आज (७ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते शरद केळकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! शरद केळकर हे छोट्या पद्यावरील स्टार कलाकार आहेत, मागील वर्षी प्रदर्शित "लय भारी" या चित्रपटातून साकारलेल्या संग्राम या खलनायकाच्या भूमिकेने त्यांना मराठी चित्रपट सृष्टित नवीन ओळख मिळवून दिली आहे. या पूर्वी त्यांची जी वाहिनीवरची "सात फेरे" या मालिकेतील नहर प्रताप सिंगची भूमिका खुप गाजली होती. शरद केळकर हे मूळचे मध्यप्रदेश मधील ग्वालियरचे. एम बी ए चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडलिंग विश्वात प्रवेश करून आता ते अभिनेते म्हणून नावारुपाला आले आहेत. त्यांनी ''सिन्दूर तेरे नाम का", "नच बलिये २", "पति पत्नी और वो", "बैरी पिया", "सर्वगुण संपन्न", "उतरण", "कुछ तो लोग कहेंगे", "सैतान" आणि "एजेंट राघव" या मालिकांमधून अभिनय केला आहे. शरद केळकर यांनी संजय लीला भंसाली यांच्या "राम लीला" या चित्रपटातही महत्वाची भूमिका साकारली होती.
Showing posts with label negative roles. Show all posts
Showing posts with label negative roles. Show all posts
Wednesday, 7 October 2015
Sunday, 13 September 2015
उषा नाडकर्णी
आज (१३ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री उषा
नाडकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
नकारात्मक भूमिकेसाठी त्या प्रसिद्द आहेत. त्यांची ''माहेरची साडी'' या
चित्रपटातील सासूची भूमिका आज ही लोकांच्या लक्षात आहे. बहुधा हिच त्यांची
ओळख झाली, इतकी हि भूमिका गाजली. टिवी मालिका ''पवित्र रिश्ता'' मधील
त्यांची सविता देशमुख हि भूमिकाही खुप गाजली. या भूमिकेसाठी त्यांना अनेक
पुरस्कार प्राप्त झाले आहे. सोबतच ''सिंहासन'', ''गुंडाराज'', "वास्तव'',
ये तेरा घर ये मेरा घर", ''कृष्णा कॉटेज", "वन टू थ्री", ''अगडबंब" आणि
"येलो" या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. “गुरू”, “महासागर”, “पुरुष”,
“आम्ही बिघडलो”, “पाहुणा” आणि “आमच्या
या घरात” या नाटकातून त्यांनी अभिनय केला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
