Showing posts with label nirop. Show all posts
Showing posts with label nirop. Show all posts

Saturday, 26 December 2015

सचिन कुंडलकर

आज (२६ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सध्या चित्रपट सुष्टित कार्यरत असलेल्या संवेदनशील दिग्दर्शकांपैकी सचिन कुंडलकर हे आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात मानवी संवेदनाच्या छटा बघायला मिळतात. आतापर्यंत त्यांनी "रेस्टॉरंट", "निरोप", "गंध", "हॅपी जर्नी" आणि "राजवाडे एंड सन्स" हे मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहे. हिंदीमध्ये त्यांनी "अय्या" हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रानी मुखर्जी यांची प्रमुख भूमिका होती.

सचिन ककुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
  • रेस्टॉरंट (२००६)
  • निरोप (२००७)
  • गंध (२००९)
  • अय्या (२०१२)
  • हॅपी जर्नी (२०१४)
  • राजवाडे एंड सन्स (२०१५)

Wednesday, 18 November 2015

अमित अभ्यंकर

आज (१८ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अमित अभ्यंकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अमित अभ्यंकर यांनी कार्यकारी निर्माता म्हणून "निरोप", "हापुस" आणि "इश्क़ वाला लव" या चित्रपटासाठी कार्य केले आहे. २०१२ साली त्यांनी "जन गण मन" हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला.  या चित्रपटात अस्मिता जोगळेकर, संतोष जुवेकर, नंदू माधव, संदीप मेहता, विजय मिश्रा, उदय सबनीस, चिन्मय संत आणि मधुरा वेलणकर यांच्या भूमिका होत्या.

Saturday, 26 September 2015

समीर धर्माधिकारी

आज (२६ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील डैशिंग अभिनेते समीर धर्माधिकारी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांच्या डैशिंग व्यक्तिमत्वामुळे त्यांनी जाहिरात व अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अभिनय केलेल्या सचिन कुंडलकर दिग्दर्शित "निरोप" या चित्रपटाला २००७ सालच्या सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. जाहिरात व चित्रपटांसोबतच अनेक ऐतिहासिक काळावर आधारीत टिवी मलिकांमधून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या मध्ये "एक वीर स्त्री की कहानी …. झांसी की रानी", "महाभारत" आणि "बुद्धा: राजो का राजा" याचा समावेश आहे. सध्या त्यांची ''चक्रवर्ती अशोक सम्राट'' हि मालिका कलर्स या वाहिनीवर प्रदर्शित होत आहे.

किरण नाटकी