Showing posts with label Mukta Barve. Show all posts
Showing posts with label Mukta Barve. Show all posts

Thursday, 12 November 2015

"मुंबई पुणे मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली"

आज "मुंबई पुणे मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली" हे दोन बहु-प्रतिक्षीत मराठी चित्रपट प्रदर्शित झाले, या दोन्ही चित्रपटांना सलमान खान यांच्या ''प्रेम रतन धन पायो" या हिंदी चित्रपटासोबत स्पर्धा करावी लागणार आहे.

"मुंबई पुणे मुंबई २" हा २०१० साली प्रदर्शित झालेल्या "मुंबई पुणे मुंबई" या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल आहे. "मुंबई पुणे मुंबई" या चित्रपटातून स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे हि नविन जोडी मराठी चित्रपट सृष्टिला मिळाली होती. या जोडीच्या केमिस्ट्रीमुळे "मुंबई पुणे मुंबई" हा चित्रपट खुप गाजला होता. हिच जोडी "मुंबई पुणे मुंबई २" या चित्रपटाची युएसपी आहे. या जोडीसोबतच श्रुती मराठे, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, आसावरी जोशी, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे आहेत. 

आज प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट म्हणजे "कट्यार काळजात घुसली", या चित्रपटाच्या निमित्ताने प्रख्यात अभिनेते सुबोध भावे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. हा चित्रपट "कट्यार काळजात घुसली" याच नावाच्या अतिशय गाजलेल्या संगीत नाटकावर आधारीत आहे. या चित्रपटात सुद्धा रसिकांना संगीताची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तंवर आणि प्रख्यात संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Sunday, 18 October 2015

स्वप्निल जोशी

आज (१८ ऑक्टोम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते स्वप्निल जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

मराठी चित्रपट सृष्टीतील आजचे सुपरस्टार ''स्वप्निल जोशी" यांचे नाव घेतले की आपल्याला त्यांचा रामानंद सागर निर्देशित ''कृष्णा" या मालिकेतील त्यांची केंद्रीय भूमिका आठवते. त्यांची ''कृष्णा" ची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक टीवी हिंदी व मराठी टीवी मालिकेमधून भूमिका केल्या किंबहुना ते छोट्या पद्यावरच जास्त रमले असे म्हटल्यास वावग ठरणार नाही. ''गुलाम ए मुस्तफा" आणि "दिल विल प्यार व्यार" या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. २०१० साली प्रदर्शित झालेल्या कांचन अधिकारी दिग्दर्शित "मानिनी" या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आगमन केले. हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला व स्वप्निल जोशी यांचा अभिनय पण. मध्यंतरी त्यांनी "चेकमेट", "टारगेट" आणि "आम्ही सातपुते" असे चित्रपट केले. सतीश राजवाडे यांच्या "मुंबई पुणे मुंबई" या चित्रपटात त्यांची मुक्ता बर्वेसोबत केमिस्ट्री खुप गाजली आणि हा चित्रपट सुद्धा खुप चालला. या चित्रपटाचा पुढचा भाग "मुंबई पुणे मुंबई २" येत्या काही दिवसात प्रदर्शित होत आहे. 

संजय जाधव दिग्दर्शित ''दुनियादारी" हा चित्रपट त्यांच्या करियरला वेगळे वळण देणारा ठरला. संजय जाधवचे दिग्दर्शन व स्वप्निल जाधव - सई ताम्हणकर यांची जोडी हा मराठी चित्रपटाच्या यशाचा नविन फार्मूला चित्रपटातून गवसला. "प्यारवाली लवस्टोरी" आणि "तू ही रे" चित्रपटात हेच सिद्ध झाले आहे. सोबतच त्यांनी ''मंगलाष्टक वन्स मोर", "पोर बाजार" आणि "वेलकम ज़िंदगी" हे चित्रपट पण केले. याच वर्षी प्रदर्शित झालेला ''मितवा" या चित्रपटात त्यांची प्रार्थना बेहरे व सोनाली कुलकर्णी यांची जोडी ही पसंत केल्या गेली. 

Thursday, 13 August 2015

''डबल सीट''

उद्या ''डबल सीट'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अंकुश चौधरी आणि  मुक्ता बर्वे हि जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ''टाईम प्लीज'' फेम समीर विध्वंस या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.  मायानगरी मुंबईमध्ये राहणाऱ्या नवदाम्पत्याची गोष्ट या चित्रपटात बघायला मिळणार आहे. ''साढे माढे तीन'', ''दे धक्का'', ''गलगले निघाले'', ''धुडगूस'', ''एक डाव धोबीपछाड'', ''फँड्री'', ''लय भारी'', ''डॉ बाबा प्रकाश आमटे'', ''एलिजाबेथ एकादशी'', ''लोकमान्य एक युगपुरुष'', ''टाइमपास २'' आणि ''किल्ला''सारखे दर्जेदार मराठी चित्रपट देणाऱ्या एस्सेल विज़न प्रोडक्शन चा हा नवा चित्रपट आहे.  

Wednesday, 29 July 2015

''हायवे''च्या निमित्ताने

ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''कैर्री ऑन मराठा'', ''मनातल्या उन्हात'' आणि ''पन्हाळा''. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ''हायवे'' हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. तशी पूर्व प्रसिद्धीही करण्यात आली होती, पण प्रदर्शनाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. मराठीत अशा प्रकारची प्रदर्शनाची तारीख बदलण्याची अलीकडे प्रेक्षकांना सवय झाली आहे. काही दिवसांपैकी ''सासुचे स्वयवर'', ''साट लोट पण सगळ खोट'', ''बाइकर्स अड्डा'' अशा चित्रपटाच्या बाबतीत हा प्रकार घडला अाहे. मराठी चित्रपटाच्या वाढत्या संख्येमुळे दर शुक्रवारी मराठी चित्रपटाची भाऊगर्दी वाढत आहे त्यामुळे बहुधा वेळेवर प्रदर्शनाची तारीख बदलण्यात येत असावी. ''बजरंगी भाईजान'' आणि ''बाहुबली''ची टिकिट खिड़की वरची घोडदौड इतर तीन मराठी चित्रपट यामुळे ''हायवे''चे प्रदर्शन लांबवण्यात आले असावे.    
    
''वळु'' आणि ''देऊळ'' नंतर गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी या लेखक दिग्दर्शक जोडीचा ''हायवे - एक सेल्फी आर पार'' हा तीसरा चित्रपट आहे. मराठीतील पहिला रोड मूवी चित्रपट अशी या चित्रपटाची प्रसिद्धि करण्यात येत आहे. ''हायवे''मध्ये गिरीश कुलकर्णी, हुमा कुरैशी, टिस्का चोप्रा, रेणुका शहाणे, विद्याधर जोशी, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, मयूर खंडगे, श्रीकांत यादव, किशोर चौगुले, किशोर कदम, वृषाली कदम, पूर्वा  पवार आणि नागराज मंजुळे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर एका गूढ़ रम्य चित्रपटाचा फिल देणारा आहे. अधिक सुखासाठी ''हाइवे''चा प्रवास लांबणीवर टाकण्यात आला असला तरी २८ ऑगस्टला या चित्रपटाचा आस्वाद घेण्याचा संधी सर्व प्रेक्षकांना मिळणार आहे.

किरण नाटकी