Showing posts with label agnihotra. Show all posts
Showing posts with label agnihotra. Show all posts

Saturday, 9 January 2016

सतीश राजवाडे

आज (९ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!  मराठी चित्रपट सृष्टीला आज प्राप्त झालेले स्वरुप मिळवण्यात सतीश राजवाडे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. अभिनय, मालिकांचे दिग्दर्शन आणि चित्रपटांचे दिग्दर्शन या यात्रेत सतीश राजवाडे यांनी अनेक स्मरणीय कलाकृती प्रेक्षकांना दिल्या आहेत. सतीश राजवाडे यांनी आपल्या चित्रपटांमध्ये अनेक विषय हाताळले आहेत. सतीश राजवाडे यांनी त्यांचा मराठीत गाजलेला "मुंबई पुणे मुंबई" हा चित्रपट हिंदीत "मुंबई दिल्ली मुंबई" या नावाने बनविला. सतीश राजवाडे यांनी आता आपल्या अभिनयाची सेकंड इनिंग सुरु केली असून ते "टाईम बरा वाईट" चित्रपटात डॉन च्या भूमिकेत दिसले होते. आगामी "भय'' या चित्रपटात ते महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  


सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट 
  • मृगजळ (२००९)
  • एक डाव धोबीपछाड (२००९)
  • गैर (२००९)
  • मुंबई-पुणे-मुंबई (२०१०)
  • बदाम राणी गुलाम चोर (२०१२)
  • प्रेमाची गोष्ट (२०१३)
  • पोपट (२०१३)
  • सांगतो ऐका (२०१४)
  • मुंबई दिल्ली मुंबई (हिंदी चित्रपट) (२०१४)
  • मुंबई-पुणे-मुंबई २ (२०१५)

सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका 
  • असंभव (२००९)
  • अग्निहोत्र (२०१०)
  • गुंतता हृदय हे (२०११)
  • एका लग्नाची दुसरी गोष्ट (२०१२) 


Tuesday, 13 October 2015

शरद पोंक्षे

आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! टि वी, नाटक आणि चित्रपट हि अभिनयाची सर्व माध्यम आपल्या समर्थ अभिनयाने गाजवणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. "दामिनी", "अग्निहोत्र" आणि "वादळवाट" या मालिकांनी त्यांना घराघरात पोहचवले. त्यांनी अनेक नाटकात महत्वाच्या भुमिका केल्या असल्या तरी "मी नथूराम गोडसे बोलतोय" हे नाटक त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय महत्वाचे आहे. त्यांनी "हे राम", "८८ अंटोप हिल", "आखरी ख्वाहिश", "ब्लैक फ्राइडे", "ओटी कृष्णामाईची", "एक पल प्यार का", "गाढवाच लग्न", "तूच खरी घरची लक्ष्मी", "गोळाबेरीज", "तुकाराम", "देख तमाशा देख", "ब्लैक होम", "व्हाट अबाउट सावरकर" आणि "संदूक" या हिंदी व मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

किरण नाटकी