभिनीत ''मितवा'' हा बहु-प्रतीक्षित मराठी चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी आहेत. अगदी निर्मिती पासूनच या चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाची स्टार कास्ट व चित्रपटाचे मार्केटिंग यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता आहे. स्वप्निल जोशी या चित्रपटात युवा उद्योजकाची भूमिका साकारतोय. संगीतमय प्रेम कथा असलेला हा चित्रपट वैलेंटाइन डे च्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय, ही ह्या चित्रपटसाठी व्यवसायाच्या दृष्टीने जमेची बाजु आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...

